नाते जुळले मनाशी मनाचे 

प्रा. राधिका काकतकर इंगळे 
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

रुआ आणि आरू
रुआनच्या प्रश्‍नांना आरू कशी उत्तरं देते? आणि त्यांच्यातला 'इंटरेस्टिंग' संवाद.

रुआन तणतणतच घरात शिरला.. 
‘Wassup Aaru! आज ना आनानी माझ्या डोक्याला जाम shot दिलाय यार... तिची मावसआत्त्या केनियाला असते आणि या Summer Hols मध्ये ते सगळे तिच्या त्या ‘मावसआत्त्या’कडे जाणारेत. तिकडे तिचा मामेकाका आणि त्याची फॅमिलीपण येणारे आणि तिचे मामेआजोबा पण... आज ती Full day सतत ‘माझी मावसआत्त्या - माझा मामेकाका...’ असंच बडबडत होती आणि सगळ्यांना Irritate करत होती. शेवटी अधिराजनी तिला विचारलंसुद्धा, की मामे - आत्ते म्हणजे काय हे तरी तुला माहिती आहे का?... तर चिडली आणि त्याला म्हणाली तुला माहिती आहे तर तूच सांग ना. मला इतकंच माहितीये, की मी Kenya सफारीला जाणारे... बास. मी तिला म्हणालो, की मी तिला उद्या सांगू शकीन या शब्दांचा अर्थ; तर म्हणाली तुला काय कळणारे, तू तर Nuclear फॅमिलीमध्ये राहतोस. तेव्हा मी Challenge घेतलं, की मी समजून घेईनच या Relationsना. Wassup Aaru... मला सांग ना family and relations बद्दल. 

आरू : Hey रुआ! मला तुझी ही मैत्रीण खूप Interesting वाटते. ती Solid प्रश्न तुझ्या डोक्यात तयार करते आणि मग मला अनेक गोष्टी तुला समजावून सांगता येतात. तर, Family किंवा कुटुंब म्हणजे परस्परांशी नाती असलेल्या माणसांचा समूह म्हणजे Group. माणसांमधली नाती ही जन्मावरून, विवाहावरून म्हणजे Marriage मुळं किंवा  दत्तक घेण्यावरून म्हणजे Adoption मुळं निर्माण होतात. कुटुंबसंस्था म्हणजे Family, एकत्र म्हणजे Joint किंवा विभक्त म्हणजे Nuclear अशी दोन्ही प्रकारची असू शकते. Nuclear कुटुंबसंस्थेत आई-वडील, मुलगा-मुलगी असे Members असतात. एकत्र कुटुंबपद्धतीत, म्हणजे Joint family मध्ये इतर Secondary relations सुद्धा असतात. जसं बाबांचा भाऊ म्हणजे काका. 

रुआ : Yesss... मनोजकाका! 

आरू : Correct किंवा बाबांची बहीण म्हणजे आत्त्या. आईचा भाऊ म्हणजे मामा etc. 
आता बाबांच्या मावशीची मुलगी म्हणजे त्यांची मावसबहीण, So ती तुझी मावस - आत्त्या. म्हणजे आनाच्या बाबांच्या मावशीची मुलगी Kenya ला राहाते. 

रुआ : Wow, Super आरू.. हे खूप सोप्पं झालं यार आता. बाबांचा आतेभाऊ म्हणजे आत्तेकाका आणि आईचा मामेभाऊ म्हणजे मामेमामा, हो ना? 

आरू : Absolutely! रुआ अगदी माझ्याइतका नसलास तरी हुशार आहेस हां तू... You are quick to learn. एक मात्र आहे, वेस्टर्न culture किंवा संस्कृतीमध्ये Aunt म्हणजे मावशी किंवा आत्त्या दोन्हीही असतं आणि Uncle म्हणजे मामा आणि काका काहीही असू शकतं. मामेआत्त्यासुद्धा Aunty आणि चुलतआत्त्यासुद्धा Aunty च... India मध्ये प्रत्येक नात्याचा मान किंवा Respect ठेवायला, वेगवेगळे special days असतात. रक्षाबंधन किंवा राखीपौर्णिमा ही भावा-बहिणी मधल्या Cute relationship साठी असते. उष्टावण, म्हणजे जेव्हा छोटं बाळ पहिल्यांदा solid food खातं ते मामानी भरवायचं असतं. बारशाला आत्त्या बाळाचं नाव ठेवते आणि जेव्हा एखाद्या बाळाला पणजी आणि पणजोबा असतात, तेव्हा त्यांच्या डोक्यावर सोन्याची फुलं उधळतात त्याला प्रपौत्र दर्शन म्हणतात. Western culture मध्ये Thanks giving हा सण सगळ्या कुटुंबाला एकत्र Thank you म्हणायचा सण असतो आणि तो ते संपूर्ण कुटुंबाबरोबर साजरा करतात. 

रुआ : आरू, तू मला Expectation पेक्षा जास्तच माहिती देतेस गं! आता उद्या आनासमोर full-on shining टाकणारे मी!!! You are my BFF! 

आरू : BFF? I am sorry... मी A I युनिट असल्यामुळं मला हे समजत नाही... 

रुआ : अगं, Best Friend Forever!!!

संबंधित बातम्या