#आमची_भाषा

इरावती बारसोडे
सोमवार, 11 जानेवारी 2021

ट्रेंडिंग

कोसकोसावर भाषा बदलते; अर्थ तोच असला तरी शब्द, वाक्‍प्रचार बदलतात. याचाच प्रत्यय येणारा एक ट्रेंड सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळतो आहे. अमेरिकेमध्ये किंवा इंग्रजीमध्ये बोलली जाणारी वाक्ये किंवा शब्द भारतामध्ये कशापद्धतीने बोलली जातात हे या ट्रेंडमध्ये दिसते आहे. #USvsIndia आणि #TrendingFormat हे दोन हॅशटॅग वापरून मीम्स तयार केली जात आहेत. 

गंमत अशी की सामान्य नेटिझन्सबरोबरच टीव्ही चॅनल्स, कंपन्यादेखील या ट्रेंडिंग फॉरमॅटमध्ये सहभागी होऊन आपली जाहिरात करून घेत आहेत. यामध्ये हिंदी, मराठी भाषांबरोबरच संस्कृत भाषासुद्धा बघायला मिळाली. 
या मीम्सचा एक फॉरमॅट ठरला आहे. वर अमेरिकेचा झेंडा आणि त्यासमोर इंग्रजीमधील शब्द/वाक्य आणि खाली भारताचा झेंडा आणि त्यासमोर मराठी/हिंदी/संस्कृत भाषेतील वाक्य. फेसबुक, इन्‍स्टाग्राम, ट्विटर या प्रमुख सोशल मीडिया साइट्सवर हा ट्रेंड बघायला मिळाला. 

भारतीय डिजिटल पार्टीने केलेली काही मराठी मीम्स
यूएस ः Friend
भारत ः ब्रोच्या

यूएस ः Let''s have a drink
भारत ः बसायचं?

यूएस ः Best
भारत ः जगातभारी

कलर्स रिश्‍ते-
यूएस ः You are so inhuman
भारत ः औरत नही, लडकी नही, नागिन हो तुम

फेव्हिकॉलची जाहिरात
यूएस ः Till death do us part
भारत ः चिपकाले सैंया फेव्हिकॉलसे

गॅट्सबी कंपनीची जाहिरात
यूएस ः You are so well groomed.
भारत ः कोनसी लडकी को इंप्रेस करने जा रहा है? 

संस्कृतमधील काही उदाहरणे
यूएस ः Live life to the fullest
भारत ः यावेत जिवेत सुखं जिवेत, ऋण कृत्वा घृतं पिबेत

इतर काही गमतीशीर मीम्स-
यूएस ः My son is a digital marketer
भारत ः मेरा बेटा रासा दिन फोन पे लगा रेहता है।

यूएस ः Christmas, Thanksgiving, Independance day, Halloween & New year
भारत ः न्यू इयर, पोंगल, संक्रात, लोहरी, प्रजासत्ताक दिन, महाशिवरात्र, होळी, गुढी पाढवा, राम नवनी, रमदान, बकरी ईद,.......... (यादी पुढे सुरूच राहते)

यूएस ः Hit it
भारत ः बजाओSSSS

संबंधित बातम्या