स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

विष्णू फुलेवार
गुरुवार, 10 जानेवारी 2019

क्विझ
क्विझचे उत्तर :  १) ब   २) ड   ३) ड   ४) क   ५) अ   ६) ड   ७) क   ८) ड   ९) अ   १०) क 
११) क   १२) अ   १३) क   १४) अ   १५) क   १६) ड   १७) क   १८) ड   १९) ब   २०) अ

१)     भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने ‘अटल भाषांतर योजना’ सुरू केली आहे?
    अ) गृह मंत्रालय ब) परराष्ट्र कल्याण मंत्रालय 
    क) मनुष्यबळ विकास मंत्रालय ड) ग्रामीण विकास मंत्रालय

२)     विस्तृत डिजिटल सार्वजनिक पतनोंदणी यादी (PCR) तयार करण्यासाठी आरबीआयने कोणत्या माहिती तंत्रज्ञान कंपनीची निवड केली?
    अ) विप्रो ब) टीसीएस क) आयबीएम इंडिया ड) वरील सर्व

३)     शीख समुदायाला सेवा देण्यासाठी कोणत्या भारतीय ब्रिटिश व्यक्तीला ‘ऑफ ब्रिटिश एम्पायर (MBE)’चा रॉयल सन्मान देऊन गौरवण्यात आले?
    अ) नवीन अँड्रयू ब) जास बिनाग 
    क) अमित चना ड) जगदेव सिंग वीरदी

४)     दिबांग वन्यजीवन अभयारण्याला व्याघ्र प्रकल्प घोषित करण्याच्या विरोधात असलेला ‘इडू मिश्‍मी’ हा आदिवासी समाज कोणत्या राज्यातल्या आहे?
    अ) मणिपूर ब) सिक्कीम क) अरुणाचल प्रदेश ड) मध्य प्रदेश

५)     कोणत्या अग्निबाणाच्या साहाय्याने अमेरिकेच्या वायुदलाचा सर्वांत शक्तिशाली जीपीएस उपग्रह अवकाशात पाठवला?
    अ) फाल्कन ९ ब) सॅटर्न ५ क) ॲटलास ५ ड) अग्नी ५

६)    कोणते भारतीय राज्य सार्वभौमिक आरोग्य सेवा पुरविणारे पहिले राज्य बनले आहे?
    अ) तमिळनाडू ब) आंध्रप्रदेश क) झारखंड ड) उत्तराखंड

७)     कोणत्या आशियाई देशाच्या संसदेने वैद्यकीय वापरासाठी मारज्युआनाचा वापर करण्यास परवानगी दिली?
    अ) मलेशिया ब) इंडोनेशिया क) थायलंड ड) म्यानमार

८)    ग्रामीण भागात वैद्यकीय मदत मिळवणे कठीण असताना हजारो बाळंतपणे विनामूल्य करणाऱ्या पद्मश्रीप्राप्त ------------ यांचे २५ डिसेंबर २०१८ रोजी निधन झाले?
    अ) डॉ. एस. जयचंद्रन ब) डॉ. बाबू शेर्षद 
    क) ए. के. पटेल ड) सुलागिट्टी नरसम्मा

९)    भारतात दरवर्षी कोणत्या दिवशी सुशासन दिन पाळला जातो?
    अ) २५ डिसेंबर ब) २६ जानेवारी क) ३१ मार्च ड) ३१ डिसेंबर

१०)     ___ येथे प्रवेशासाठी चाबहार बंदराला धोरणात्मकदृष्ट्या (व्यापार) महत्त्वपूर्ण म्हणून पाहिले जाते?
    अ) युरोप ब) अमेरिका क) मध्य आशिया ड) दक्षिण आशिया

११)     कोणत्या नदीच्या भागावर भारतामधील सर्वांत दीर्घ ‘बोगिबील पूल’ उभारण्यात आला आहे?
    अ) गंगा ब) यमुना क) ब्रह्मपुत्रा ड) महानदी

१२)    भारतातले पहिले संगीत संग्रहालय कोणत्या राज्यात उभारण्यात येणार आहे?
    अ) तमिळनाडू ब) कर्नाटक क) तेलंगणा ड) केरळ

१३)     कोणता देश प्रशांत महासागराच्या ‘रिंग ऑफ फायर’ या प्रदेशात येत नाही?
    अ) इंडोनेशिया ब) फिजी क) भारत ड) जपान

१४)     भारतात कोणत्या ठिकाणाहून ‘अग्नी-४’ या अण्वस्त्रक्षम आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली?
    अ) अब्दुल कलाम बेट, ओडिशा ब) सतीश धवन अंतराळ केंद्र, आंध्रप्रदेश क) माउंट अबू, राजस्थान ड) वरील पैकी नाही

१५)    अमेरिकेच्या संरक्षण सचिव पदी कोणाला नियुक्त केले गेले?
    अ) टिम मॅटिस ब) जेम्स मॅटिस क) पॅट्रिक शनाहन ड) रॉबर्ट डाहल

१६)    ‘राष्ट्रीय ग्राहक दिन २०१८’ या दिवसाची संकल्पना काय आहे?
    अ) कंझ्युमर फर्स्ट ब) बाय विथ केअर क) बार्गेनिंग इज ए कंझ्युमर राइट ड) टाइमली डिस्पोझल ऑफ कंझ्युमर कम्पलेंट्‌स

१७)    कोणत्या दिवशी भारतात दरवर्षी राष्ट्रीय ग्राहक दिन पाळला जातो?
    अ) २२ डिसेंबर ब) २३ डिसेंबर क) २४ डिसेंबर ड) २५ डिसेंबर

१८)    कोणत्या राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ‘कृषक असिस्टंट फॉर लाइव्हलिहुड अँड इन्कम ऑग्युमेंटेशन’ (KALIA) योजनेला मंजुरी दिली?
    अ) आंध्र प्रदेश ब) तमिळनाडू क) मध्य प्रदेश ड) ओडिशा

१९)    केंद्र सरकारच्या ‘एकलव्य मॉडेल निवासी शाळा’ या योजनेचा समाजाच्या कोणत्या भागाला जास्तीत जास्त फायदा देण्याचे लक्ष आहे?
    अ) अनुसूचित जाती ब) अनुसूचित जमाती क) इतर मागासवर्गीय ड) विशेष मागासवर्गीय

२०)     केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने कोणत्या प्राणी/प्रजाती/पक्ष्याच्या संख्येच्या दृष्टीने सुरक्षा व संवर्धन करण्यासाठी एक संवर्धन प्रकल्प सुरू केला?
    अ) आशियायी सिंह ब) ग्रेट इंडियन बस्टर्ड 
    क) सायबेरियन क्रेन ड) भारतीय गिधाड

संबंधित बातम्या