विश्वविक्रमी `शतकवीर` 

किशोर पेटकर
सोमवार, 13 जुलै 2020

क्रीडांगण

कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल सात दशके अबाधित असलेल्या विश्वविक्रमी शतकांचे जनक एव्हर्टन वीक्स यांचे नुकतेच निधन झाले. कसोटी क्रिकेटमध्ये सलग पाच शतके ठोकणारे वीक्स हे एकमेवाद्वितीय आहेत. आयुष्याच्या मैदानावर या महान फलंदाजास शतकाने थोडक्यात हुलकावणी दिली. वयाच्या ९५ व्या वर्षी वीक्स यांनी इहलोकीची यात्रा संपविली. त्यामुळे केवळ वेस्ट इंडीजच नव्हे, तर जागतिक क्रिकेटमधील एका अलौकिक अध्यायाची समाप्ती झाली, पण त्यांची अजोड कामगिरी अजरामर आहे. विंडीज क्रिकेटमधील `थ्री डब्ल्यूज` हे त्रिकुट जगप्रसिद्ध आहे. तिघांनाही सर किताबाने सन्मानित करण्यात आले. फ्रँक वॉरेल, क्लाईड वॉलकॉट आणि एव्हर्टन वीक्स या `थ्री डब्ल्यूज`नी क्रिकेटला अवर्णनीय उंची गाठून दिली. मागील शतकातील पन्नासच्या दशकात तिघांनीही जागतिक क्रिकेटवर प्रेक्षणीय फलंदाजीने गारुड केले. वॉरेल आणि वॉलकॉट यांनी यापूर्वीच चिरनिद्रा घेतली. आता वीक्सही त्यांच्या सोबतीला गेले आहेत. क्रिकेटवर अधिराज्य गाजविलेल्या तिघा `डब्ल्यूज` महानायकांची समाधी एकत्रित पाहायला मिळण्याची तजवीज बार्बाडोस येथे आहे. विंडीज क्रिकेटचे हे शिलेदार समवयस्क आणि एकाच कालखंडात चमकले. वीक्स यांची कसोटी क्रिकेट कारकीर्द दशकभराची, जानेवारी १९४८ ते मार्च १९५८. मांडीच्या दुखापतीमुळे वयाच्या ३३ व्या वर्षी त्यांना कसोटी क्रिकेटचा निरोप घ्यावा लागला. या शांत आणि नम्र व्यक्तिमत्त्वाने निवृत्तीनंतर प्रशिक्षक, क्रिकेट सामनाधिकारी या भूमिकाही वठविल्या. १९७९ मध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखालील कॅनडाचा संघ विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत खेळला होता. त्यांचा मुलगा डेव्हिड मरे यानेही वेस्ट इंडीज क्रिकेट संघाची यष्टिरक्षक या नात्याने सेवा केली. वडिलांच्या महानतेच्या छायेखाली खेळलेल्या मुलाची कारकीर्द गुणवत्ता असूनही भरकटली. 

