स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

विष्णू फुलेवार
सोमवार, 16 मार्च 2020

क्विझ
क्विझचे उत्तर :
 १) क   २) ड  ३) अ  ४) ब   ५) अ  ६) ब  ७) ड   ८) अ  ९) क  १०) ब   ११) ड १२) ब  १३) ब  १४) क  १५) क  १६) अ  १७) ड   १८) ब

 1. भारताने कोणत्या देशाबरोबर ४ कोटी डॉलर एवढ्या रकमेचा संरक्षण करार केला?
  अ) टर्की            ब) न्यूझीलंड
  क) अर्मेनिया      ड) इजिप्त
   
 2. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी आशियायी विकास बँकेने सदस्यांसाठी किती कर्ज मंजूर केले?
  अ) १० लाख डॉलर    ब) २० लाख डॉलर
  क) ५० लाख डॉलर    ड) ४० लाख डॉलर
   
 3. ...............या शहरात ‘पुसा कृषी विज्ञान मेळावा २०२०’ आयोजित करण्यात आला.
  अ) नवी दिल्ली    ब) रोहतक
  क) गुरुग्राम         ड) भोपाळ
   
 4. तामिळनाडूमधील ...............येथे २९ फेब्रुवारी २०२० रोजी ‘चिंतन बैठक’ या नावाखाली बंदरांची आढावा बैठक पार पडली.
  अ) चेन्नई       ब) मामल्लापुरम
  क) कोइंबतूर    ड) मदुराई
   
 5. सरबानंद सोनोवाल हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? 
  अ) आसाम    ब) मेघालय
  क) त्रिपुरा      ड) हिमाचल प्रदेश
   
 6. स्वराज अवॉर्ड्‌स म्हणून ओळखला जाणारा डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो?
  अ) वित्त               ब) राजकारण
  क) समाजकारण     ड) संस्कृती
   
 7. ...............या राज्यात सहावी ‘इंडिया आयडिया परिषद’ आयोजित करण्यात आली.
  अ) महाराष्ट्र    ब) केरळ   क) मध्यप्रदेश    ड) गुजरात
   
 8. ............... या दिवशी ‘शून्य भेदभाव दिन’ साजरा केला जातो.
  अ) १ मार्च    ब) २ मार्च  क) ३ मार्च    ड) ५ मार्च
   
 9. दिव्यांग कारागीर व उद्योजकांच्या शिल्पकलेला व उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ...............या ठिकाणी ‘एकम महोत्सव’ आयोजित करण्यात आला.
  अ) कोलकता    ब) गुवाहाटी
  क) नवी दिल्ली    ड) चंदीगड
   
 10. ...............या शहरात भारताच्या गृहमंत्र्यांनी ‘राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) प्रादेशिक केंद्रस्थळ’ याच्या परिसराचे उद्‍घाटन केले.
  अ) नवी दिल्ली    ब) कोलकता
  क) मुंबई    ड) श्रीनगर
   
 11. भारतीय हवाई दलाने ...............बरोबर संरक्षण व धोरणात्मक अभ्यास विभागामध्ये एक ‘चेअर ऑफ एक्सलन्स’चे पद निर्माण करण्यासाठी सामंजस्य करार केला.
  अ) भारतीय अनुसंधान संस्था    ब) भारतीय तंत्रज्ञान संस्था
  क) दिल्ली विद्यापीठ               ड) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
   
 12. अर्मेनिया या देशाचे चलन कोणते?
  अ) रुबेल        ब) द्राम        क) पौंड    ड) दिनार
   
 13. ‘RaIDer-X’ नावाचे नवीन स्फोटक शोधन यंत्र...............यांनी तयार केले.
  अ) रिलायन्स डिफेन्स 
  ब) संरक्षण संशोधन व विकास संस्था
  क) इंडियन एअरफोर्स रिसर्च लॅबोरेटरीज
  ड) बॉर्डर रिसर्च लॅबोरेटरीज
   
 14. ‘डू यू नो’ ट्विटर शृंखला ...............याच्याशी संबंधित आहे.
  अ) भारत जाणून घेण्यासंबंधी    
  ब) पौगंडावस्थेतील प्रश्नांसंबंधी
  क) कौटुंबिक निवृत्तिवेतनासंबंधी    
  ड) प्रशासन लोकाभिमुख करण्यासंबंधी
   
 15. कोणत्या संघाने ‘खेलो इंडिया विद्यापीठ खेळ’ यामध्ये पुरुषांच्या हॉकी स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले?
  अ) हरयाणा विद्यापीठ            ब) पतियाळा विद्यापीठ
  क) बंगळुरू केंद्रीय विद्यापीठ    ड) दिल्ली विद्यापीठ
   
 16. ............... या राज्यात दोन दिवसांचा ‘मिरची महोत्सव’ आयोजित करण्यात आला.
  अ) मध्यप्रदेश    ब) आंध्रप्रदेश
  क) तेलंगणा       ड) महाराष्ट्र
   
 17. कोणत्या व्यक्तीला ‘स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार २०२०’ जाहीर झाला आहे?
  अ) सुनीता नारायण    ब) प्रकाश आमटे
  क) आमला रुईया       ड) जादव पायेंग
   
 18. ...............तयार करणे हे ‘पूर्वोदय अभियान’ याचे ध्येय आहे.
  अ) पूर्व भारतात एकात्मिक औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रस्थळ
  ब) पूर्व भारतात एकात्मिक पोलाद निर्मिती केंद्रस्थळ
  क) पूर्व भारतात एकात्मिक जलविद्युत निर्मिती केंद्रस्थळ
  ड) पूर्व भारतात एकात्मिक वन उत्पादन निर्मिती केंद्रस्थळ

संबंधित बातम्या