आपल्या पूर्वजांचे पेटन्ट

प्रा. ॲड. गणेश शं. हिंगमिरे
सोमवार, 25 जानेवारी 2021

विशेष

बुद्धीतून निर्माण झालली संपत्ती म्हणजे बौद्धिक संपदा, आणि आपल्या सर्वांच्याच दृष्टीने बौद्धिक संपदा अत्यंत मोलाचे कार्य करीत असते. बौध्दिक संपदेचे विशेष करून पाच भाग पडतात -पेटन्ट, कॉपीराइट, ट्रेडमार्क डिझाईन आणि भौगोलिक प्रदर्शन म्हणजेच जीआय. 

मागील भागात आपण पेटंट विषयी थोडक्यात माहिती घेत पेटंटच्या गोष्टींना सुरुवात केली होती. पेटंट एखाद्या नवीन शोधाला किंव्हा संशोधनाला मिळते आणि गरज ही शोधाची जननी असते. मानवाच्या गरजा कालानुरूप वाढतच गेल्या आणि त्यानुसार शोधांची संख्या सुद्धा वाढत गेली, म्हणजेच त्याने अनेक बौद्धिक संपदाना किंवा पेटन्टला जन्म दिला. कधीकाळी जंगलांमध्ये राहणाऱ्या मानवाने आपल्या गरजेपोटी साध्या अवजारापासून ते अवजड, किचकट दिसणाऱ्या, गुंतागुंतीच्या यंत्रसामग्रीपर्यंत अनेक बाबींवर संशोधन करून कितीतरी गोष्टी निर्माण केली, ते त्याचे पेटन्ट होते. आपण त्याला आपल्या पूर्वजांचे पेटन्ट असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पण आपल्या काही पूर्वजांच्या पेटन्ट बद्दल आपल्याला माहिती आहे मग विजेचा शोध असो किंवा रेल्वे इंजिनाचा शोध असो. ही सर्व आपल्या पूर्वजांची पेटन्ट म्हणून आपल्याला सर्वांना ज्ञात आहेत. पण याही पलीकडची, अधोरेखित न झालेली पण पिढ्यानपिढ्या वापरात असलली जी आपल्या पूर्वजाची पेटन्ट आहेत त्यांना जिओग्राफिकल इंडिकेशन्स (जीआय) असेही संबोधले गेले आहे.

आपल्या पूर्वजांनी एखाद्या विशिष्ट ठिकाणी एखादा विशिष्ट पदार्थ निर्माण होऊ शकतो याचा शोध घेतला आणि त्यानुसार त्यात या भागांमध्ये त्या वैशिष्ट्यपूर्ण पदार्थाची निर्मिती केली आणि तो पदार्थ त्या भूभागाचा वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ म्हणून नंतर नावलौकिकास आला. उदाहरण द्ययचे झाल्यास पश्चिम बंगालमधल्या दार्जिलिंग प्रांतांमध्ये चहासाठी उत्तम वातावरण आहे हे आपल्या खूप आधीच्या पिढ्यांमधल्या लोकांनी जाणले आणि त्यांनी तिथे चहाची लागवड सुरू केली, त्यातून चहाचे मळे आकारास आले. चहाच्या चांगल्या प्रतीच्या पानांसाठी दार्जिलिंगचं  भौगोलिक वातावरण सुयोग्य आहे हा त्या मंडळींचा शोध पुढच्या काळात भौगोलिक उपदर्शन किंवा ‘जीआय’रूपी बौद्धिक संपत्ती म्हणून नावारुपाला आली.

