क्रेझी ग्रे हेअर्स

समृद्धी धायगुडे
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये कधी कोणत्या फॅशनची लाट येईल याचा नेम नाही. केशरचनेतील ट्रेंडप्रमाणे हेअर कलर्सची फॅशनदेखील ट्रेंडमध्ये आहे. हॉलिवूडप्रमाणे बॉलिवूडकरांनाही या फॅशनचे वेड लागले आहे. तुम्हाला पण जर हा हेअर ट्रेंड फॉलो करायचा असेल, 
तर ही माहिती उपयुक्त ठरेल. 

  • आपल्या हॉट फोटोमुळे नेहमी चर्चेत राहणारी लिसा हेडन यावेळी तिच्या लूकमुळे चर्चेत आहे. लिसाने तिचे केस प्लॅटिनम रंगाने रंगवले असून तिचा हा लूक खूप जणांना आवडला आहे. लिसाच्या व्हायरल होणाऱ्या फोटोमुळे लिसाला किम कार्दाशियनसुद्धा म्हटले जाते. तर काही चाहत्यांना लिसाचा हा लुक लेडी गागाप्रमाणे वाटत आहे.
  •   दिग्दर्शक करण जोहरनेही एका फॅशन शो दरम्यान आपल्या केसांना हा हेअर कलर केला. बऱ्याच जणांना हा ट्रेंड आवडलेला नाही, पण तरीसुद्धा याची चलती आहे. याला प्लॅटिनम आणि सिल्वर हेअर या नावानेही ओळखला जातो. या हेअर कलरला तुम्ही मॅचिंग पेहराव केलात, तर एक हटके लूक मिळू शकतो.
  • या कलरची भुरळ बॉलीवूड सहहॉलिवूड कलाकारांनाही पडलेली दिसते. जस्टिन बीबर, काइली जेनर यांसारखे हॉलिवूड सेलिब्रिटी हा ट्रेंड फॉलो करताना दिसतात. हे रंग जास्त व्हॉल्युम असलेल्या वेवी आणि लांब केसांवर ट्राय केल्यास जास्त छान दिसतात. हा ट्रेंड फक्त तरुणींमध्येच नाही, तर तरुणांमध्येही लोकप्रिय होत आहे. हा कलर विशेषतः पार्टी लूक किंवा रॅम्प वॉक करताना, महाविद्यालयीन तरुणांना शोभून दिसेल.
  • हे हेअर कलर नामांकित सलूनमध्येच ट्राय करावेत. 
     

फोटो फीचर

संबंधित बातम्या