एप्रिल फूल बनाया... 

प्रा. राधिका काकतकर इंगळे 
सोमवार, 6 जुलै 2020

रुआ आणि आरू
रुआनच्या प्रश्‍नांना आरू कशी उत्तरं देते? आणि त्यांच्यातला 'इंटरेस्टिंग' संवाद.

रुआ : Hey आरू! आज मला तुझी मदत हवी आहे कारण माझं ना डोकंच चालत नाहीये. मला आज एखादा भारी prank प्लॅन करायचाय. मला माहितीये या खोड्या काढण्याच्या बाबतीत Ana माझ्यापेक्षा खूप हुशार आहे आणि मला कळणारपण नाही तिनं माझ्यासाठी काय trap plan केलाय ते. पण तरीही मलापण एक full too खोडी प्लॅन करायचीच आहे तिच्यासाठी. 

आरू : Hey रुआ! आना तुझ्यापेक्षा खोडी काढण्यात पटाईत आहे असं म्हणतोयस ते कदाचित खरं असेलही, पण तुम्ही का काढणार आहात एकमेकांच्या खोड्या? तुम्ही best friends आहात ना?

रुआ : Oh! Sorry Sorry, मी तुला सांगितलंच नाही. अगं ३ दिवसांनी Fools day आहे. 1st एप्रिल. सगळे प्लॅन करतायत काहीना काहीतरी. By the way, हे एप्रिल फूल काय आहे आरू? कधीपासून सुरू झालं? मला जरा सांग ना!

आरू : Fools Day? खूपच interesting गोष्ट विचारलीस आज. जगभर सगळेच हा दिवस साजरा करतात, पण नेमका हा दिवस कधी आणि कसा सुरू झाला हे कोणालाही माहीत नसतं. So मी आज तुला सांगते Fools Day ची माहिती. 

प्रत्येक युरोपियन देशाला Pope Gregory 13th यांनी १५८२ मध्ये ज्यूलियन कॅलेंडर सोडून ग्रेगोरियन 

कॅलेंडर वापरण्याच्या orders दिल्या 

होत्या. १ एप्रिलपासून नाही तर १ जानेवारीपासून ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये नवं वर्ष सुरू होतं. हे मानण्यास अनेक लोकांनी नकार दिला, तर काहींना याबद्दल माहितीही नसल्यामुळं ते नववर्ष १ एप्रिललाच साजरे करत राहिले. म्हणून या लोकांना एप्रिल फूल म्हटलं जाऊ लागलं. ही खरी April fool ची सुरुवात.

या दिवसाबाबतीत अनेक कथा आहेत. Greco-Roman प्रांतातील एक सण ‘हिलेरिया’ २५ मार्चला साजरा केला जायचा. हसण्याचा सण असं त्याचं वर्णन होतं. ग्रीक देवांच्या आईला, ‘सायबेल’ला हा सण अर्पण केला जायचा. त्या दिवशी हास्य यात्रा आणि हास्य संमेलनं साजरी व्हायची. पण Gregorian कॅलेंडर वापरायला लागल्यावर हा दिवस १ एप्रिलला साजरा केला जाऊ लागला. 

अनेक देशांत जरी विविध पद्धतींनी हा दिवस साजरा होत असला, तरी एक गोष्ट सगळ्यात समान असते आणि ती म्हणजे खोड्या काढणं आणि खोडी यशस्वी झाली, की जोरात April Fool असं ओरडणं. Ukraine देशात १ एप्रिलला official city holiday असतो. त्या दिवशी सगळ्या देशातील हास्य कलाकार सण साजरा करतात आणि विविध ठिकाणी जत्रा भरवल्या जातात.

एक गमतीची गोष्ट म्हणजे भारतात होळीचा सण १ एप्रिलच्या आसपास येतो आणि त्या दिवशीसुद्धा खोड्या काढणं ही प्रथा आहेच. एकमेकांच्या अंगावर धूळ आणि रंग फेकणं किंवा कुठल्याही नावानं एकमेकांना हाक मारणं अशा खोड्या काढायची आणि त्यावर न चिडण्याची पद्धत आहे. फ्रान्समध्ये ज्याची खोडी काढली जाते आणि ज्याच्यावर हसलं जातं त्याला poisson d’avril म्हणजे ‘April fish’ असं म्हटलं जातं. April fish म्हणजे छोटा मासा, जो सहज जाळ्यात अडकू शकतो. ज्याच्यावरची खोडी successful होते, त्याच्या अंगावर छोटे कागदाचे मासे चिकटवायची पद्धतसुद्धा आहे. अनेक देशांत newspapers किंवा TV channels सुद्धा या गमतीत खोट्या बातम्या छापून भाग घेतात.

अनेक खोड्या काढल्या जातात जगभरात, पण एखाद्याच्या पाठीवर ‘Kick me’ अशी चिठ्ठी, त्याला कळणार नाही अशा पद्धतीनं चिकटवणं, हा कदाचित सगळ्यात common prank असावा. So now you have to decide!

रुआ : Wow Aaru, इतक्या stupidity नं भरलेल्या दिवसामागं पण इतकी history आहे? खूपच भारी! आता मात्र मला काहीतरी भन्नाट idea काढावीच लागणारे. चल मी वरदला फोन करतो आणि त्याचा प्लॅन विचारतो. या वर्षी मी नाहीच होणारे एप्रिल फूल!

  • हा लेख ४ एप्रिलच्या अंकामध्ये (प्रसिद्धीची तारीख २८ मार्च) प्रसिद्ध होणार होता. मात्र, लॉकडाउनमुळे तो अंक प्रसिद्ध न झाल्यामुळे या अंकात हा लेख देत आहोत.

संबंधित बातम्या