अंगणी माझ्या...

समृद्धी धायगुडे
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

प्रत्येकाचे घराचे स्वप्न साकारताना त्याच्या गृहसजावटीच्या काही विशिष्ट संकल्पना असतात. यामध्ये घरातील प्रत्येक खोलीचा विचार होतो पण सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे घराचे अंगण. ही संकल्पना सध्या फारशी दिसत नसली, तरी जुन्या घरांमध्ये अजूनही पुढच्या व मागच्या अंगणाची संकल्पना दिसते. नवीन बंगला घेताना अंगणाचा विचार करून घर घेणारी काही मंडळी असतात. या अंगणामुळे अर्थातच घराचे सौंदर्य खुलते. आज आपण याच अंगणाची सजावट कोणकोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने करता येईल याची माहिती घेऊ
 
     घराच्या आतील सौंदर्याची संकल्पना बहिःस्थ व्यक्ती ही अंगणावरून करते. यामुळे घरांबरोबरच अंगणाचाही आकर्षक सजावट करणे आवश्‍यक असते. घरातील सदस्यांचा मोकळा वेळ व्यतीत करण्यासाठी, काही विशेष कार्यक्रम, पार्टी असेल तर अंगणाशिवाय त्याला मजाच येत नाही. यामुळे त्याचे सौंदर्य खुलविणे गरजेचे असते. 

 • आकर्षक दिवे
 •      बहुतेक अंगणात आकर्षक रंगबेरंगी फुलांची झाडे लावल्यास नैसर्गिक सौंदर्य वाढते. याच बरोबर अंगणात आकर्षक दिव्याची रोषणाई केल्यास ती जागा सांजवेळी आणखी उठून दिसते. अंगणाला साजेसे आकर्षक कल्पक डिझाईनचे आणि रंगाचे दार केल्यास अंगणाच्या सौंदर्यात भरच पडेल.
 • कृत्रिम तळे
 •      घराच्या बगीच्यात एखादे लहान कृत्रिम तळे केल्यास यामुळे नैसर्गिक रूप येते. अंगणातील तळ्यामुळे घरातील प्रत्येक सदस्याचे; तसेच घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचे मन प्रसन्न होते. 
 • फर्निचर 
 •      घरातले फर्निचर जसे घराच्या अंतर्भागातील सौंदर्यात भर टाकणारे असते, तसे घराचा बगीचा हा निवांत क्षण घालविण्याची हक्काची व खासगी जागा आहे. तेव्हा तिथे विसावण्यासाठी आकर्षक फर्निचर असणे गरजेचे आहे. संध्याकाळी किंवा सुटीच्या दिवशी सर्वांना एकत्र बसून गप्पागोष्टी करता याव्यात, यासाठी बसण्यासाठी योग्य आरामदायी सोय असावी. तसेच काही छोट्या कार्यक्रमाचे नियोजन केल्यास त्याचा छान उपयोग होतो.
 •  
 • टाकाऊपासून टिकाऊ 
 •      जुन्या घराचे नूतनीकरण करताना काही वस्तू एकदम अडगळीत टाकण्याऐवजी त्यापासून आकर्षक वस्तू बनवून त्या बागेत  किंवा अंगणात ठेवल्यास आकर्षक दिसते. 
 • फुलझाडे
 •      अंगणाचे सौंदर्य वाढविण्यासाठी नेहमीच्या फुलझाडांबरोबरच काही आकर्षक झाडे लावावीत. झाडे लावण्यापूर्वी कुंडयांवर आकर्षक पेंटिंग्ज करावीत. काही हॅंगिंग कुंड्या लावाव्यात.

फोटो फीचर

संबंधित बातम्या