स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

विष्णू फुलेवार
सोमवार, 28 डिसेंबर 2020

स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

१. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या नव्या डिजिटल पेमेंट अ‍ॅपचे नाव काय आहे?
अ) पोस्ट पेमेंट्स
ब) डाकपे
क) पोस्टपे
ड) डॉकपे

२. प्रजासत्ताकदिन २०२१ सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण असणार आहेत?
अ) थेरेसा मे
ब) निकोल स्टर्जन
क) बोरिस जॉन्सन
ड) निगेल फॅरेज

३. कोणते वर्ष ‘शाश्वत विकासासाठी रचनात्मक अर्थव्यवस्थेचे आंतरराष्ट्रीय वर्ष’ म्हणून पाळले जाणार आहे?
अ) २०१९
ब) २०२०
क) २०२१
ड) २०२२

४. भारतीय रिझर्व्ह बँक स्वयंचलित बँक नोट प्रोसेसिंग सेंटर (ABPC)ची स्थापना कोणत्या शहरात करणार आहे?
अ) अहमदाबाद
ब) जयपूर
क) मुंबई
ड) हैदराबाद

५. ‘प्रोजेक्ट १७ए’ अंतर्गत गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड (GRSE) निर्मित ‘हिमगिरी’ कोणत्या प्रकारचे जहाज आहे?
अ) युद्धनौका
ब) विनाशिका
क) कार्वेट
ड) क्रूझर

६. कोणत्या देशाने चंद्रावरून नमुने पृथ्वीवर आणलेले नाहीत?
अ) अमेरिका
ब) रशिया
क) चीन
ड) जपान

७. कोणत्या व्यक्तीच्या जयंतीनिमित्त ‘आंतरराष्ट्रीय भारती महोत्सव २०२०’ आयोजित करण्यात आला?
अ) सुब्रमण्य भारती
ब) तिरुवल्लुवर
क) बी. आर. पंथुलू
ड) थंगाम्मल भारती

८. कोणत्या संस्थेने भारताचा पहिला ‘LGBT+ कार्यस्थळ समानता निर्देशांक’ जाहीर केला?
अ) अभिव्यक्ती फाउंडेशन
ब) केशव सुरी फाउंडेशन
क) इंडिया यूथ फाउंडेशन
ड) द वायपी फाउंडेशन

९. कोणत्या राज्यात ‘२०२३ FIH पुरुष हॉकी विश्वचषक’ स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत?
अ) कर्नाटक
ब) राजस्थान
क) ओडिशा
ड) उत्तरप्रदेश

१०. कोणती कंपनी ‘प्रोजेक्ट लून’ राबवित आहे?
अ) गूगल
ब) मायक्रोसॉफ्ट
क) ॲमेझॉन
ड) स्पेसएक्स

११. कोणत्या प्रदेशात बेडकाची ‘मिरिस्टीका स्वॉम्प ट्री फ्रॉग’ ही जात आढळली?
अ) पूर्व घाट
ब) पश्चिम घाट
क) अंदमान
ड) ईशान्य भारत

१२. कोणत्या मंत्रालयाने ‘राज्यांना भांडवली खर्चासाठी विशेष साहाय्य’ (SASCE) योजना जाहीर केली?
अ) अल्पसंख्याक कामकाज मंत्रालय
ब) जलशक्ती मंत्रालय
क) सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
ड) वित्त मंत्रालय

१३. कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन’ साजरा करतात?
अ) १४ डिसेंबर
ब) १५ डिसेंबर
क) ९ डिसेंबर
ड) ११ डिसेंबर

१४. कोणत्या संस्थेने ‘व्हिजन २०३५: भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेचे निरीक्षण’ या शीर्षकाखाली एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली?
अ) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय
ब) युनेस्को इंडिया
क) नीती आयोग
ड) मायक्रोसॉफ्ट

१५. कोणत्या देशाने एका राजनैतिक पोहोच कार्यक्रमाच्या रूपाने ‘सिनेमास्कोप/CinemaScope’ उपक्रमाचा प्रारंभ केला?
अ) रशिया
ब) भारत
क) किर्गिजस्तान
ड) दक्षिण कोरिया

१६. कोणत्या राज्य सरकारने अपंगांना सहाय्यक उपकरणे वाटप करण्याच्या उद्देशाने ‘महाशरद’ या नावाने एका डिजिटल मंचाचा शुभारंभ केला?
अ) तामिळनाडू
ब) बिहार
क) कर्नाटक
ड) महाराष्ट्र

१७. कोणत्या कंपनीने भारताची पहिली स्वदेशी mRNA लस विकसित केली?
अ) जेनोवा
ब) बायोएनटेक
क) फायझर
ड) सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया

१८. कोणत्या संस्थेने ‘ई-अ‍ॅग्रीकल्चरल मार्केट्स लिमिटेड’ नामक एका इलेक्ट्रॉनिक स्पॉट मंचाची घोषणा केली?
अ) नाबार्ड
ब) एनएसई
क) बीएसई
ड) एसबीआय

१९. कोणती व्यक्ती भूदल, नौदल आणि हवाई दलात सेवा दिलेली एकमेव भारतीय आहे?
अ) के. एम. करिअप्पा
ब) सॅम मानेकशॉ
क) अर्जन सिंह
ड) कर्नल पृथ्वीपालसिंग गिल

२०. ‘रॉसबाय वेव्ह’ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
अ) ताऱ्याचा मृत्यू
ब) ध्वनी
क) ग्रहाचे वातावरण आणि महासागर
ड) कृष्ण विवर

उत्तरे
१. ब
२. क
३. क
४. ब
५. अ
६. ड
७. अ
८. ब
९. क
१०. अ
११. ब
१२. ड
१३. अ
१४. क
१५. ब
१६. ड
१७. अ
१८. क
१९. ड
२०. क.

संबंधित बातम्या