समर स्पेशल कलरफुल ॲक्‍सेसरीज

समृद्धी धायगुडे
सोमवार, 1 एप्रिल 2019

उन्हाळा विशेष
उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात ते शॉपिंगचे. तुमचा वॉर्डरोब अपडेट करण्याची हीच ती वेळ असते. या समर सीझनमध्ये ‘इझी ब्रिजी स्टाइल’ ट्रेंडमध्ये आहे. समर सीझनमध्ये खूप तंग कपडे घालणे टाळा. या समर सीझनमध्ये सैलसर आउटफिट्‌स खरेदी करा आणि त्यावर कूल आणि स्टायलिश ॲक्‍सेसरीज खरेदी करा. एथनिक असो किंवा वेस्टर्न, प्रत्येक पेहरावामध्ये ट्रेंडी लुक मिळवू शकता. या टिप्स फॉलो करून तुम्ही निश्‍चितच ऑफिसला किंवा हॅंगआउट करायला जात असाल, तर तुम्ही एक फॅशन ‘दिवा’ म्हणून नक्की भाव खाल. 

 • क्रॉप टॉप : क्रॉप टॉप दिसायला कूल आणि कंफर्टेबल असतो. याशिवाय क्रॉप टॉप पलाझो, स्कर्ट, शॉर्टसवर घालू शकता. 
   
 • फ्लोरल कुर्ता : उन्हाळ्यात फ्लोरल प्रिंट कुर्ते रिफ्रेशिंग लुक देतात. ऑफिसवेअर म्हणून फ्लोरल कुर्ते छान दिसतात.   
   
 • शॉर्टस : कूल लुक मिळविण्यासाठी शॉर्टस एकदम उत्तम पर्याय आहेत. कॅज्युअल आउटिंग ते मित्रांसोबत हॅंगआउटपर्यंत कुठेही शॉर्टस आणि लाइट कलरचे टीशर्ट ट्राय करू शकता.
   
 • वनपीस : हिवाळ्यात तुम्ही असे शॉर्ट वनपीस घालू शकत नाही. परंतु, समर सीझन म्हणजे व्हाइट, पिंक, लेमन अशा कलरचे क्‍यूट ड्रेस सहज ट्राय करू शकता.
   
 • कॉटन साडी : उन्हाळ्यात कॉटनच्या साड्या उत्तम पर्याय आहेत. तुम्हाला जर साड्यांची आवड असेल, तर ऑफिसमध्ये व्हाइट किंवा ग्रे कलरच्या प्लेन, प्रिंटेड साड्या खास दिसतात.
   
 • ट्युलिप स्कर्ट : उन्हाळ्यात फॉर्मल वेअर म्हणून ट्युलिप स्कर्ट नक्की वापरू शकता. तुमची अंगकाठी बारीक किंवा मध्यम आकाराची असल्यास हे स्कर्ट छान दिसतात. 
   
 • हॅट : उन्हाळ्यात प्रत्येकाच्या डोक्‍यावर टोपी दिसायला लागते. डोक्‍यावर पगडी, फेटा घालण्याची पद्धत होती. आता ही पद्धत जरी कायम असली, तरी फॅशन मात्र बदलली आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठी टोप्यांची फॅशन आली आहे. लहान मुलांसाठी कलरफुल कार्टून प्रिंटच्या कॅप्स, हॅट्‌स बाजारात आलेल्या दिसतात. तरुणींसाठी गोल हॅट्‌स, फ्लॅपवाल्या मोठ्या हॅट्‌स, यात फुलांच्या प्रिंट असलेल्या समर स्पेशल प्लेन कलर्सवाल्या, प्रीटी लुक देणाऱ्या हॅट्‌स ट्रेंडमध्ये आहेत. मुलांसाठी देखील नामांकित ब्रॅंड्‌सच्या लोगो असलेल्या कॅप्स, मिलेटरी प्रिंटच्या कॅप्स आणि हॅट्‌स बाजारात उपलब्ध आहेत.
   
 • स्कार्फ : उन्हाळ्यात कोणत्याही प्रकारच्या पेहरावावर स्कार्फ, स्टोल्स उठून दिसतात. हे घेताना मात्र त्यात समर स्पेशल कलर जसे की, व्हाइट, यलो, लाइट ब्ल्यू, बेबी पिंक, ऑरेंज, लाइट ग्रीन, लेमन अशा रंगांचे कॉटनचे सिंथेटिकचे प्रिंटेड, वर्क केलेले स्कार्फ पारंपरिक आणि वेस्टर्न आउटफिटवर देखील उठून दिसतात.         
 • समर नेल्स कलर्स : समर सीझनमध्ये ॲक्‍सेसरीज मधील महत्त्वाची नसलेली, तरी पण तुमच्या समर लूकसाठी महत्त्वाची असते, ती नेलपेंटची शेड. त्यामुळे आता गडद शेड्‌सना करा बाय बाय आणि आता थोडे उत्साहवर्धक आणि आनंदी शेड ट्राय करा. एका सर्वेक्षणानुसार सर्व नेल शेड्‌सचा प्राधान्य क्रम बघता खाली दिलेल्या शेड्‌स फॉलो केल्यास तुमचा लुक एकदम मस्त जाईल. 
   
