स्पर्धा परिक्षांचा गेटवे

विष्णू फुलेवार
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
क्विझचे उत्तर : १) अ    २) क   ३) अ   ४) ड  ५) ब   ६) क   ७) अ   ८) ब   ९) ब   १०) ड    ११) ब   १२) क   १३) क    १४) ब   १५) अ   १६) क   १७) ब    १८) ड

 1. सरकारने कोणत्या राज्यात प्रसिद्ध संगीतकार आर. डी. बर्मन यांच्या संस्मरणीय कार्याचे दर्शन घडविण्यासाठी संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे?
  अ) त्रिपुरा    ब) प. बंगाल     क) महाराष्ट्र   ड) ओडिशा
   
 2. अक्‍यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराची सर्वाधिक प्रकरणे कोणत्या राज्यात आढळली आहेत?
  अ) कर्नाटक    ब) उत्तर प्रदेश      क) बिहार    ड) झारखंड
   
 3. कोणत्या दोन देशांच्या दरम्यान होर्मुज समुद्रधुनी आहे?
  अ) इराण आणि ओमान    ब) सौदी अरेबिया आणि येमेन
  क) सौदी अरेबिया आणि इजिप्त   ड) पाकिस्तान आणि इराण
   
 4. ‘शांघाय सहकार संघटना (SCO) शिखर परिषद २०१९’ ही     जून २०१९ मध्ये कुठे आयोजित करण्यात आली?
  अ) बीजिंग, चीन    ब) मॉस्को, रशिया
  क) नवी दिल्ली, भारत    ड) बिश्‍केक, किर्गिझस्तान
   
 5. भारत जून २०१९ मध्ये अमेरिकेकडून आयात होणाऱ्या किती वस्तूंवर अतिरिक्त कर लागू करणार आहे?
  अ) ५०      ब) २९       क) १००      ड) १२०
   
 6. कोणता देश आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) या विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात जगातल्या सर्वांत मोठ्या आंतरराष्ट्रीय सहकारी कार्यक्रमाचा भागीदार नाही?
  अ) अमेरिका    ब)कॅनडा      क) चीन       ड) रशिया
   
 7. भारत सरकारद्वारे ‘कर्मचारी राज्य विमा अधिनियम-१९४८’ अंतर्गत कमी करण्यात आलेला योगदानाचा दर किती आहे? हा दर १ जुलैपासून प्रभावी असेल.
  अ) ४%      ब) ५%      क) ४.२५%      ड) ६.५०%
   
 8. सन २०१९ मध्ये भारतात धडकणारे दुसरे चक्रीवादळ कोणते?
  अ) ‘हुदहुद’ चक्रीवादळ    ब) ‘वायू’ चक्रीवादळ
  क) ‘कोरा’ चक्रीवादळ    ड) ‘कोरबा’ चक्रीवादळ
   
 9. कोणत्या प्रादेशिक सरकारने मूळ भारतीय असलेले शेख महम्मद मुनीर अन्सारी यांना ‘स्टार ऑफ जेरुसलेम’ पदक देऊन सन्मानित केले?
  अ) भारत    ब) पॅलेस्टाईन     क) इस्राईल     ड) अमेरिका
   
 10. जून २०१९ मध्ये सार्वजनिक परिवहनाच्या क्षेत्रात महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने कृती दल नेमले?
  अ) गुजरात        ब) राजस्थान      क) गोवा      ड) दिल्ली
   
 11. पुढीलपैकी कोणत्या दिवशी बालश्रम विरोधी दिवस २०१९ साजरा केला गेला?
  अ) जून ११      ब) जून १२     क) जून १४      ड) जून १५
   
 12. इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्कवरील आरबीआय गठित पॅनेलचे प्रमुख कोण आहेत? 
  अ) एन. एस. विश्‍वनाथन    ब) रघुराम राजन क) बिमल जालन    ड) विमल रॉय
   
 13. केंद्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत नळाद्वारे केला जाणारा नागरी क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा १८ टक्‍क्‍यावरून वाढवून १०० टक्‍क्‍यापर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे?
  अ) २०२०      ब) २०२२      क) २०२४      ड) २०३०
   
 14. कोणती कंपनी १० जून २०१९ रोजी बाजारपेठेतल्या भागभांडवलाच्या संदर्भात भारतातली सर्वांत मौल्यवान कंपनी ठरली?
  अ) रिलायन्स इंडस्ट्रीज    ब) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस
  क) आयबीएस इंडिया    ड) अदानी इंडस्ट्रीज
   
 15. कोणत्या खेळाडूने ‘२०१९ राष्ट्रकुल भारोत्तोलन अजिंक्‍यपद’ या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी महिलांच्या ४९ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकले?
  अ) झिली दलाबहेरा    ब) मीराबाई चानू
  क) मतसा संतोषी    ड)यापैकी नाही
   
 16. भारतातल्या अन्न व पोषण सुरक्षेसंदर्भात यूएनडब्ल्यूएफपी (UNWFP) बरोबर ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एका पुस्तकाचे अनावरण कोणी केले?
  अ) रामनाथ कोविंद    ब) नरेंद्र मोदी   क) नरेंद्र सिंग तोमर    ड) हर्षवर्धन
   
 17. जुलै २०१९ मध्ये राज्यसभेच्या सभासदपदाची शपथ घेणाऱ्या व्यक्तीचे नाव काय आहे?
  अ) रघुनाथ महापात्रा    ब) एस. जयशंकर   क) सी. एम. रमेश    ड) यापैकी नाही
   
 18. बंगळूरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये क्रिकेटच्या प्रमुखपदी नेमणूक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव काय आहे?
  अ) युवराज सिंग    ब) आर. पी. सिंग    क) सौरव गांगुली    ड) राहुल द्रविड

संबंधित बातम्या