स्कूल चले हम ….

राधिका इंगळे
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

रुआ आणि आरू   
रुआनच्या प्रश्‍नांना आरू कशी उत्तरं देते? आणि त्यांच्यातला 'इंटरेस्टिंग' संवाद.
प्रा. राधिका काकतकर इंगळे 

रुआ : (चिडचिड करत) आता परीक्षा पण घेतायत यार online ! काय bore आहेत हे school वाले !!! कधी कधी मी विचार करतो की शाळा नव्हत्या तेव्हा काय मज्जा करत असतील ना मुलं. शाळा सुरू झाल्यावर त्यांना पण कंटाळा आला असेल. खरंच आरू! शाळा नव्हत्या तेव्हा मुलं काय करायची? आणि या शाळा कधी सुरु झाल्या?

आरू : शाळा ही केवळ शिक्षण घेण्याची संस्था नाहीये रुआ! आपली पहिली social interaction शाळेमध्येच होत असते! पण शाळेची सुरुवात मात्र केवळ शिक्षण या हेतूनंच झाली असावी. सुरुवातीच्या काळात कुटुंब हे शिक्षणाचं केंद्र व आईवडील, विशेषतः आई, हे बालकाचे गुरू होते. पुढे हळूहळू lifestyle बदलत गेली. आईवडिलांना नोकरी आणि business साठी घराबाहेर वेळ काढावा लागला. त्यामुळे मुलांना शिक्षण देण्यासाठी त्यांना वेळ मिळेनासा झाला. पुढे मग education for making a living हा विचार बदलून लिहिणं, वाचणं व maths असं स्वरूप शिक्षणाला प्राप्त झालं. हे नवं स्वरूपही आईवडिलांना झेपेनासं झालं. त्यामुळं शिक्षण देणाऱ्या वेगळ्या यंत्रणेची जरुरी भासू लागली. त्यातूनच शाळा ही संस्था उदयास आली व शिक्षकी व्यवसायाची सुरुवात झाली. शिक्षण म्हणजे knowledge, skill आणि development असे सिद्धांत मांडण्याचे प्रयत्न केले. सुरुवातीच्या काळात शिक्षण ही एक कला मानली जाई. तथापि शास्त्राच्या प्रगतीचा शिक्षणविषयक विचारांवर प्रभाव पडून शिक्षण हे कलेबरोबर शास्त्रही आहे, असे मानण्यात येऊ लागलं.

प्राचीन काळी भारतात गुरुकुल शिक्षण प्रणाली होती. ज्या कोणालाही अभ्यासाची इच्छा असेल त्यांनी शिक्षकाच्या (गुरू) घरी जाऊन शिकावे अशी विनंती केली जायची. जर गुरूंनी त्यांना विद्यार्थी म्हणून स्वीकारलं तर ते नंतर गुरूंच्या घरीच राहायचे आणि घरी सर्व कामांमध्ये मदत करायचे. यामुळे केवळ शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात मजबूत संबंधच नाही तर विद्यार्थ्यांना घर चालवण्याबद्दल सर्व काही शिकवलं जायचं, lifestyle education or home science, संस्कृत ते religion आणि गणितापासून ते metaphysics पर्यंत मुलाला शिकण्याची इच्छा असलेल्या सर्व गोष्टी गुरू शिकवायचे. आपली इच्छा असेपर्यंत किंवा आपण जे काही शिकवू शकतो ते सर्व त्यानं शिकवलं आहं असं गुरूला वाटेपर्यंत शिकवलं जायचं. सर्व शिक्षण निसर्गाशी आणि जीवनाशी जवळून जोडले गेले होते .

रुआ : अगं आरू ,म्हणजे actually teacher च्या घरी जाऊन राहायचं आणि सगळी कामं शिकायची? Wow…एक मोठ्ठा camp असेल ना हे म्हणजे? माझी मुंज झाली ना तेव्हा ग्रॅमा असंच काहीतरी म्हणत होती, की आता जा गुरूकडं राहायला, आणि सगळे हसले होते. पण आरू, स्कूल म्हणजे आम्ही जातो ती शाळा कधी सुरु झाली इंडियामध्ये?

आरू :  yes रुआ, teacher च्या घरी.. वयाच्या आठव्या वर्षापासून मुलांचं शिक्षण सुरू होई व ते सुमारे बारा वर्षं चाले. गुरुकुलं किंवा ऋषींचे आश्रम सिंधू, गंगा, यमुना, गोमती अशा नद्यांच्या काठाकाठानं मात्र मनुष्यवस्तीपासून दूर असत. त्या काळात गुरूंना आचार्य म्हणत. गुरुकुलातील प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांचा उपनयन विधी म्हणजेच मुंज करण्यात येई. अध्ययनात स्वाध्यायाला म्हणजे self-study ला महत्त्व असलं, तरी गुरूची आवश्यकता असे. गुरूच्या घरी आचार्य हेच विद्यार्थ्यांचे अध्यापक व पिता असत. विद्यार्थ्यांना बौद्धिक पातळीनुसार म्हणजे intellect प्रमाणे त्यांचा अध्ययनकाल कमी जास्त होत असे. विद्यार्थ्यांना शारीरिक कष्टाची घरकामं करावी लागत. त्या बाबतीत श्रीमंत-गरीब असा भेद नसे. भारतात Modern School system इंग्रजी भाषेसह आणली गेली १८३० च्या दशकात Lord Thomas Macaulay यांच्याकडून.

रुआ :  कित्ती मज्जा येत असेल असं शिकायला. आज screen कडं बघून, मित्रांबरोबर मस्ती न करता शाळा attend करावी लागतीये ...I can only hope that this period passes soon…Thank you for the info Aaru!  

संबंधित बातम्या