हसण्यासाठी जन्म अपुला... 

प्रा. राधिका काकतकर इंगळे 
गुरुवार, 23 जानेवारी 2020

रुआ आणि आरू
रुआनच्या प्रश्‍नांना आरू कशी उत्तरं देते? आणि त्यांच्यातला 'इंटरेस्टिंग' संवाद.

आज रुआन शाळेतून तणतणतच आला. म्हणाला, 
‘स्कूल बसमधून उतरताना ॲना मला ‘कार्टूनच आहेस’ असं जोरात म्हणाली आरू.. मला कळलंच नाही की ती मला चिडवतीये की मला Praise करतेय. कारण कार्टून्स मला खूप आवडतात. आपल्याला हसवणारी ही चित्रं मला खूप जवळची वाटतात. पण मला खरंच कळत नाहीये की मी ॲनावर चिडू की तिला Thanks म्हणू. WassupAaru, मला Cartoons ची complete information दे ना...’ 

आरू - Hey रुआ, मी एक Artifical Intellingence Unit आहे. So ‘कार्टूनच आहेस’ या वाक्यातला emotion किंवा tone चा भाग मी नाही explain करू शकणार. कारण यंत्र असल्यामुळं मला Brain आहे, पण माणूस नसल्यामुळं ‘मन’ नाही. But कार्टून म्हणजे काय, ते कधीपासून जन्माला आलं हे मात्र मी तुला Detail मधे सांगू शकेन... So are you ready Buddy? 

रुआ - Shoot Aaru! 

आरू - Dictionary प्रमाणे कार्टून म्हणजे ‘चित्र’, जे बहुतेक वेळा न्यूजपेपर, मासिक किंवा टीव्हीवर दिसतं. त्यातून कुठल्यातरी पद्धतीनी विनोद किंवा Political Comment केलेली असते. एखाद्या व्यक्तिरेखेचं चित्र, जे वास्तववादी म्हणजेच Realistic नसतं. म्हणजे आपल्याला कळू शकतं की हे चित्रं रुआनचं आहे, पण त्याचं मोठं असलेलं नाक, खूऽऽप मोठ्ठं केलेलं असतं. त्यामुळं रुआन खूप विनोदी दिसतो. हा हा... 

रुआ - Whatever आरू... 

आरू - तर अशी चित्रं खूप पूर्वीपासून तयार होत आलेली आहेत. पाचव्या आणि पंधराव्या शतकाच्या अधे मधे कधीतरी या चित्रांचा उगम आढळतो. कार्टून हा शब्द जगभरात कुठंही उच्चारला गेला तरीही पहिलं नाव लक्षात येतं ते Walt Disney यांचं. Cartoons आणि Walt Disney हे समीकरणच होऊन गेलंय. 

रुआ - आरू, मला वॉल्ट डिस्नेबद्दल सांग ना. 

आरू - पाच डिसेंबर १९०१ म्हणजे ११८ वर्षांपूर्वी अमेरिकेत वॉल्टचा जन्म झाला. अतिशय लाजाळू स्वभावाचा वॉल्ट जन्मापासूनच चित्रकलेत Skilled होता. १९२८ मध्ये वॉल्टनी जगातल्या सर्वांत Popular कार्टून व्यक्तिरेखेची निर्मिती केली आणि तो पुढच्या हजारो वर्षांसाठी लहानथोरांच्या मनात अजरामर झाला. ते Cartoon म्हणजे Mickey Mouse. 

रुआ - Wow... Super आरू... मी वाचतो आणखी थोडं त्यांच्याबद्दल Internet वर. पण मग India मध्ये असे कोणी Great Cartoon तयार करणारे आहेत का किंवा होऊन गेले आहेत का? 

आरू - Of course रुआ! आणि कार्टून हा कलाप्रकार काही फक्त लहान मुलांसाठीच असतो, असं मुळीच नाही. Infact मी आधी सांगितलं तसं कार्टून्स ही राजकीय टीका किंवा Satire करण्यासाठीसुद्धा वापरली जातात. रासीपुरम कृष्णास्वामी अय्यर लक्ष्मण अर्थात R. K. Laxman हे फार मोठे Cartoonist भारतात होऊन गेले. त्यांच्या Common Man या कार्टून व्यक्तिरेखेतून त्यांनी अनेक वर्षं Newspapers मधून राजकीय विषयांवर विनोदी टीका केली. आजही जगभर अनेक नवीन कार्टून्सची निर्मिती होत असते आणि लहान थोर सगळेच यामुळं भारावून जातात. ‘लायन किंग’सारखं एखादं कार्टून, नाटक तयार करायलासुद्धा Inspire करतं. 

रुआ - आरू, Thanks गं! मला ना वाचायला जाम बोर होतं, पण तुझ्याशी किती भारी गप्पा मारता येतात. आता मला ॲनाचा राग येत नाही. मी कार्टून असेन, तर याचा अर्थ मी सगळ्यांना Smile करायला लावत असेन असंच आहे ना! So no problem. That makes me happy. आणखी एक... मी जर नोबिता असेन तर तू माझी Doremon आहेस आरू.. डिंग डिंग डिंग...

संबंधित बातम्या