स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

विष्णू फुलेवार
शनिवार, 8 डिसेंबर 2018

क्विझ
 

१)     वर्ष २००२ च्या प्रतिस्पर्धा कायद्याचा आढावा घेण्यासाठी स्थापना करण्यात आलेल्या प्रतिस्पर्धा कायदा आढावा समितीचे प्रमुख कोण आहे?
    अ) एस. चक्रवर्ती ब) आदित्य भट्टाचार्य 
    क) पल्लवी शार्दूल श्रॉफ ड) इंजेती श्रीनिवास

२)     कोणत्या तारखेला आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध दिन पाळला जातो?
    अ) १ सप्टेंबर ब) १ ऑक्‍टोबर क) १ नोव्हेंबर ड) १ डिसेंबर

३)     डॉ. सुसेन गिती या कोणत्या देशाच्या मेजर जनरल बनणाऱ्या प्रथम महिला अधिकारी आहेत?
    अ) नेपाळ ब) पाकिस्तान क) बांगलादेश ड) भूतान

४)     कोणत्या शहरात भारतीय सरकारचे सेंटर ऑफ एक्‍सलन्स फॉर डेटा ॲनालिटिक्‍स (CEDA) आहे?
    अ) चेन्नई ब) दिल्ली क) बंगरुळ ड) लखनऊ

५)     पाच ऑक्‍टोबरपासून सुरू होणाऱ्या ‘मिशन गंगे’ या राफ्टिंग मोहिमेचे नेतृत्व कोण करणार आहे?
    अ) बचेंद्रि पाल ब) स्मृती इराणी 
    क) किरण बेदी ड) मनीषा नारंग

६)     चिर्प्ड पल्स ॲम्प्लिफिकेशन (CPA) हे तंत्रज्ञान कोणत्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरले जाते?
    अ) कर्करोग उपचार पद्धती ब) वैद्यकीय ट्रॅकिंग प्रणाली 
    क) डोळ्यावरची शस्त्रक्रिया ड) यापैकी नाही.

७)    कोणत्या तारखेला आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन पाळला जातो?
    अ) १५ ऑगस्ट ब) २६ जानेवारी 
    क) ३० जानेवारी ड) २ ऑक्‍टोबर

८)    कोणत्या देशात तृतीय युवा ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा खेळली जाणार आहे?
    अ) भारत ब) अर्जेंटिना क) रशिया ड) युक्रेन

९)     नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय भूमीवर पहिल्यांदा तिरंगा कुठे फडकावला ?
    अ) अंदमान ब) मिझोराम क) मणिपूर ड) आसाम

१०)     दिनांक १४ नोव्हेंबर रोजी कोणता दळणवळण उपग्रह अवकाशात पाठविण्यात आला?
    अ) GSAT-२२ ब) GSAT-२७ 
    क) GSAT-२९ ड) GSAT-३१

११)     दुसरा ‘स्टार्टअप इंडिया गुंतवणूक परिसंवाद’ कुठे आयोजित करण्यात आला होता?
    अ) सेऊल ब) बीजिंग क) मुंबई ड) दिल्ली

१२)     भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान ‘इंद्रा’ नावाचा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जात आहे?
    अ) फ्रान्स ब) रशिया क) चीन ड) इंडोनेशिया

१३)     कोणत्या व्यक्तीकडून ॲम्नेस्टी इंटरनॅशनलने बहाल केलेला ‘ॲम्बेसेडर ऑफ कोन्सायन्स अवॉर्ड’ हा सन्मान परत घेतला आहे?
    अ) व्हॅकलाव हॅवेल, झेक प्रजासत्ताक ब) मेरी रॉबिन्सन, आयर्लंड
    क) मलाला युसुफझाई, पाकिस्तान ड) आंग सान सू की, म्यानमार

१४)     भारतातील जलमार्गाच्या प्रथम मल्टी-मॉडेल टर्मिनलचे उद्‌घाटन कोणत्या ठिकाणी झाले?
    अ) वाराणसी ब) हल्दीया क) प्रयागराज ड) यापैकी नाही

१५)     जगभरात दरवर्षी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन पाळला जातो?
    अ) १ जून ब) १ नोव्हेंबर क) २१ जून ड) २१ नोव्हेंबर

१६)    उत्तर अफ्रिकेमधील कोणत्या देशाने नोव्हेंबरमध्ये गुन्हेगारीसंबंधित बाबींमध्ये परस्पर कायदेशीर सहकार्यासंबंधी करार केला आहे?
    अ) अल्जेरिया ब) सुदान क) ट्युनिशिया ड) मोरोक्को

१७)    अंदमान बेटांजवळच्या समुद्रात कोणता देशाची सीमा भारताच्या सागरी सीमेशी संलग्न आहे ?
    अ) जपान ब) इंडोनेशिया क) ऑस्ट्रेलिया ड) मलेशिया

१८)    कोणत्या देशासह भारताने ‘समुद्र शक्ती’ हा सागरी सराव आयोजित केला?
    अ) अमेरिका ब) जपान क) इंडोनेशिया ड) थायलंड

१९)    कोणत्या देशामध्ये ११ नोव्हेंबरला उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते भारतीय युद्ध स्मारकाचे अनावरण करण्यात आले?
    अ) अमेरिका ब) ब्रिटन क) जर्मनी ड) फ्रान्स

२०)     कोणती अंतराळ संस्था थ्रीडी मॅट्रिक्‍समध्ये मानवी पेशी साठविण्यात आलेले लहान उपकरण अवकाशात पाठविण्याची योजना तयार करीत आहे?
    अ) नासा ब) इसा क) इस्रो ड) यापैकी नाही.

२१)     कोणत्या बॅडमिंटनपटूने ‘चीन ओपन २०१८’ ही क्रीडास्पर्धा जिंकली?
    अ) चाउ तिएन चेन ब) केंटो मोमोटा 
    क) अँटोनिओ डस्क ड) फिजो किएमा

संबंधित बातम्या