स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

विष्णू फुलेवार
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

१. इस्राईल व्यतिरिक्त कोणत्या दोन आखाती देशांनी अमेरिकेच्या पुढाकाराने अब्राहम शांती करारावर स्वाक्षरी केली?
अ) सौदी अरब, बाहरीन
ब) बाहरीन, संयुक्त अरब अमिराती
क) कतार, संयुक्त अरब अमिराती
ड) संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया

२. कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये कार्यकारी संचालक पदावर समीर कुमार खरे यांची नियुक्ती करण्यात आली?
अ) नवीन विकास बँक
ब) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
क) आशियाई विकास बँक
ड) आफ्रिका विकास बँक

३. ‘बँकिंग नियमन (दुरुस्ती) विधेयक-२०२०’ कशासंदर्भात आहे?
अ) सहकारी बँकांची पुनर्रचना
ब) ‘बँकिंग कंपनी अधिनियम-१९४९’ यामध्ये दुरुस्ती
क) भारतीय स्टेट बँकेला अधिकार
ड) ‘भारतीय स्टेट बँक अधिनियम-१९५५’ यामध्ये दुरुस्ती

४. या वर्षासाठी म्हणजे २०२० ची ‘आंतरराष्ट्रीय लोकशाही दिना’ची संकल्पना काय आहे?
अ) पार्टिसिपेशन
ब) कोविड-१९: ए स्पॉटलाइट ऑन डेमॉक्रसी
क) डेमॉक्रसी अंडर स्ट्रेन: सोल्युशन्स फॉर ए चेंजिंग वर्ल्ड
ड) कोविड-१९: फाइट अगेन्स्ट द व्हायरस

५. भारत सरकारने _____ यासाठी एक स्मारक टपाल तिकीट प्रसिद्ध केले.
अ) चंद्रयान कार्यक्रम
ब) अॅस्ट्रोसॅट
क) मार्स ऑर्बिटर मिशन
ड) मिशन शक्ती

६. मेकेदाटू प्रकल्पामुळे _____ या राज्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे.
अ) कर्नाटक आणि महाराष्ट्र
ब) आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू
क) तामिळनाडू आणि कर्नाटक
ड) महाराष्ट्र आणि गोवा

७. कोणत्या ग्रहावर ‘फॉस्फिन वायू’चा शोध लागला आहे?
अ) शनी
ब) शुक्र
क) गुरू
ड) मंगळ

८. जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक पदावर कोणाची नेमणूक झाली?
अ) राजेश खुल्लर
ब) समीर कुमार खरे
क) धनेंद्र कुमार
ड) अपर्णा सुब्रमणी

९. कोणता देश आशिया-प्रशांत प्रदेशासाठी ‘युनायटेड नेशन कमिशन ऑफ ऑन स्टेटस ऑफ वूमन’ (CSW) या संस्थेचा नवा सदस्य आहे?
अ) चीन
ब) अफगाणिस्तान
क) इस्राईल
ड) भारत

१०. ‘यू.एस. ओपन २०२०’ या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरी गटाचे विजेतेपद कोणी जिंकले?
अ) व्हिक्टोरिया अझरेंका
ब) नाओमी ओसाका
क) बियान्का अँड्रिसकू
 
ड) अॅशले बार्टी

११. संसदेत ‘राष्ट्रीय होमिओपॅथी आयोग विधेयक-२०२०’ संमत झाले. विधेयक कोणत्या बाबीशी संबंधित आहे?
अ) इंडियन मेडिसिन सेंट्रल काउन्सिल अधिनियम-१९७० याची जागा घेणार
ब) भारतीय वैद्यकीय प्रणालीसाठी एका राष्ट्रीय आयोगाची स्थापन करणे
क) होमिओपॅथी सेंट्रल काउन्सिल अधिनियम-१९७३ याची जागा घेणार
ड) होमिओपॅथी सेंट्रल काउन्सिल अधिनियम-२०१८ याची जागा घेणार

१२. ‘निष्ठा/NISHTHA’ हे कशासंबंधी आहे?
अ) क्रीडा कार्यक्रम
ब) योगा शिक्षण उपक्रम
क) आरोग्यविषयक कार्यक्रम
ड) एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम

१३. कोणती वस्तू जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून काढून टाकण्यासाठी ‘अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक, २०२०’ तयार करण्यात आले आहे?
अ) तृणधान्ये आणि डाळी
ब) टोमॅटो
क) फळे
ड) दुग्ध उत्पादने

१४. ‘प्रोजेक्ट १७ ए’ अंतर्गत तयार करण्यात आलेले भारताचे पुढच्या पिढीचे लढाऊ जहाज _____ या ठिकाणी तयार करण्यात आले.
अ) गोवा शिपयार्ड लिमिटेड
ब) कोचीन शिपयार्ड
क) माझगाव डॉक
ड) हिंदुस्थान शिपयार्ड

१५. कोणत्या व्यक्तीची राज्यसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली?
अ) मनोज झा
ब) हरिवंश नारायण सिंग
क) पी. जे. कुरियन
ड) पियुष वेदप्रकाश गोयल

१६. कोणत्या मंत्रालयाने लोकसभेत ‘शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक, २०२०’ सादर केले?
अ) वाणिज्य व उद्योग मंत्रालय
ब) ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय
क) अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय
ड) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय

१७. सप्टेंबर महिन्यात _____ या देशात अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यामध्ये ऐतिहासिक शांती चर्चा झाली.
अ) संयुक्त अरब अमिराती
ब) बाहरीन
क) कतार
ड) सौदी अरेबिया

१८. कोणत्या देशाला भारताने सप्टेंबर महिन्यात आपत्ती निवारणासंबंधी मदत सामग्री पोचवली?
अ) बांगलादेश
ब) नेपाळ
क) भूतान
ड) श्रीलंका

१९. कोणत्या राज्य सरकारने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (MSME) विकासासाठी भारतीय लघु उद्योग विकास बँकेबरोबर (SIDBI) भागीदारी करार केला?
अ) राजस्थान
ब) पंजाब
क) मध्यप्रदेश
ड) उत्तरप्रदेश

२०. कोणत्या संस्थेने ‘सेंट्रल बँक डिजिटल करन्सीज’ (CBDCs) तपासणी मंच’ तयार केला?
अ) व्हिसा
ब) पेटीएम
क) मास्टरकार्ड
ड) पेपल

उत्तरे
१. ब
२. क
३. अ
४. ब
५. ड
६. क
७. ब
८. अ
९. ड
१०. ब
११. क
१२. ड
१३. अ
१४. क
१५. ब
१६. ड
१७. क
१८. ब
१९. अ
२०.

संबंधित बातम्या