संगणक म्हणजे काय गं आरू? 

राधिका इंगळे काकतकर 
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

रुआ आणि आरू   : एंटरटेनमेंट
रुआनच्या प्रश्‍नांना आरू कशी उत्तरं देते? आणि त्यांच्यातला 'इंटरेस्टिंग' संवाद.
प्रा. राधिका काकतकर इंगळे 

रुआन चिंताक्रांत बसला होता.. आरूला बघताच म्हणाला, 

‘WassupAaru! आज मला खरंच एक मोठ्ठा प्रश्न पडलाय. या कोरोनच्या काळात कॉम्प्युटर्स नसते तर? माझी शाळा, मा - डॅडचं ऑफिसचं काम कसं चालू राहिलं असतं? आणि तूही कॉम्प्युटरचाच प्रकार आहेस ना आरू? तू तरी मला कशी भेटली असतीस? हा कॉम्प्युटर तयार करणारा माणूस किती भारी असेल ना? त्या सगळ्या History बद्दल सांग ना मला... 

आरू - Computers! What an invention! संगणक हे आज विविध क्षेत्रामध्ये, विविध प्रकारच्या गोष्टींसाठी वापरले जाणारे यंत्र आहे. एकविसाव्या शतकात संगणकाने मानवाच्या जीवनात Astonishing बदल घडवून आणले आहेत. संगणकाच्या सर्व प्रकारच्या उपयोगात येणाऱ्या गोष्टींची नोंद करणे अशक्य आहे. आपण अगदी महत्त्वाचा उपयोग बघूया. Computer हा शब्द ''Compute'' या इंग्लिश क्रियापदापासून तयार झाला आहे. COMPUTER म्हणजे numbers किंवा counting करणे. ५० वर्षांपूर्वी जेव्हा कॉम्प्युटर हा शब्द प्रचलित झाला, तेव्हा संगणक या यंत्राचा वापर मुख्यतः आकडेमोड करण्यासाठीच केला जात असे, पण दिवसे न् दिवस या यंत्रात अनेक सुधारणा होत गेल्या व अलीकडे संगणकाचा वापर तर अनेक प्रकारे होऊ लागला आहे. उदा. माहिती पाठवणे, तिचे Classification करणे; इतकेच नाही तर ध्वनिनिर्मिती, चित्रीकरण अन्य असंख्य कामांसाठी संगणकाचा वापर होऊ लागला आहे. थोडक्यात सांगायचे, तर संगणक हे Information स्वीकारणारे, दिलेल्या सूचनांनुसार Information process करून अचूक उत्तर देणारे वेगवान इलेक्ट्रॉनिक्स यंत्र आहे. 

रुआ - But who invented it? How did it take birth? त्याचा शोध कोणी लावला आरू? 

आरू - आपल्या Primary education मध्ये आपण Counting शिकलो आहोत. त्याच्यासाठी आजही मणी लावलेल्या पाट्यांचा उपयोग करतात. प्राचीन काळी चीनमध्ये अंक मोजणीसाठी Bambilian संस्कृतीत ‘अबॅकस’ (ABACUS) या यंत्राचा उपयोग केला जात होता. १८७१ मध्ये चार्ल्स बँबेज याच्या गणन यंत्रात आमूलाग्र बदल घडून आले. या यंत्राला Instruction manual पुरविता यायचा. Memory व उत्तरांची छपाई करण्याची सोय ही या यंत्राची वैशिष्ट्ये होती. या यंत्राचे नाव Anolittle engine असे होते. 
In 1880 डॉ. हर्मन होलेरिथ या अमेरिकन शास्त्रज्ञाने punched card system चा शोध लावला. यात कोणतेही काम वेगात पार पडता येऊ लागले. त्यानीच पुढे IBM कंपनी (इंटरनॅशनल बिजनेस मशीन) सुरू केली. १९४७ मध्ये अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठ व आईबीएम या कंपनीने जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक्स संगणक तयार केला. त्याचे नाव Electronics Numerical integrator and calculator असे होते. तेच आजचे संगणक आहे. 

कोणतेही काम असले तरी ते Speedily पार पडावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. संगणक कोणतेही काम सेकंदांच्या भागात करू शकतो, अत्यंत वेगाने करू शकतो आणि बिनचूक करू शकतो हा त्याचा सर्वांत मोठा फायदा आहे. आपण किती ही efficient  असलो तरीही तेच ते काम करण्याचा कंटाळा येऊ शकतो. संगणक हे एक यंत्र असल्याने त्याला एकाच प्रकारचे काम करण्यास कंटाळा येत नाही. संगणकाला कोणतेही काम करण्यासाठी योग्य फोड करून दिल्यास योग्य सूचना आणि काम कोणाच्याही मदतीशिवाय किंवा देखरेखीशिवाय पार पाडतो. 
रुआ - खरंय आरू! आज आपण कॉम्प्युटरशिवाय आपले world imagine करूच शकत नाही. So here I go! Online class!!!

संबंधित बातम्या