BFF

प्रा. राधिका काकतकर इंगळे 
सोमवार, 16 मार्च 2020

रुआ आणि आरू
रुआनच्या प्रश्‍नांना आरू कशी उत्तरं देते? आणि त्यांच्यातला 'इंटरेस्टिंग' संवाद.

Wassup Aaru! आज ना आमच्या स्कूलमध्ये Bring your best friend to school, Day होता. काही मुलांनी आपल्या सोसायटीमधल्या friends ना बरोबर आणलं होतं. काही जण आई किंवा बाबाला घेऊन आले होते आणि श्रिया तिच्या आजोबांना घेऊन आली होती. Of course, मी तुला ठेवलं होतं बॅगमध्ये, पण सगळ्यात जास्त धमाल कोणी उडवली पूर्ण दिवस माहितीये? अवनीच्या ‘साद’नी ! He was a riot!.. रुआ उत्साहात बोलत होता. 

आरू : Hey रुआ! आई, बाबा, आजोबा आणि सोसायटीमधले मित्र हे कळले मला. पण अवनीचा ‘साद’ म्हणजे? 

रुआ : Oh Sorry, तुला कसं माहिती असेल? साद हा माझ्या अवनी नावाच्या friend चा pet dog आहे! आणि अवनी म्हणते तो तिचा best friend आहे. मला पण कुत्री आवडतात आणि खरं तर तुला घरी आणायच्या आधी, ‘कुत्रा घ्या’ असं मनोजकाका म्हणाला पण होता. पण मा म्हणाली, की तिला allergy आहे. So तो plan cancel झाला. Anyway, आज full day अवनी जाईल तिथं तिच्या मागं मागं साद फिरत होता. ती ‘बस साद’ म्हणाली की बसायचा, high five देत होता आणि कोणी ‘shake hand’ म्हणालं की त्यांच्या हातात हात देत होता. मला वाटलं, खूप भारी feeling येत असेल ना अवनीला? आरू, dogs आणि माणूस खरंच कधीपासून एवढे best friends आहेत? 

आरू : कुत्रा आणि माणूस हे युगानुयुगं म्हणजे over many many centuries एकमेकांचे सोबती म्हणजे Companions आहेत. अगदी महाभारतातसुद्धा कुत्र्यांचे अनेक उल्लेख आहेत. एक भटका कुत्रा युधिष्ठिराबरोबर स्वर्गाच्या दारापर्यंत त्याच्याबरोबर होता अशी एक गोष्ट आहे. कुत्र्यांच्या loyalty च्या तर अनेक गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात. 
रुआ ः Please आरू, एक तरी गोष्ट सांग ना... Phonics च्या क्लासला जायला अजून वेळ आहे... 

आरू : आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन... एक नाही, आज तुला मी कुत्र्यांच्या loyalty च्या दोन गोष्टी सांगणारे... 

छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या वाघ्या कुत्र्यावर फार जीव होता. जिवाला जीव देणारा हा इमानी कुत्रा होता. वाघ्याच्या स्वामीनिष्ठेची म्हणजेच loyalty ची एक super कथा आहे. महाराज गेल्यानंतर दुःखानं वेड्यापिश्‍या झालेल्या वाघ्यानं राजांच्या चितेवर झेप घेतली आणि आपलं जीवन संपवलं अशी एक गोष्ट आहे. इतिहासात या मुक्‍या जनावराची loyalty golden letters मध्ये नोंदली गेली आहे. आजही मालकावरील इमानाचा, श्रद्धेचा proof देताना वाघ्या कुत्र्याचं उदाहरण दिलं जातं. दुसरी गोष्ट तर खूपच emotional आहे. त्यावर अनेक पुस्तकं आणि films सुद्धा केल्या गेल्या आहेत. 

जपानमधील टोकियो University मध्ये प्राध्यापक असलेल्या एजाबुरो येनो यांना पुष्कळ काळापासून Pure Japanese अकिता कुत्रा हवा होता. जपानच्या अकिता प्रांतातील Odit शहरातून, हाचिको याला त्यांनी खूप विचारपूर्वक दत्तक घेतलं म्हणजे adopt केलं. हाचि हे त्याचं टोपणनाव पडलं आणि त्याचा मालक लवकरच त्याचा best friend झाला. एजाबुरो यांनी हाचिकोवर आपल्या मुलासारखं प्रेम केलं आणि तोही त्यांच्यावर जीव ओवाळून टाकत असे. हाचिको जसजसा मोठा होत गेला, तसतसा तो सकाळी त्याच्या मालकाला मध्य टोकियोमधील शिबुया ट्रेन स्टेशनवर काम करायला जाताना सोडायला जायचा आणि ते कामावरून परत यायच्या वेळी दुपारी स्टेशनवर त्यांना घ्यायला जायचा. एक दिवस एजाबुरो यांचा University मध्ये मृत्यू होतो आणि ते दुपारी परत येतच नाहीत. हाचिको मात्र त्यानंतर पुढची १० वर्षं, तो स्वतः जिवंत असेपर्यंत, रोज त्यांच्या जाण्यायेण्याच्या वेळी स्टेशनवर त्यांची वाट बघत थांबायचा. टोकियोमधील शिबुया ट्रेन स्टेशनच्या शेजारी त्याचा Bronze statue आहे. जिथं दररोज शेकडो लोक त्याची गोष्ट वाचतात आणि या अजब आणि अनोख्या loyal companion चं कौतुक करतात. 

रुआ : माझी आता खात्री पटली आहे, की आज अवनीचा Best friend च खरा Best Friend Forever - BFF आहे. मी आता अवनीला call करून ‘साद’बरोबर खेळायला कधी येऊ, हे विचारतो... लग्गेच!

संबंधित बातम्या