सर्वकालीन श्रेष्ठ
 कसोटी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विश्वविक्रम मिरविणारा विंडीजचाच ब्रायन लारा याने वीक्स यांना श्रद्धांजली वाहताना, त्यांना सर्वकालीन श्रेष्ठ फलंदाज आणि `अ ग्रेट वेस्ट इंडियन!` संबोधून त्यांचा गौरव केला आहे. पराक्रमाची गाथा वाचूनच वीक्स यांचे विलक्षण कर्तृत्व लक्षात येते. पदार्पण केल्यानंतर चौथ्याच कसोटी क्रिकेट सामन्यात त्यांनी इंग्लंडविरुद्ध किंग्स्टन येथे १४१ धावांची खणखणीत खेळी केली. त्यानंतर भारत दौऱ्यात वीक्स यांनी धावांचा रतीब टाकताना चार नयनरम्य शतकांची माळ गुंफली. दिल्लीत १२८, मुंबईत १९४, कोलकात्यात १६२ व १०१ धावा नोंदवून सलग पाच शतकांचा विश्वविक्रम रचला. ते मद्रास (आताचे चेन्नई) येथे ९० धावांवर बाद झाले, त्यामुळे ओळीने सहा शतकांना वीक्स वंचित राहिले. असे सांगतात, की त्यांना धावबाद देण्याचा निर्णय संशयास्पद नसता, तर मद्रासलाही त्यांनी शतक झळकाविले असते. वीक्स यांनी कारकिर्दीतील वैयक्तिक सर्वोच्च धावाही भारताविरुद्धच नोंदविल्या. १९५२-५३ मोसमात पोर्ट ऑफ स्पेनमधील कसोटीत त्यांनी २०७ धावांची खेळी सजविली. फलंदाजी करतानाचे त्यांचे पदलालित्य डोळ्यांचे पारणे फेडत असे. त्यांच्या भात्यात सर्वप्रकारचे फटके होते. त्यांची बॅट आक्रमकतेनेच चेंडूस भिडत असे. तिघा डब्ल्यूजमध्ये वीक्स यांची फलंदाजी तांत्रिकदृष्ट्या जास्त सरस आणि अधिक मनोहारी होती, असे सांगितले जाते.  

संघर्षानंतर क्रिकेट बहरले
 २६ फेब्रुवारी १९२५ रोजी बार्बाडोसमध्ये जन्मलेल्या एव्हर्टन वीक्स यांचे बालपण खूपच गरीबीत गेले. घरात वडील एकमेव कमविते. शालेय शिक्षण वयाच्या १४ व्या वर्षी सोडावे लागले. लहानपणापासून एव्हर्टन यांना क्रिकेटचे भारी प्रेम. ते फलंदाजी छान करायचे, पण त्यांना मनसोक्त क्रिकेट खेळायला मिळत नसे. स्थानिक क्रिकेट क्लबमध्ये फक्त गोऱ्यांनाच परवानगी होती. वर्णभेदावर मात करून क्रिकेट खेळण्यासाठी वीक्स यांना बार्बाडोसच्या संरक्षण दलाची अतीव मदत झाली. तेथे भरती झाल्यानंतर त्यांना दर्जेदार आणि उच्चस्तरीय क्रिकेट भरपूर खेळायला मिळाले. संघर्षानंतर असामान्य गुणवत्तेच्या एव्हर्टन वीक्स यांची फलंदाजी बहरली. ते उंचीने कमीच होते, मात्र कमावलेली शरीरयष्टी सशक्त होती. वयाच्या १९ व्या वर्षी प्रथम श्रेणी, तर २२ व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करत वीक्स यांनी जागतिक क्रिकेटमध्ये कळस गाठला. विंडीजच्या कसोटी संघात त्यांना संधी मिळाली, तेव्हा त्यांचे टीकाकार जास्त होते. मात्र, इंग्लंडविरुद्ध शतक आणि नंतर भारत दौऱ्यात १११.२८ च्या सरासरीने ७७९ धावा करत वीक्स यांनी संघातील स्थान केवळ भक्कमच केले नाही, तर विश्वव्यापी पराक्रम गाजविला. ४८ कसोटींत १५ शतकांसह ४४५५ धावा करताना त्यांनी ५८.६१ अशी सदृढ सरासरी राखली.

वय वाढते तसे त्वचेमधील बदलही आपल्याला जाणवतात आणि दिसतात. ही एक नैसर्गिक क्रिया आहे आणि वयोमानानुसार त्वचेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्वचेवर सुरकुत्या येणे, ड्रायनेस, त्वचेतील लवचिकपणा कमी होणे या सगळ्या एजिंग साईन्स आहेत. बऱ्याच वेळा प्रदूषण, स्ट्रेस, स्ट्रिक्ट डाएटिंग, सतत मेकअप आणि कॉस्मेटिक्सचा मारा त्वचेवर होत असेल, तर प्री-मॅच्युअर एजिंग होऊ शकते. म्हणजेच, कमी वयातसुद्धा सुरकुत्या, ड्रायनेस, लूज स्किन ही लक्षणे दिसू शकतात.

संबंधित बातम्या