स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ      

मुकुल रणभोर 
गुरुवार, 22 मार्च 2018

क्विझ
 

     
१)     कोणते राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकार १०-२३ फेब्रुवारी या कालावधीत ‘क्‍लीन एअर’ मोहीम राबवत आहे?
    अ) गोवा ब) पंजाब क) हरियाना ड) दिल्ली

२)     ‘जागतिक रेडिओ दिवस २०१८’ कोणत्या विषयाखाली आयोजित केला गेला?
    अ) रेडिओ अँड योगा ब) रेडिओ अँड स्पोर्टस क) रेडिओ - कनेक्‍ट वर्ल्ड ड) रेडिओ-कनेक्‍ट वर्ल्ड फॉर पीस

३)     ‘न्यू वर्ल्ड वेल्थ’ च्या श्रीमंत शहरांच्या अहवालासंदर्भात कोणते विधान चुकीचे आहे?
    I - भारताचे मुंबई हे शहर एकूण संपत्ती $९५० अब्जसह १० व्या क्रमांकावर आहे.
    II - अमेरिकेचे वॉशिंग्टन डीसी. हे जगातले सर्वाधिक श्रीमंत शहर आहे.
    अ) फक्त I ब) फक्त II क) I आणि II दोन्ही ड) वरील पैकी एकही नाही.

४)     उत्तर बंगालच्या उपसागरात संशोधकांना विद्युत झटका देणाऱ्या ‘इल’ माशांच्या तीन नवीन प्रजाती आढळून आल्या. त्यामध्ये कोणत्या प्रजातीचा समावेश नाही?
    अ) जिमनोथोरॅक्‍स सुडोटाइल ब) जिमनोथोरॅक्‍स विशाखान्सिस क) एंचेलायकोअर प्रोपिनकुआ 
    ड) यापैकी नाही.

५)     केंद्र शासनाने पोलावरम बहुद्देशीय सिंचन प्रकल्पासह अन्य प्रकल्पांसाठी कोणत्या राज्याला १,२६९ कोटी रुपयांचा निधी वाटप केला?
    अ) तमिळनाडू ब) कर्नाटक क) तेलंगणा ड) आंध्रप्रदेश

६)    ‘हॉटेल गेवोरा’ हे जगातील सर्वाधिक उंच हॉटेल कुठे आहे?
    अ) दुबई, युएई ब) टोकियो, जपान 
क) बीजिंग, चीन ड) न्यूयॉर्क, अमेरिका

७)    दक्षिण कोरियात प्योंगचांगमध्ये आयोजित हिवाळी ऑलिंपिक २०१८ मध्ये सहभागी झालेला भारतीय खेळाडू शिव केशवन हा कोणत्या खेळासाठी ओळखला जातो?
    अ) आइस स्केटर ब) आइस स्लेट 
    क) ल्युज ड) क्रॉस कंट्री स्कायर

८)     महाराष्ट्र लोक अदालत समितीत सदस्य म्हणून नेमणूक झालेल्या पहिल्या किन्नर न्यायाधीशाचे नाव ओळखा.
    अ) लक्ष्मी नारायण ब) गौरी सावंत 
    क) विद्या कांबळे ड) दीपा कुमार

९)     दृष्टीबाधितांची १३ वी राष्ट्रीय ‘ए’ बुद्धिबळ अजिंक्‍यपद स्पर्धा कोणी जिंकली.
    अ) आश्‍विन मकवाना ब) सौंदर्या कुमार प्रधान 
    क) किशन गांगोली ड) आर्यन जोशी

१०)     आठव्या ‘वरिष्ठ राष्ट्रीय महिला हॉकी अजिंक्‍यपद’ स्पर्धेचा विजेता कोण आहे?
    अ) मध्यप्रदेश ब) हरियाना क) पंजाब 
ड) रेल्वे क्रीडा जाहिरात मंडळ (RSPB)

११)     कोणत्या भारतीय जलतरणपटूने ‘ओशन सेव्हन चॅलेंज‘ पूर्ण केले?
    अ) रोहन मोरे ब) वीरधवल खाडे क) खजान सिंह ड) संदीप शेजवळ

१२)    कोणत्या शासकीय बॅंकेच्या मुंबईमधील एकाच शाखेत तब्बल $१.७७ अब्जचा घोटाळा उघडकीस आला?
    अ) महाराष्ट्र बॅंक ब) कॅनरा बॅंक क) पंजाब नॅशनल बॅंक ड) इंडियन बॅंक

१३) ‘आशियायी खेळ स्पर्धे’त  भारतीय पुरुष बास्केटबॉल संघाने ५x५ बास्केटबॉल चाचणी प्रकारात रौप्यपदक पटकावले. ही स्पर्धा कोणत्या देशात खेळली गेली?
    अ) दक्षिण कोरिया ब) इंडोनेशिया क) मलेशिया ड) भारत

१४)    आफ्रिका खंडातल्या कोणत्या देशाने दुष्काळी परिस्थितीला ‘राष्ट्रीय आपत्ती’ घोषित केली?
    अ) अल्जीरिया ब) सुदान क) केनिया ड) द. आफ्रिका

१५)    केंद्र शासनाने आरोग्याच्या दृष्टीने देशाच्या सर्व विभागांमध्ये सामान्य सेवा केंद्र (CSC) ई.-शासन सेवांमार्फत _____ निर्मिती संयंत्राची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.
    अ) गर्भनिरोधक वस्तू (महिला व पुरुष दोन्ही) ब) सॅनिटरी पॅड क) गर्भनिरोधक वस्तू (फक्त पुरुष) ड) यापैकी नाही

१६)     बंगालच्या उपसागरामध्ये पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणाऱ्या कोणत्या अण्वस्त्रवाहू  क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली ?
    अ) पृथ्वी-२  ब) ब्रम्होस क) अग्नी-२ ड) धनुष

 

 

क्विझचे उत्तर ः १) ड   २) ब   ३) क   ४) ड   ५) ड   ६) अ   ७) क   ८) क   ९) क   १०) ड   ११) अ   १२) क   १३) ब   १४) ड   १५) ब   १६) ड

संबंधित बातम्या