कोटेबल कोट्‌स

विचारवंत
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

कोटेबल कोट्‌स
 

गरज ही शोधाची जननी आहे, असे मला वाटत नाही. शोध हे कष्ट वाचवण्यासाठी निष्क्रियता, आळशीपणा यातून निर्माण होतात.
- ॲगाथा ख्रिस्ती

जिथे मानवतेच्या मोठेपणाचा प्रश्‍न असतो, तिथे तडजोड करून चालत नाही.
- अँजेला मार्केल

तुम्हाला अपयशाचा सामना करता आला, त्या अपयशाचे व्यवस्थापन करता आले आणि अपयशानंतरही पुन्हा यश मिळवता आले, तर त्याला उद्योजकता म्हणतात. 
- किरण मुजुमदार शॉ

तुम्हाला समोरच्यांचे म्हणणे पटत नसते आणि तरीही तुम्ही जेव्हा त्यांचे म्हणणे ऐकता आणि त्यांच्याशी संवाद साधता, तेव्हाच बदल घडतो. 
- डॉ. जेन गुडॉल

बदल घडविण्यासाठी तुमच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या असाव्या लागतात.
- रोशनी नदार मल्होत्रा, सीईओ, एचसीएल एन्टरप्राईझ

माझे कुटुंब ज्यू धर्मीय आहे, बौद्ध आहे, बाप्तिस्ट आहे आणि कॅथॉलिकपण आहे. माझा मानवनिर्मित धर्मांवर विश्‍वास नाही.
- व्हूपी गोल्डबर्ग, अभिनेत्री

तुमच्या बोलण्याचा अर्थच लोकांना कळत नसेल, तर बोलण्याचा उपयोग काय?
- झोरा नील हर्सटन, लेखक
 

संबंधित बातम्या