गप्पिष्ट 

संदीप नूलकर
सोमवार, 20 मे 2019

शब्दाशब्दांत
 

काय सांगताय काय!
आपल्याला कोणी Thank you म्हटले, तर इंग्रजीमध्ये आपण त्यावर You are welcome असे म्हणणे अपेक्षित असते. पण या You are welcome चा एका फारच वेगळ्या पद्धतीनेही वापर केला जातो. अलीकडेच तसे वाचण्यात आले, म्हणून या त्याविषयी थोडे... 
कोणा एका व्यक्तीने घरी तयार केलेल्या पदार्थांना हॉटेलमधल्यासारखी चव कशी आणायची यावर एका लेखाद्वारे काही युक्‍त्या सुचवल्या होत्या. त्या लेखाचे शीर्षक होते Make home-cooked food taste like restaurant food! And you are welcome. अशा पद्धतीने जेव्हा You are welcome चा उपयोग केला जातो, तेव्हा समोरच्याला त्याची मदत खूप मौल्यवान वाटत असते आणि त्याला खात्री असते की आपण त्याला नक्कीच Thank you म्हणू, असा त्याचा अर्थ असतो. आपण एखाद्या व्यक्तीला मदत केली, पण मदत केली गेली आहे हेच मुळी त्या व्यक्तीच्या लक्षात आले नाही किंवा लक्षात येऊनही त्याने आपले आभार मानले नाहीत तरी आपण चेष्टेने You are welcome असे म्हणू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्याचा फोन टेबलावरून खाली पडणार असेल, पण आपण तो वेळेत पकडला हे त्या व्यक्तीच्या लक्षात आले नाही किंवा लक्षात येऊनही त्याने आपले आभार मानले नाहीत. तुम्हीपण बोलताना किंवा लिहिताना याचा वापर करून भाषेचा मिस्कील आनंद नक्की घ्या.

आहेत असेही काही शब्द! 
शब्द : Quicksilver (as a modifier) 
उच्चार : क्विकसिल्वर. 
व्युत्पत्ती : From Old English cwicseolfor, literally ‘living silver,‘ so called for its mobility, literally ‘living silver;‘ so called from its liquid mobility. 
अर्थ : Moving or changing rapidly and unpredictably, झटपट आणि अंदाज न येता हलणारे किंवा बदलणारे. 
वापर : The boss’s quicksilver moods were a cause of concern to his subordinates.

शब्द : Garrulous (verb)     उच्चार : गॅर्यूलस. 
व्युत्पत्ती : From Latin garrulus ‘talkative, chattering,‘ from garrire ‘to chatter,‘ from root *gar- ‘to call, cry.‘ 
अर्थ : Excessively talkative, especially on trivial matters, अति बडबड करणारा किंवा गप्पिष्ट. 
वापर : Everyone stayed away from this garrulous aunt of mine.

परदेशी पाहुणे 
प्लाझा 
The English language has borrowed the word ’plaza’ from Spanish. It means, place, a public square, marketplace or similar open space in a built-up area, जागा. 
वापर :  A plaza, made lively with street food and live music, adorns the otherwise modest streets.

वा! वा! वाक्‌प्रचार 
The penny dropped (Used informally in British English) म्हणजे Someone has finally realised something, सरतेशेवटी एखादी गोष्ट समजणे. 
वापर : I could not remember the name of the person I was speaking to and then suddenly the penny dropped. 
Money for old rope (or money for jam) म्हणजे Money or reward earned for little or no effort, कष्ट न करता मिळवलेले पैसे किंवा बक्षीस. 
वापर : The company charges thousands of rupees as their hourly consulting fee, talk about money for old rope.

गल्लत करू नका 
Swoon (verb) (अनेक अर्थांपैकी एक अर्थ) म्हणजे To be overcome with admiration, adoration or other strong emotion, कौतुक किंवा तत्सम भावना वाटणे. 
Swoop (verb) (अनेक अर्थांपैकी एक अर्थ) म्हणजे To carry out a sudden attack, especially in order to make a capture or arrest, पकडण्याच्या अथवा अटक करण्याच्या हेतूने अचानक हल्ला करणे. 
Swoon : The public was swooning over this newly launched leading pair that had taken the film industry by storm. 
Swoop : The police swooped on the flat and arrested the terrorists.

ही कुठली भाषा?
आपण जो Ladybird हा शब्द वापरतो तो ब्रिटनमध्ये बोलल्या जाणाऱ्या इंग्रजीमधला आहे. त्याला अमेरिकेमध्ये बोलल्या जाणाऱ्या इंग्रजीमध्ये Ladybug असे म्हणतात. 

जमली आमची जोडी
Cast या क्रियापदाचा आणि ballot या नामाचा एकत्र वापर केला जातो. 
उदा.: The picture of the Prime Minister casting his ballot went viral on social media. 
अर्थ : Cast ballot म्हणजे to vote, करणे मतदान करणे.

Send या क्रियापदाचा आणि email या नामाचा एकत्र वापर केला जातो. 
उदा.: He confirmed having sent an email last evening. 
अर्थ : Send email म्हणजे To send a message or attachment by electronic mail, ईमेल पाठवणे. 

आजच्या ठळक बातम्या 
बातमी : Jet goes down the Kingfisher way 
बातमीचा अर्थ : Jet Airways closes down operations. 
स्पष्टीकरण : The headline makes a comparison with Kingfisher Airlines. ’The Kingfisher way’ refers to how Kingfisher Airlines ran into financial trouble and finally had to stop operations owing to lack of funds to run the airline. The headline suggests that Jet Airways met a similar fate.

शब्द एक, अर्थ दोन 
Direct (noun) (अनेक अर्थांपैकी एक अर्थ) By a straight route or without breaking a journey, सरळ, थेट. 
उदा.: The airline flies direct to Mumbai from Paris. 

Direct (verb) (अनेक अर्थांपैकी एक अर्थ) म्हणजे To supervise and control a film or play or the actors in it, दिग्दर्शित करणे. 
उदा.: Anurag Kashyap had directed that film. 

Slot (noun) (अनेक अर्थांपैकी एक अर्थ) म्हणजे An allotted place in an arrangement or scheme such as a broadcasting schedule, कार्यक्रमामध्ये दिलेली वेळ किंवा जागा. 
उदा.: The popularity of the show meant that they were given the prime slot. 

Slot (verb) (अनेक अर्थांपैकी एक अर्थ) म्हणजे To fit easily into, एखाद्या ठिकाणी चपखल बसणे. 
उदा.: Employers want employees who will slot into the office culture.

संबंधित बातम्या