आपल्या पूर्वजांनी केवळ वैशिष्टपूर्ण शेतीजन्य पदार्थाच शोधले, विकसीत केले असे नाही, तर प्रदेशनिहाय पेहराव आणि त्याला अनुसरून वेगवेगळ्या ढंगाच्या वस्त्रप्रावरणेही शोधली आणि नव्याने निर्माणही केली. काश्मीरमधील पश्मना शाल हे अशा नव्याने वापरात आलेल्या वस्त्राचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. थंडीपासून संरक्षण मिळवण्याच्या हेतूने पश्मीना शाल वापरात आली, तिथल्या लोकांच्या पेहरावाचा भाग बनली, आणि नंतर याच पश्मीना शालींना आपल्या वैशिष्ट्यांमुळे काश्मीरी लोकांसाठी उदरनिर्वाहाचा एक मार्ग निर्माण केला. पश्मीना शालींना आता संपूर्ण जगभर मागणी आहे. तसाच दार्जिलिंग चहा आज जवळपास नव्वद देशांमध्ये आपले अस्तित्व घेऊन गेला आहे. थोडक्यात आपल्या पूर्वजांनी केलेली वैशिष्टपूर्ण पदार्थांची निर्मिती; मग ते शेतीजन्य पदार्थ असो अथवा वातावरणाला पूरक इतर बिगरशेती पदार्थ असोत, ही आपल्या पूर्वजांची बौद्धिक संपत्ती होती. विविध स्वरुपातील अशाच प्रकारच्या संपत्तीला युरोपमध्ये भौगोलिक उपदर्षन किंवा जीआय म्हणून शेकडो वर्षापासून ओळखले केले गेले आहे. शंभराहून अधिक वर्षांपूर्वी तिथे या अनुषंगाने कायदाही करण्यात आला. हा कायदा एक प्रकारे युरोपमधल्या पारंपरिक बौद्धिक संपत्तीला, पारंपारिक ठेवा म्हणून संरक्षण देण्याच्या हेतूने केला गेला होता. आजमितीला युरोपमधल्या हजारो पदार्थांचे जीआयच्या कायद्याच्या माध्यमातून कायमस्वरूपी संरक्षण केले गेले आहे. त्यांचे हे जीआय पदार्थ, वस्तू, संकल्पना जगभरात नंतर युरोपियनांनी वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ म्हणून मोठ्या प्रमाणात निर्यातही केले.  यामध्ये विशेष करून शॅम्पेन किंवा स्कॉच, व्हिस्की यासारख्या युरोप मधील पारंपारिक पेयांचा समावेश आहे. भारतामध्येही २००१मध्ये जीआयशी संबंधित कायदा स्वीकारण्यात आला आणि त्यानुसार भारतातील विविध प्रदेशांमधील वैशिष्टपूर्ण पदार्थ, वस्तूंच्या 

नोंदी सुरू करण्यात आल्या. आपल्या दृष्टाने हे आपल्या पूर्वजांचे पेटन्ट. युरोपातल्याप्रमाणेच भारतातल्याही अनेक ‘जीआय’रूपी पेटन्टनी अनेक यशोगाथा निर्माण केल्याच, त्याखेरीच आपल्या पूर्वजांचा अमिट ठसा असणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंचा, पदार्थांचा ठेवा जगभरात नेला.

महाराष्ट्राच्या उत्तरेकडच्या टोकाला असणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातल्या आदीवासी पट्ट्यामध्ये उत्पादित होणाऱ्या सुवासिक तूर डाळीला जीआय मानांकन मिळले आणि आज त्या जीआय मानांकीत डाळीला आधीच्या तुलनेत तिप्पट किंमत मिळत आहे. पारंपरिक पद्धतीने जात्यावर दळलेल्या डाळीप्रमाणेच, नवापूरची ही पॉलिश न केलेली तूर डाळ आता उच्चभ्रू वर्गातल्या ग्राहकांमध्येही मानाचे स्थान मिळवून बसली आहे, हा आणखी एक महत्त्वाचा घटक. जी आय आपल्या पूर्वजांच्या पेटंटने आता अनेक समूहांना समृद्ध करायला सुरुवात केली आहे. 

