स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

विष्णू फुलेवार
सोमवार, 9 डिसेंबर 2019

क्विझ
क्विझचे उत्तर : १. ड   २. क   ३. ब    ४. ड   ५. ब  ६. ब   ७. अ   ८. अ, ९. अ  १०. ब   ११. क  १२. ड १३. ब  १४. क १५. ब १६. ब १७. क

 1. कोणत्या संस्थेने भारतात प्रथमच नॅनो तंत्रज्ञानावर आधारित असलेली खते सादर केली आहेत?
  अ) नॅनोधान       ब) कजरी       क) राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था
  ड) भारतीय शेतकरी खते सहकारी मर्यादित (IFFCO)
   
 2. खालीलपैकी कोणता देश ‘प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी’चा सदस्य नाही?
  अ) म्यानमार        ब) चीन    क) बांगलादेश    ड) कंबोडिया
   
 3. .....................मध्ये १६ वी ‘ASEAN-भारत शिखर परिषद’ आयोजित करण्यात आली.
  अ) भारत     ब) थायलंड    क) ब्रुनेई     ड) चीन
   
 4. .....................या संघाने ‘रग्बी विश्‍वकरंडक २०१९’ जिंकला.
  अ) अमेरिका     ब) कॅनडा   क) जर्मनी    ड) दक्षिण आफ्रिका
   
 5. ताश्केंत या शहराजवळ चिरचीक येथे भारत आणि उझबेकिस्तान यांचा.....................या नावाने संयुक्त लष्करी सराव सुरू झाला.
  अ) इकुव्हेरिन २०१९     ब) डस्ट्लिक २०१९
  क) शक्ती २०१९          ड) मैत्री २०१९
   
 6. कोणती संस्था इस्रोच्या सहकार्याने अंतराळ तंत्रज्ञान कक्ष (STC) याची स्थापना करणार आहे?
  अ) आयआयटी हैदराबाद     ब) आयआयटी दिल्ली
  क) आयआयटी मुंबई          ड) आयआयएस्सी बंगळूर
   
 7. अनिल कुमार झा यांनी _____ याचा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाचा भार स्वीकारला.
  अ) कोल इंडिया लिमिटेड          ब) ऑईल अँड नॅच्यरल गॅस कॉर्पोरेशन
  क) ऑईल इंडिया लिमिटेड        ड) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड
   
 8. ASEAN, RCEP आणि पूर्व आशिया शिखर परिषदांमध्ये भाग घेण्यासाठी आपल्या अधिकृत दौऱ्‍यात थायलंडच्या बँकॉक या शहरात भारतीय स्थलांतरितांना संबोधताना पंतप्रधान मोदींनी     .....................यांच्या स्मृतीत एका स्मारक नाण्याचे अनावरण केले.
  अ) गुरुनानक देव         ब) महात्मा गांधी
  क) परमहंस योगानंद    ड) स्वामी विवेकानंद
   
 9. सप्टेंबर महिन्यात रशियामध्ये झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या(SCO) संयुक्त लष्करी सरावाचे नाव काय आहे?
  अ) सेंटर २०१९     ब) SCO मिशन २०१९
  क) फँटम फ्युरी    ड) फायर अँड फ्युरी
   
 10. कोणत्या सरकारी रुग्णालयात भारतात प्रथमच ‘रोबोटिक सर्जरी’ची सुविधा सुरू करण्यात आली?
  अ) डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालय, नवी दिल्ली
   ब) सफदरजंग सरकारी रुग्णालय, नवी दिल्ली
  क) सर जे. जे. हॉस्पिटल, मुंबई
  ड) IPGME&R अँड SSKM हॉस्पिटल, कोलकाता
   
 11. कोणता देश भारतात पर्यावरणपूरक शहरी वाहतूक तयार करण्यासाठी आगामी पाच वर्षांमध्ये एक अब्ज युरो एवढ्या रकमेची गुंतवणूक करणार आहे?
  अ) इस्राईल      ब) स्वीडन      क) जर्मनी     ड) फ्रान्स
   
 12. चित्रपट क्षेत्रातल्या कोणत्या व्यक्तीला ‘IFFI 2019’ या कार्यक्रमाचा ‘आयकॉन ऑफ द गोल्डन जुबली’ पुरस्कार देण्याचे जाहीर झाले?
  अ) अमिताभ बच्चन     ब) कमल हसन
  क) राज बब्बर              ड) रजनीकांत
   
 13. पवन कपूर यांची .....................मधील नवे भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  अ) सौदी अरेबिया     ब) संयुक्त अरब अमिराती    क) कुवेत    ड) बहरीन
   
 14. .....................या दिवशी जागतिक व्हेगन दिन पाळतात.
  अ) १ ऑक्टोबर         ब) १५ ऑक्टोबर   क) १ नोव्हेंबर    ड) १५ नोव्हेंबर
   
 15. .....................मध्ये ‘डिझाइन फेस्टा’ नावाचा कलात्मक कार्यक्रम आयोजित केला गेला.
  अ) पॅरिस     ब) टोकियो     क) बीजिंग     ड) रोम
   
 16. हळद पिवळ्या रंगाची असते हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे?
  अ) साम्यानुमान                     ब) केवलगणनात्मक विगमन
  क) अभ्युपगमात्मक निगमन    ड) सर्व योग्य
   
 17. मेंदूतील गाठी व कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी कशाचा वापर केला जातो?
  अ) कोबाल्ट ६०    ब) सोडिअम २४   क) आयोडीन १३१    ड) वरील सर्व

संबंधित बातम्या