फिरत्या चाकावरती... 

प्रा. राधिका काकतकर इंगळे 
सोमवार, 23 मार्च 2020

रुआ आणि आरू
रुआनच्या प्रश्‍नांना आरू कशी उत्तरं देते? आणि त्यांच्यातला 'इंटरेस्टिंग' संवाद.

रुआ : हे आरू... आज ना एक गम्मत झाली. मी, मा आणि डॅडा डिनरला गेलो होतो ना आत्ता, ते एक खूप छान हॉटेल होतं. नवीन type चं cuisine मिळतं तिकडं सगळं. डॅडाचा वाढदिवस आहे ना आज, so मा नी treat दिली त्याला आणि of course मलासुद्धा. नवीन नवीन खूप पदार्थ खाल्ले आम्ही. वेगवेगळी mocktails आणि juices पण होती. मा आणि डॅडा खूप मजेत होते आणि आम्ही खूप जोक्स करून हसलोसुद्धा. मनोज काका, दीपा काकी आणि ग्रॅमाचा व्हिडिओ कॉलपण आला तिकडं आम्हाला, to wish डॅडा happy birthday. खाऊन पिऊन पोटाला तडस लागली आहे असं ते दोघं म्हणत होते. म्हणजे over eating, हे मला समजावलं त्यांनी. जेवून आम्ही car मध्ये बसलो आणि रोडवर अचानक कारचं tyre puncture झालं. डॅडा एकदम ओरडला ‘अरे yaaaaar!’ आणि त्यांनी car रस्त्याच्या कडेला घेतली. रात्र झाली असल्यामुळं puncture काढायचं एक्कही दुकान उघडं नव्हतं, so डॅडालाच ते काढावं लागणार होतं. भरपेट जेवल्यामुळं खूप त्रास होणार होता स्टेफनी लावायला, म्हणून डॅडाची चिडचिड होत होती आणि मी आणि मा फुटपाथवर उभं राहून बघत होतो आणि हसत होतो. Finally घरी पोचलो, पण येताना मला वाटलं की हे ‘चाक’ किती important आहे ना? चाकाचं invention कोणी केलं असेल?

आरू : Hey रुआ! तुझी puncture ची गोष्ट भारी आहे आणि तुला पडलेला प्रश्नसुद्धा. खरंच चाकाचा शोध सगळ्यात revolutionary होता असं म्हटलं जातं. मानवाच्या इतिहासात जर सगळ्यात important शोध कुठला असेल, तर तो नक्कीच चाकाचा आहे. सुमारे ५,५०० वर्षांपूर्वी मेसोपोटेमिया (आत्ताच्या west Asia चा काही भाग) इथं सर्वप्रथम चाक वापरलं जायचं असं आढळून आलं आहे. मातीची भांडी करण्यासाठी त्याचा सर्वप्रथम वापर केला गेला. उतारावरून घरंगळत खाली येणाऱ्या गोष्टी बघून कदाचित चाकाचा शोध लावावा असं प्राचीन मानवाला वाटलं असेल असा एक समज आहे. अनेकांना वाटतं तसं तुलाही जर असं वाटत असेल, की चाकाचा शोध हा सर्वांत पहिला महत्त्वाचा शोध होता आणि इतर महत्त्वाचे शोध हे त्यानंतर लागले, तर तसं नाही. शेती, भांडी, शिवलेले कपडे, सुई, दोरी, होडी, बासरी अशा कित्येक गोष्टींचा शोध चाकाआधीच लागला होता. चाकाच्या शोधानंतर काही काळ त्याचा वापर हा छोट्या छोट्या गोष्टींसाठी करण्यात आला. ग्रीक लोकांनी एकचाकी ढकलता येणारी गाडी शोधून काढली. पण मोठा बदल हा तेव्हा घडून आला, जेव्हा माणसानं त्याचा वापर travelling साठी सुरू केला. त्यासाठी चाकांना काठीसारख्या गोष्टीला जोडून सुरुवातीची vehicles  तयार करण्यात आली. सुरुवातीच्या काळात चाकाचा उपयोग हा मातीची भांडी करण्यासाठी केला जायचा.

आजही pottery तशीच केली जाते. गाड्यांसाठी चाकाचा वापर हा सगळ्यांत आधी युरोप आणि चीनमध्ये केला गेला. माणसाच्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी अतिशय उपयुक्त असा हा शोध होता. या शोधानं त्याची वस्तू इकडून तिकडं नेण्याची capacity वाढली. त्याच्या हालचाली fast होण्यास सुरुवात झाली आणि future मधले अनेक महत्त्वाचे शोध लागण्याची तयारी झाली. चरख्यासारखी क्रांतिकारक गोष्ट हीसुद्धा एक चाकच आहे आणि महात्मा गांधींमुळं जगभर peace symbol म्हणून या चाकाकडं आदरानं बघितलं जातं.

रुआ : Wow Aaru, केवढी भारी माहिती दिलीस. पण आता मी झोपणारे, कारण उद्या सकाळी माझ्या school bus ची wheels, go round and round म्हणत येतील मला शाळेत न्यायला. Good night!

संबंधित बातम्या