कोटेबल कोट्‌स

विचारवंत
रविवार, 7 जून 2020

कोटेबल कोट्‌स
 

सकारात्मक राहणे महत्त्वाचे आहे. मी स्वतःला नेहमी सांगते, इतर लोक करू शकत असतील तर मीही करू शकते. मी स्वतःला सांगत राहते, आपल्याला हे करता येणार आहे.
- एम. सी. मेरी कोम

लोकांची निवड करताना शहाणपणाने करावी,  कारण हे लोक तुम्हाला प्रेरणा तरी देतात किंवा 
नाउमेद करतात.
- हान्स हासेन, डॅनिश चित्रकार

गुलाबाच्या झाडाला काटे आहेत म्हणून आपण तक्रार 
करू शकतो किंवा काट्यांना गुलाब आहेत 
याचा आनंद घेऊ शकतो.
- अल्फोन्स कार, फ्रेंच लेखक

एखादा माणूस फक्त त्याचा दृष्टिकोन बदलून स्वतःचे आयुष्य बदलू शकतो, हाच आत्तापर्यंतचा सर्वात मोठा शोध आहे.
- ओपरा विन्फ्रे

मी हे करू शकतो, असे म्हणणे हीच पहिली पायरी आहे.
- विल स्मिथ, अभिनेता

अडथळा आणि संधी यामध्ये फरक काय आहे? आपला त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. प्रत्येक संधीमध्ये अडचण असते आणि प्रत्येक अडचणीमध्ये संधी असते.
- जे. सिडलॉ ब्रॅक्स्टर

संबंधित बातम्या