 • व्हाइट : क्‍लासिकल शेड्‌समध्ये रेड कलरपासून ते मेटॅलिक कॉपर पर्यंत आज नॅचरल, जेल आणि ॲक्रेलिक नेल कलरचा ट्रेंड आहे. समर सीझनमध्ये व्हाइट कलर एकदम उत्तम आहे. कडक उन्हापासून वाचण्यासाठी आणि बोअरिंग काळ्या रंगापासून सुटका करण्यासाठी व्हाइट शेड कधीही चांगली असते. व्हाइट शेडमध्ये शिमर आणि पर्ल इसेन्ट फिनिश या शेड्‌सनी तुमची बोटांची आणि पायांची नखे लवकर रंगवून बीचवर जाण्यासाठी तयार रहा.
   
 • पॅले पिंक : नूड कलरसाठी किंवा सोफिस्टिकेटेड शेड्‌ससाठी पॅले पिंक उत्तम पर्याय आहेत. पॅले पिंक समर सीझनसाठी बेस्ट ऑप्शन आहे. पॅले पिंक कलरमध्ये ब्ल्यूश पिंक, नूड पिंक, कॉटन कॅंडी पिंक या शेड्‌स ट्रेंडमध्ये आहेत. या फिकट पिंक नेल्स ऑफिस किंवा नव्या नवरीने तिच्या पहिल्या सर्व सणांना लावण्यासाठी उत्तम पर्याय आहेत.
    
 • होलोग्राफीक : तुम्हाला जर इंद्रधनुष्यासारखे रंग आवडत असतील, तर होलोग्राफीक नेल्स हा एकदम चांगला पर्याय आहे. या वर्षातील ट्रेंडमध्ये सर्वांत वरच्या क्रमांकावर आहे. यामध्ये गडद, फिकट दोन्ही शेड्‌स दिसतात. एखाद्या खास फोटोशूटसाठी हे ट्राय करण्यास हरकत नाही.
   
 • मिंट ब्ल्यू : या लाही लाही करणाऱ्या उकाड्यात ‘कूल ब्ल्यू’ कलर सारखी नेल शेड दुसरी नाही. हा कूल नेल कलर तुम्हाला बीच लुकचा फील देईल. या शेड सोबत बेबी ब्ल्यू, टर्किश अँड टिफनी ब्ल्यू शेड्‌सदेखील पुढील महिन्यात अप कमिंग आहेत.
   
 • कॉपर : शिमरी मॅटेलिक कॉपर कलर तुमच्या नखांना गिल्ड, ग्लॅम लूकसाठी परफेक्‍ट ऑप्शन आहे. एखाद्या नाइट पार्टीसाठी जाताना पार्टीवेअर ड्रेसवर हे नेल कलर्स भारी दिसतात. या नेल कलरची प्रचंड क्रेझ समर सीझनमध्ये आहे. हा कॉपर कलर विविध म्युझिक फेस्टिवल, कॉन्सर्टसाठी जाताना देखील लावू शकता.
    
 • गोल्ड : समर सीजनमधील आणखी एक खास शेड म्हणजे गोल्डन. स्पेकल्ड गोल्ड, मॅट गोल्ड असे विविध पर्याय तुम्हाला आहेत. गोल्डन कलर ऑलमोस्ट सगळ्या आउटफिटवर शोभून दिसतो. या कलरचे तुम्ही व्हाइट कलरसोबत कॉम्बीनेशन केल्यास मजेशीर आणि परफेक्‍ट समर नेलं आर्ट होते.
      
 • पीच : सॉफ्ट आणि सोबर लूकसाठी पीच कलर योग्य पर्याय आहे. ही एक अशी नेल शेड आहे, जी सर्व प्रकारच्या स्कीन टोनला सूट होते. नेहमीच्या नूड कलरचा कंटाळा आला असल्यास रोज लावण्यासाठी ही शेड योग्य आहे. याशिवाय हे प्रत्येक प्रकारच्या सण समारंभात उठून दिसतात.  

संबंधित बातम्या