स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
क्विझ
क्विझचे उत्तर : १) ड २) ड ३) अ ४) क ५) ब ६) अ ७) क ८) ब ९) ड १०) अ ११) ब १२) ब १३) क १४) क १५) अ १६) ड १७) ब
१) केंद्र शासनाने कोणत्या कायद्याला ‘सरकारी बचत बॅंक अधिनियम-१८७३’ मध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला?
अ) सरकारी बचत प्रमाणपत्र अधिनियम-१९५९
ब) सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अधिनियम-१९६८
क) लघुबचतनिधी अधिनियम-१९७७ ड) अ. आणि ब.
२) भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेकडून (DAC) बंदूकखरेदीसंबंधी १५,९३५ कोटी रुपयांचा मालमत्ता अधिग्रहण प्रस्ताव मंजूर करण्यात आला. प्रस्तावामधून खरेदी होणाऱ्या बंदुकांमध्ये कोणत्या प्रकाराचा समावेश नाही?
अ) असॉल्ट रायफल ब) स्नायपर रायफल
क) हलक्या मशिनगन ड) हेवी मशिनगन
३) कोणता देश १७ फेब्रुवारी ते ८ एप्रिल २०१८ या कालावधीत आठव्या ‘वैश्विक रंगभूमी ऑलिंपिक’चे आयोजन करणार?
अ) भारत ब) जपान
क) इस्राईल ड) अमेरिका
४) पूर्व चंपारण जिल्ह्यामधील पहिले दुग्धालय कोठे स्थापित केले जाणार आहे?
अ) बगाहा ब) बेत्तीया
क) मोतिहारी ड) नारकटीगंज
५) सहावी ‘जागतिक सरकार शिखर परिषद (WGS)’ कोठे भरविण्यात आली?
अ) जकार्ता,इंडोनेशिया ब) दुबई,संयुक्त अरब अमिराती
क) बीजिंग,चीन ड) नवी दिल्ली,भारत
६) साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदावर कोणाची निवड झाली?
अ) चंद्रशेखर कंबार ब) माधव कौशिक
क) रेणू मोहन भान ड) विष्णू पंड्या
७) कोणत्या देशासोबत भारत माहिती व संपर्क तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठी व्यावहारिक सहकार्य मजबूत करण्यास सहमत झाले आहे ?
अ) इटली ब) ग्रीनलॅंड क) रशिया ड) तुर्कमेनिस्तान
८) कोणत्या दोन रेल्वेस्थानका दरम्यान पॅलेस क्वीन हमसफर एक्स्प्रेस सुरू करण्यात आली?
अ) दिल्ली आणि मुंबई ब) म्हैसूर आणि उदयपूर
क) आग्रा आणि दिल्ली ड) उदयपूर आणि बंगळुरू
९) केरळच्या एझिमला येथील भारतीय नौदल प्रबोधिनी (INA)च्या कमांडंटपदाचा भार कोणाकडे देण्यात आला?
अ) व्हाइस ॲडमिरल अजितकुमार ब) ॲडमिरल सुनील लांबा क) व्हाइस ॲडमिरल अशोक कुमार ड) व्हाइस ॲडमिरल आर. बी. पंडित
१०) जागतिक पर्यावरण दिन २०१८चा विषय काय आहे?
अ) बीट प्लॅस्टिक पोल्यूशन ब) सेव्ह द प्लॅनेट
क) नो वॉटर वेस्टेज ड) सेव्ह द अर्थ
११) वैश्विक डिजिटल आरोग्य भागीदारी शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली?
अ) व्हिएन्ना ब) कॅनबेरा क) वॉशिंग्टन डीसी ड) न्यूयॉर्क
१२) अलीकडेच कॅनडा-भारत व्यवसाय मंचाची दुसरी बैठक कुठे आयोजित करण्यात आली?
अ) ओटावा ब) नवी दिल्ली क) गांधी नगर ड) टोरांटो
१३) अकार्यक्षम मालमत्तेचा प्रश्न सोडविण्यासाठी RBIन कोणाच्या अध्यक्षतेखाली विशेषज्ञ समिती नेमली?
अ) रघुराम राजन ब) ऊर्जित पटेल क) वाय. एच. मालेगाम
ड) बिमल जालान
१४) राष्ट्रीय शहरी गृहनिर्माण कोष (NUHF) तयार करण्यासाठी किती निधीची तरतूद केली गेली आहे?
अ) ३५ हजार कोटी ब) ५० हजार कोटी
क) ६० हजार कोटी ड) ६५ हजार कोटी
१५) कोणत्या नदीच्या पाणी वाटपावरून असलेल्या वादाला सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आंतरराज्य नदी पाणी तंटाकायदा-१९५६अंतर्गत तंटा न्यायाधिकरण तयार केले?
अ) महानदी ब) मांडवी नदी क) कावेरी नदी ड) यांपैकी नाही
१६) कोणत्या शहरात भारताचे पहिले संरक्षण विद्यापीठ उभारले जात आहे?
अ) हैदराबाद ब) पुडुचेरी क) पुणे ड) गुरुग्राम
१७) कोणत्या शहरात ‘स्वच्छतागृह’ या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले?
अ) विशाखापट्टणम ब) वाराणसी क) अमरावती ड) दिल्ली