फ्लेयर्ड जीन्सची फॅशन

समृद्धी धायगुडे
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

ट्रेंड्‌स
 

फॅशनचे ट्रेंड रोज बदलत असतात. कधी हाय-वेस्ट, लो-वेस्ट, कधी स्किनी अशा पॅटर्नच्या जीन्सचा ट्रेंड येत आहेत, मात्र सध्या जुन्या काळातील फ्लेयर्ड जीन्सची फॅशन पुन्हा बाजारात आली आहे. विविध बॉलिवूड सेलेब्रिटी ही फॅशन फॉलो करताना दिसतात. 

     सध्या कलरफुल जीन्स, जीन्सचे स्कर्ट, बॅग्ज, सॅंडल्स, शर्ट, जॅकेट, वनपीस असे पॅटर्न पाहायला मिळतात. फ्लेयर्ड जीन्स शक्‍यतो आऊटिंगला जाताना बेस्ट ऑप्शन ठरतील. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट नुकतीच या जीन्स जॅकेट आणि फ्लेयर्ड जीन्समध्ये दिसली होती. 
 
     फ्लेयर्ड जीन्सचा ट्रेंड पलाझो पॅन्टमुळे लवकर ट्रेंडिंगमध्ये आला. या जीन्सवर कोणत्याही कलरचे फॉर्मल वेअर उठून दिसतात. दीपिका पदुकोणने या जीन्स कॅज्युअल शर्टबरोबर घालून थोडा फंकी आणि कुल लुक मिळवायचा प्रयत्न केलेला दिसतो. उंच व्यक्तींना हे कपडे उठून दिसत असल्याने दीपिकाच्या या लुकला सहज पसंती मिळते. या जीन्सवर कॅज्युअल वेअर फिकट रंगातील असल्यास तुमचे व्यक्तिमत्त्व बिनधास्त दिसते. 

     ट्विंकल खन्नाने ही जीन्स प्लेन व्हाइट शर्ट सोबत पेअर केल्याने खूपच कुल दिसते. तुम्ही जर महाविद्यालयीन तरुणी असाल आणि एखाद्या पार्टीला जाताना  होत लुक करायचा असेल तर फ्लेयर्ड जीन्सवर फिकट रंगाचे क्रॉप टॉप उठून दिसतील. 

 या जीन्सवर तुमच्या कम्फर्टनुसार कट्‌स असलेल्या वेगवेगळ्या फ्लेयर्ड जीन्स बाजारात उपलब्ध आहेत. त्यावर टीशर्ट, हॉट टॉप्स किंवा वेजेस किंवा अनुष्का शर्मासारखे टेन हिल्सवर घातल्यास स्टायलिश लुक मिळतो. 

 सध्या तरुणींमध्ये आणि बॉलिवूडमध्येही फ्लेयर्ड जीन्सची क्रेझ प्रचंड आहे. आपल्या जवळच्या मॉल किंवा ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर ही जीन्स सहज उपलब्ध आहे. खरेदी करताना विशेषतः आपल्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल का याचा अंदाज घेऊन खरेदी करावी.   

फोटो फीचर

संबंधित बातम्या