स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
१) कोणत्या शहरात कर्करोगाच्या निदानासाठी ‘सायक्लोन-३०’ नावाची भारतातली सर्वांत मोठी वैद्यकीय सायक्लोट्रॉन सुविधा कार्यरत करण्यात आली?
अ) मुंबई ब) दिल्ली क) चेन्नई ड) कोलकता
२) महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला?
अ) १८४८ ब) १८६९ क) १८८९ ड) १८८५
३) आकाश संरक्षण प्रणाली ही ............ क्षेपणास्त्र प्रणाली आहे.
अ) हवेतून हवेत मारा करणारी ब) जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क) हवेतून जमिनीवर मारा करणारी ड) जमिनीवरून हवेत मारा करणारी
४) कोणत्या दक्षिण आशियायी शहरात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU) दक्षिण आशिया क्षेत्र कार्यालय स्थापित केले जाणार आहे
अ) काठमांडू ब) दिल्ली क) ढाका ड) कोलंबो
५) प्रधान मंत्री फसल बिमा योजनेच्या (PMFBY) अंतर्गत विम्याची रक्कम देण्यास विलंब झाल्यास शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांना आता किती व्याज द्यावा लागणार?
अ) ५ टक्के ब) ७ टक्के क) १२ टक्के ड) १५ टक्के
६) कोणता देश ‘कुलिंग ॲक्शन प्लॅन’ जाहीर करणारा जगातला पहिला देश बनला आहे?
अ) चीन ब) नेपाळ क) भूतान ड) भारत
७) कोणत्या देशात शहरी पर्यटनसंदर्भात ‘जागतिक शिखर परिषद २०१८’ आयोजित करण्यात आली होती?
अ) अमेरिका ब) रशिया क) दक्षिण कोरिया ड) जपान
८) भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारताच्या प्रथम महिला आयएएस अधिकारी कोण होत्या?
अ) अण्णा राजम मल्होत्रा ब) अरुणा सुंदरराजन
क) किरण बेदी ड) संजक्ता पराशर
९) कोणत्या मालिकेला ‘एमी पुरस्कार २०१८’ मध्ये सर्वोत्कृष्ट नाट्य मालिकेचा पुरस्कार देण्यात आला?
अ) गेम ऑफ थ्रोन्स ब) १३ रिझन्स व्हाय
क) अटलांटा ड) द आयर्न फिस्ट
१०) स्पेसएक्सच्या बिग फाल्कन यानातून चंद्राकडे उड्डाण करणारा प्रथम खासगी प्रवासी कोण असेल?
अ) लिओनार्डो डिकॅप्रियो ब) बिल गेट्स
क) मॅट डॅमन ड) युसाकू मेझावा
११) ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार २०१८’ साठी कोणत्या खेळाडूची शिफारस करण्यात आली आहे?
अ) युवराज सिंग ब) हरभजन सिंग
क) विराट कोहली ड) नीरज चोप्रा
१२) भारतीय वित्त मंत्रालयाने बॅंक ऑफ बडोदासह दोन सार्वजनिक क्षेत्रातल्या बॅंका विलीन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्या कोणत्या दोन बॅंका आहेत?
अ) पंजाब नॅशनल बॅंक आणि अलाहाबाद बॅंक ब) कॉर्पोरेशन बॅंक आणि इंडियन बॅंक क) यूको बॅंक आणि सिंडिकेट बॅंक ड) विजया बॅंक आणि देना बॅंक
१३) कोणत्या देशाने हायड्रोजन इंधन आधारित जगातली पहिली ट्रेन कार्यरत केली आहे?
अ) जपान ब) जर्मनी क) चीन ड) अमेरिका
१४) माल्टा हा देश कोणत्या समुद्रात वसलेला आहे.
अ) भूमध्य समुद्र ब) कॅस्पियन समुद्र
क) काळा समुद्र ड) बाल्टिक समुद्र
१५) स्वच्छ विद्यालय हा कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे.
अ) मनुष्यबळ विकास मंत्रालय ब) गृह मंत्रालय
क) ग्रामीण विकास मंत्रालय ड) सामाजिक कल्याण मंत्रालय
१६) कोणत्या भारतीय शहरात प्रथम ‘इंडिया टुरिझम मार्ट’ आयोजित केले गेले?
अ) चेन्नई ब) बंगरूळ क) मुंबई ड) दिल्ली
१७) डेकॅथलॉनमध्ये विश्वविक्रमाची नोंद करणाऱ्या खेळाडूचे नाव काय आहे?
अ) व्हिक्टर रोथलिन ब) आबेबे बिकिला
क) केव्हिन मेयर ड) एलिउड किपचोगे
१८) कोणत्या चित्रपटाने २०१८ या वर्षाचा टोरांटो चित्रपट महोत्सव प्रेक्षक पारितोषिक जिंकले ?
अ) अल्फा ब) माईल २२ क) ग्रीन बुक ड) द मेग
१९) सुदानचे नवे पंतप्रधान कोण आहेत?
अ) तैयब सालीह ब) मोट्टाझ मुसा अब्दुल्लाह
क) उमर अल बशीर ड) महम्मद वार्डी
२०) दरवर्षी अहमत कोमर्ट क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली जाते?
अ) तुर्कस्तान ब) रशिया क) इजिप्त ड) इराण
क्विझचे उत्तर ः १) ड २) ब ३) ड ४) ब ५) क ६) ड ७) क ८) अ ९) अ १०) ड
११) क १२) ड १३) ब १४) अ १५) अ १६) ड १७) क १८) क १९) ब २०) अ