जीआय मानंकन मुख्यत्वे तीन प्रकारच्या पदार्थांना दिले जाते. त्यामध्ये नैसर्गिकरित्या निर्मित पदार्थ, शेतीजन्य पदार्थ आणि उत्पादित पदार्थ हे ते तीन मुख्य प्रकार. नैसर्गिकरित्या निर्मित पदार्थांच्या प्रकारात  भारतात आतापर्यंत केवळ दोनच गोष्टींना जीआय मानांकन मिळाले आहे त्यामध्ये राजस्थानच्या मकराना मार्बल याचा समावेश आहे. प्रेमातं प्रतीक म्हणून जगातल्या आश्चर्यांमध्ये गणल्या गेलेल्या आग्र्याचा ताजमहाल याच मकराना संगमरवराचा वापर करून बांधला आहे. वास्तुरचनेचा उत्तम नमुना असणाऱ्या कोलकात्यातल्या व्हिक्टोरिया पॅलेससारख्या अनेक भव्य वास्तूंच्या बांधकामातही याच मकराना संगमरवराचा वापर केला गेला आहे. या संगमरवरात कॅल्शियम कार्बोनेट सारख्या घटकांचा ९८ टक्क्यांपेक्षा अधिक  समावेश असतो. मरकानाच्या याच गुणवैशिष्ट्यांमुळे या मार्बलला जीआय मानांकन मिळाले आणि आजही विशेष करून उत्तम, शाही थाटाच्या वास्तु बांधण्याकडे कल असणाऱ्या लोकांकडून मकराना मार्बलला वाढती मागणी आहे.

शेतीच्या संदर्भाने जीआय मानांकनाचा विचार करताना विशेष करून माती, पाणी, वातावरण या घटकांचा योग्य विनियोग करून मानवनिर्मित वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ असा अर्थ घेतला जातो. आधी उल्लेख केलेला  दार्जिलिंग चहा हे जसे शातीच्या क्षेत्रातील मानांकनाचे अत उदाहरणा आहे, तसेच महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी किंवा सह्याद्रीच्या कुशीत पिकणारा आंबेमोहोर तांदूळ ही देखील या क्षेत्रातील जीआय मानांकनाची उत्तम उदाहरणे आहेत.

उत्पादित वस्तूंच्या जीआय मानांकन कक्षेत अनेकविध वस्तूंचा समावेश होतो. त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण वस्त्रांपासून ते कलाकुसरीने तयार केलेल्या अनेक वस्तूंचा समावेश आहे. जरतारीच्या पदरावरती नाचरा मोर मिरवणाऱ्या पैठणीच्या जोडीलाच बनारसी आणि कांजीवरम साड्यांनाही  वैशिष्ट्यपूर्ण वस्त्रे म्हणून भारतात जीआय मानांकन दिले गले आहे. गोव्याला जाणाऱ्या बहुसंख्य पर्यटकांच्या ‘गावा मस्टस्’च्या यादीत असणाऱ्या फेणीलाही जीआय मानांकन आहे.

जीआय मानांकन मिळालेल्या वैशिष्‍ट्यपूर्ण उत्पादनांच्या यादीत पुणेरी पगडीचे यश विशेष म्हणून अनेकदा माध्यमांनी अधोरेखित केले आहे. पुणेरी पगडीची आम्ही २००७मध्ये जीआय मानांकनासाठी नोंदणी केली त्यावेळी केवळ आठ महिला करागीर पुणेरी पगडी निर्मिती करत होत्या. पण पुणेरी पगडीला जीआय मानांकन मिळाल्यानंतर पुणेरी पगडी अनेक समारंभाचा कायमस्वरूपी हिस्सा बनली, अस्सल पुणेरी पगडीची मागणीही वाढल्याचे लक्षात आले. नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात पुणेरी पगडी बनवणारे कलाकार आता शंभरावर झाले आहेत आणि पुणेरी पगडीच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्याचे 
समोर आले आहे.

संबंधित बातम्या