स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

विष्णू फुलेवार
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

१. कोणत्या देशांना ‘फिडे ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड २०२०’ स्पर्धेचा संयुक्त विजेते घोषित केले?
अ) अमेरिका, रशिया
ब) भारत, अमेरिका
क) रशिया, जपान
ड) भारत, रशिया

२. कोणत्या शहरातल्या बंदरावर प्लॅस्टिकचा कचरा हाताळण्यासाठी एक सुविधा ऑगस्ट महिन्यात कार्यरत करण्यात आली?
अ) मुंबई
ब) कोची
क) पणजी
ड) विशाखपट्टणम

३. कोणत्या देशाने ‘झार बॉम्ब’ तयार केला?
अ) रशिया
ब) बेल्जियम
क) जपान
ड) चीन

४. कोणत्या देशाबरोबर आसाम सरकारचा राज्यात कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्यासंबंधी सामंजस्य करार झाला?
अ) म्यानमार
ब) व्हिएतनाम
क) सिंगापूर
ड) चीन

५. कोणत्या राज्य सरकारने ‘प्रतीक्षा’ नामक पहिली सागरी रुग्णवाहिका कार्यरत केली?
अ) केरळ
ब) तामिळनाडू
क) कर्नाटक
ड) महाराष्ट्र

६. कोणत्या दिवशी भारतात ‘राष्ट्रीय क्रिडा दिन’ साजरा केला जातो?
अ) २२ ऑगस्ट
ब) २५ ऑगस्ट
क) २९ ऑगस्ट
ड) ३१ ऑगस्ट

७. भारतीय स्टेट बँकेचे (SBI) नवे अध्यक्ष म्हणून बॅंक बोर्ड ब्यूरो कडून कोणाच्या नावाची शिफारस करण्यात आली?
अ) चाला श्रीनिवासुलु सेट्टी
ब) दिनेश कुमार खारा
क) रजनीश कुमार
ड) अरिजित बसू

८. कोणत्या संस्थेला ‘राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार २०२०’ देऊन सन्मानित करण्यात आले?
अ) सेवा क्रिडा नियंत्रण मंडळ
ब) हवाई दल क्रिडा नियंत्रण मंडळ
क) भारतीय नौदल क्रिडा नियंत्रण मंडळ
ड) अखिल भारतीय पोलीस क्रिडा नियंत्रण मंडळ

९. कोणत्या संस्थेने त्यांच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्‍यांसाठी ‘पेंशन कॉर्नर’ नावाचे मोबाइल अॅप तयार केले?
अ) गुप्तचर विभाग
ब) सीमा सुरक्षा दल
क) भारतीय तटरक्षक दल
ड) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल

१०. कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिन’ साजरा केला जातो?
अ) १४ ऑगस्ट
ब) १५ ऑगस्ट
क) २५ ऑगस्ट
ड) २९ ऑगस्ट
 

११. ‘बेल्जियम ग्रँड प्रिक्स २०२०’ ही एफ-वन शर्यत कोणी जिंकली?
अ) वाल्टेरी बोटास
ब) लेविस हॅमिल्टन
क) मॅक्स व्हर्स्टापेन
ड) डॅनियल रिकार्डो

१२. कोणती कंपनी रोबोबँक संस्थेच्या शीर्ष २० दुग्ध कंपन्यांच्या वैश्विक यादीमध्ये समाविष्ट केली गेलेली पहिली भारतीय दुग्ध कंपनी आहे?
अ) नंदिनी मिल्क
ब) मदर डेअरी
क) अमूल
ड) वर्का मिल्क

१३. कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली अर्थ मंत्र्यांची आठवी पूर्व आशिया शिखर परिषद पार पडली?
अ) व्हिएतनाम
ब) थायलंड
क) भारत
ड) सिंगापूर

१४. कोणत्या राज्य सरकारच्यावतीने ‘एनआरआय युनिफाइड’ संकेतस्थळ कार्यरत करण्यात आले?
अ) पंजाब
ब) हरयाणा
क) उत्तरप्रदेश
ड) दिल्ली

१५. कोणत्या शहरात राष्ट्रीय उर्दू भाषा प्रसार परिषदेच्यावतीने ‘जागतिक उर्दू परिषदे’चे आयोजन करण्यात आले?
अ) कानपूर
ब) नवी दिल्ली
क) लखनौ
ड) मेरठ

१६. कोणत्या मंत्रालयाच्यावतीने ‘नॅशनल GIS-अनेबल्ड लँड बँक सिस्टम’ याचा ई-शुभारंभ करण्यात आला?
अ) वाणिज्य व उद्योग मंत्रालय
ब) रेल्वे मंत्रालय
क) अर्थमंत्रालय
ड) संरक्षण मंत्रालय

१७. नॅशनल सिक्युरिटी चॅलेंजेस: यंग स्कॉलर्स पर्स्पेक्टिव्ह या शीर्षकाचे पुस्तक _____ यांच्या जीवनावर लिहिलेले आहे.
अ) जनरल जगजित सिंग अरोरा
ब) लेफ्टनंट जनरल जी. जी. बेवूर
क) फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ
ड) मनोज मुकुंद नरावणे

१८. कोणत्या सरकारने ‘स्वस्थ शरीर, स्वस्थ मन’ मोहिमेला सुरुवात केली?
अ) कर्नाटक
ब) केरळ
क) मध्यप्रदेश
ड) दिल्ली

१९. कोणत्या मंत्रालयाने ‘चुनौती’ नामक स्पर्धेची सुरुवात केली?
अ) दळणवळण मंत्रालय
ब) सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
क) इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
ड) विधी व न्याय मंत्रालय

२०. संस्कृती मंत्रालयाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) या संस्थेच्या किती नवीन क्षेत्रांची नावे जाहीर केली?
अ) ५
ब) ६
क) ७
ड) ८

उत्तरे
१. ड
२. ब
३. अ
४. क
५. अ
६. क
७. ब
८. ब
९. ड
१०. ड
११. ब
१२. क
१३. अ
१४. क
१५. ब
१६. अ
१७. क
१८. ड
१९. क
२०. क

संबंधित बातम्या