स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

विष्णू फुलेवार
सोमवार, 13 जुलै 2020

स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

१._____ या दिवशी ‘राष्ट्रीय चिकित्सक दिन’ साजरा केला जातो.
अ) ३० जून
ब) १ जुलै
क) २ जुलै
ड) ३ जुलै

२. ‘NADA’ अॅपचे उद्‍घाटन कोणाच्या हस्ते झाले?
अ) किरेन रिजिजू
ब) राजनाथ सिंग
क) जे. पी. नड्डा
ड) नितीन गडकरी

३. कोणत्या राज्य सरकारने ‘हमारा घर-हमारा विद्यालय’ योजना सादर केली?
अ) महाराष्ट्र
ब) उत्तरप्रदेश
क) आंध्रप्रदेश
ड) मध्यप्रदेश

४. _____या दिवशी आंतरराष्ट्रीय संसदवाद दिवस साजरा केला जातो.
अ) २४ जून
ब) २८ जून
क) २९ जून
ड) ३० जून

५. कोणत्या राज्यात भारतातले पहिले ‘लायकेन उद्यान’ उभारण्यात आले आहे?
अ) उत्तरप्रदेश
ब) बिहार
क) उत्तराखंड
ड) मध्यप्रदेश

६. या वर्षी मलावीचे नवे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली?
अ) पीटर मुथारिका
ब) लाझारुस चकवेरा
क) सौलॉस चिलिमा
ड) हेग जिंगोब

७. भारत सरकारने कोणत्या देशात तयार झालेल्या ५९ मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घातली?
अ) जपान
ब) चीन
क) पाकिस्तान
ड) उत्तर कोरिया

८. ‘BET 2020’ या समारंभात मानवतावाद पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?
अ) शकीरा
ब) रिहाना
क) निक्की मिनाज
ड) बियॉन्से

९. _____ या दिवशी ‘जागतिक लघुग्रह दिन’ साजरा केला जातो.
अ) २१ जून
ब) २५ जून
क) २७ जून
ड) ३० जून

१०. ऑफ इंडिया (DCGI) यांनी मानवावरील चाचणीला परवानगी दिलेल्या स्वदेशी कोविड-१९ लशीचे नाव काय आहे?
अ) कोव्हॅक्सिन
ब) कोव्हॅक्सिन A
क) कोव्हॅक्सिन 1
ड) कोव्हॅक्सिन A1
 
११. उत्तरप्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे _____ या राज्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
अ) गुजरात
ब) राजस्थान
क) मध्यप्रदेश
ड) उत्तराखंड

१२. ‘गरीब कल्याण रोजगार अभियान’ यासाठी संकेतस्थळ आधारित व्यासपीठाचे उद्‍घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
अ) केंद्रीय ग्रामविकास मंत्री
ब) मनुष्यबळ विकास मंत्री
क) अर्थमंत्री
ड) महिला व बालकल्याण मंत्री

१३. आयसीसीच्या मुख्य समितीवर कोणत्या भारतीय पंचाची निवड करण्यात आली?
अ) विनीत कुलकर्णी
ब) नितीन मेनन
क) अनिल चौधरी
ड) अमीश साहेबा

१४. कोरोना महामारीबरोबरच्या लढाईत चांगली कामगिरी करून दाखविल्याबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाकडून कोणाचा सन्मान करण्यात आला?
अ) अरविंद केजरीवाल
ब) के. के. शैलजा
क) डॉ. हर्षवर्धन
ड) अ आणि ब

१५. _____ हे आयर्लंडचे नवीन पंतप्रधान आहेत.
अ) मायकेल मार्टिन
ब) लिओ वराडकर
क) मेरी लू मॅकडोनाल्ड
ड) इमोन रायन

१६. तामिळनाडू राज्यात परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने _____ बरोबर करार केला.
अ) नवीन विकास बँक
ब) आशियाई विकास बँक
क) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
ड) जागतिक बँक

१७. _____ रोजी ‘सांख्यिकी दिन २०२०’ साजरा करण्यात आला.
अ) २१ जून
ब) २९ जून
क) १ जुलै
ड) ३ जुलै

१८. फेरीवाल्यांना खेळते भांडवल देण्यासाठी केंद्र सरकारद्वारे प्रारंभ करण्यात आलेल्या व्यासपीठाचे नाव ओळखा.
अ) पीएम राहत
ब) पीएम स्वावलंबन
क) पीएम स्वनिधी
ड) पीएम स्वयं

१९. कोणत्या राज्य सरकारने ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ याचा प्रारंभ केला?
अ) महाराष्ट्र
ब) दिल्ली
क) आंध्रप्रदेश
ड) तामिळनाडू

२०. ‘मन की बात’ कार्यक्रमात संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र यांनी कामेगौडा यांचा उल्लेख केला, ते कशासाठी ओळखले जातात?
अ) सेंद्रिय शेती
ब) ग्राम विकास
क) पावसाच्या पाण्याचे संधारण
ड) आदर्श पशुपालन

उत्तरे
१. ब
२. अ
३. ड
४. ड
५. क
६. ब
७. ब
८. ड
९. ड
१०. अ
११. क
१२. अ
१३. ब
१४. ब
१५. अ
१६. ड
१७. ब
१८. क
१९. अ
२०. क

संबंधित बातम्या