कोटेबल कोट्‌स

इरावती बारसोडे
मंगळवार, 21 जुलै 2020

कोटेबल कोट्‌स

आशावाद ही श्रद्धा आहे, जी आपल्याला यशापर्यंत पोचवते.
- हेलन केलर

संयम हा सद्‍गुण आहे आणि मी संयम शिकतो आहे. संयम राखणे खूप अवघड आहे.
- इलॉन मस्क

आयुष्याच्या कालावधीपेक्षा तुम्ही ते कसे जगलात हे महत्त्वाचे असते.
- मार्टिन ल्युथर किंग

एक टेकडी सर केल्यानंतर लक्षात येते, की आणखी अशा अनेक टेकड्या आपल्याला चढायच्या आहेत.
- नेल्सन मंडेला

कालचा दिवस परत मिळवणे आपल्याला शक्य नाही, पण उद्याचा दिवस जिंकायचा की हारायचा हे आपल्या हातात असते.
- लिंडन बी. जॉन्सन

यश हा अंतिम टप्पा नसतो, अपयश हे प्राणघातक नसते; पुढे जात राहणे यातच खरे धाडस आहे.
- विन्स्टन चर्चिल

संबंधित बातम्या