सिंदूरची फॅशन 

समृद्धी धायगुडे    
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

ट्रेंड्‌स    
काही वर्षांपूर्वी सिंदूर लावण्याची पद्धत मराठी संस्कृतीत नव्हती मात्र, सध्या फॅशन स्टेटमेंट म्हणून सिंदूर लावला जातो. याविषयी... 

फॅशन ही रोज नव्याने येते. कालबाह्य झालेली फॅशनसुद्धा फिरून येते. यामध्ये विविध कपडे, ॲक्‍सेसरीज तसेच काही छोट्या-मोठ्या गोष्टी नव्याने आल्यावर पेहरावाला वेगळेपणा येतो. गेल्या दहा वर्षात पारंपरिक महिला सौभाग्याची लक्षणे म्हणून प्रसिद्ध होती, त्याचे विविध मॉडर्न गोष्टींमध्ये रूपांतर झाले आहे. पण यापैकी एक गोष्ट कायम आहे जी नववधूंच्या पेहरावात दिसते ती म्हणजे सिंदूर ! काही वर्षांपूर्वी सिंदूर लावण्याची पद्धत मराठी संस्कृतीत नव्हती मात्र, सध्या फॅशन स्टेटमेंट म्हणून सिंदूर लावला जातो. याविषयी... 

     मसाबा गुप्ता या लोकप्रिय फॅशन डिझायनरने नुकत्याच केलेल्या एका फॅशन शोमध्ये सिंदूरची फॅशन परत आणली. तिच्या मते, सिंदूर ही जुनी पद्धत नसून प्रत्येकाच्या आवडीचा भाग आहे. काही वर्षांपूर्वी दुर्मिळ होत चाललेली फॅशन मसाबाने परत आणली आहे.

     मसाबा यांच्या समर स्पेशल कलेक्‍शनमध्ये सिंदूर खूप अभिनव पद्धतीने सादर केला. मसाबाची हटके डिझायनिंग स्टाइल सर्वश्रुत आहे. मसाबाच्या यावर्षीच्या समर कलेक्‍शनचे नाव आहे ’बर्निंग गार्डन’ आणि हे त्यांनी सिंदूरबरोबर ट्विस्ट केले आहे. 

     हा ‘ट्विस्ट’ सादर करताना त्यांनी सिंदुरी रंगाचा वापर करून पेहरावासोबत सादर केल्याने या कलेक्‍शनला एका शहरी आणि युवा टच आला आहे. पेहराव जरी मॉडर्न असला तरी सिंदुरमुळे त्याला एक पारंपरिक रूप मिळते त्यामुळेच  सिंदूर लावणे ही जुनी फॅशन रहात नाही.

     सिंदूर कलरमध्ये हॉट पिंक, सिंदूर कलर हे ट्रेंडमध्ये आहे. हॉट पिंक कलर सध्या भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व करते. जर एखादीला नवे काही ट्राय करायचे असल्यास हा उत्तम पर्याय आहे. 

     सिंदूर लावणे ना लावणे परंपरेशी जोडले जाते. त्यामुळे ती मागे पडत आहे का? एका मोठ्या फॅशन हाऊसने आणि एक महिला म्हणून जर या परंपरेला प्रोत्साहन दिले तर ही परंपरा निश्‍चितच पुन्हा वर येईल, असा विश्वास तिला वाटतो. या कलेक्‍शनचा वापर तुम्ही आधुनिक स्त्री दिसण्यासाठी नक्कीच करू शकता. 

     सिंदूर नक्की कशा प्रकारच्या पेहरावावर उठून दिसतो हे दाखविण्यासाठी मसाबाचे कलेक्‍शन जरूर फॉलो करावे. यामध्ये साडीपासून साध्या कुर्त्यापर्यंत सर्व पर्याय पाहायला मिळतात..
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या