मसालेदार ज्वेलरी 

समृद्धी धायगुडे
शुक्रवार, 15 जून 2018

ट्रेंड्‌स
 

ज्वेलरी म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर एकदम टिपिकल कानातली, गळ्यातली, ब्रेसलेट्‌स येतात. या पारंपरिक ज्वेलरीला फाटा देऊन थोडे हटके स्टाइल रबराची, मातीची, मेटलची पण जरा वेगळ्या आकारामधील ज्वेलरी वापरण्याकडेही तरुणींचा कल दिसतो. यामध्ये सध्या सोशल मीडियावर ‘मसालेदार ज्वेलरी’ धुमाकूळ घालत आहे...

     आता कोबी काढून त्याच प्रोसेसरमध्ये २-३ काकड्या, २-२ किंवा ३-३ तुकदागिन्यांचे विविध प्रकार आपल्याकडे पाहायला मिळतात. यामध्ये टेम्पल ज्वेलरी, वेस्टर्न स्टाइल ज्वेलरी, कुंदन ज्वेलरी इत्यादी प्रकार हे जास्तीत जास्त लग्नप्रसंगी, मोठ्या सोहळ्यांसाठी घातले जातात. रेग्युलर ऑफिस वेअर किंवा कॉलेजमध्ये जाताना घालण्यासाठी हटके डिझाइन्सच्या आपण शोधात असतो. सध्या कोणतेही ज्वेलरी कलेक्‍शन हे सेलिब्रिटींच्या गळ्यात दिसण्याऐवजी सोशल मीडियावर आधी दिसते. 

     आता कोबी काढून त्याच प्रोसेसरमध्ये २-३ काकड्या, २-२ किंवा ३-३ तुकसध्याची ज्वेलरी आपल्या संस्कृतीतील वेगवेगळ्या गोष्टींपासून प्रेरणा घेऊन डिझाईन करण्याचा ट्रेंड आहे. याशिवाय कपड्यांमध्ये असिमेट्रिक कट्‌स किंवा डिझाइनची जशी फॅशन लोकप्रिय होत आहे. तसेच ज्वेलरीमध्येही भौमितिक आकाराच्या ज्वेलरी तरुणींच्या फेवरिट लिस्टमध्ये टॉपला आहे. 

     आता कोबी काढून त्याच प्रोसेसरमध्ये २-३ काकड्या, २-२ किंवा ३-३ तुकसोशल मीडियावर एका ब्रॅंडने भारतीय मसाल्यांवरून प्रेरणा घेऊन एक ज्वेलरी कलेक्‍शन नुकतेच बाजारात आणले आहे. या कलेक्‍शनची खासियत म्हणजे भारतीय मसाल्यांमधील कोणताही मसाला घ्या त्याचे कानातले आणि पेंडंट सेट तुम्हाला त्यांच्याकडे मिळेल. 

     आता कोबी काढून त्याच प्रोसेसरमध्ये २-३ काकड्या, २-२ किंवा ३-३ तुकया रेनी सीझनमध्ये ‘तडका कलेक्‍शन’ची ज्वेलरी ट्राय केल्यास तुमचा लूक नक्कीच चारचौघींपेक्षा वेगळा असेल. कॉलेज गोइंग तरुणींसाठी असिमेट्रिक शेप्समध्ये काजू, बदाम, पिस्ते एकत्रित घालण्याची संधी या ज्वेलरीमुळे मिळते. एखाद्या पदार्थासाठी मसाले परतताना लागणारी कढई आणि त्यात फोडणी देताना उडणारे ते पदार्थ विशेषतः ‘मिरची’ हे डिझाईन सध्या ‘मोस्ट वाँटेड’ आहे. 

     आता कोबी काढून त्याच प्रोसेसरमध्ये २-३ काकड्या, २-२ किंवा ३-३ तुकसोशल मीडियावर ‘स्वाभी’ नावाच्या ज्वेलरी ब्रॅंडने सादर केलेल्या या ‘तडका कलेक्‍शन’मध्ये तमालपत्र, दगडफूल, लवंग, दालचिनी, धने, वेलदोडा, जावित्री, जिरे, तीळ, कढीपत्ता, लसूण, लाल-हिरवी मिरची, हळकुंड, कोथिंबीर, बडीशेप, केशर, काजू, बदाम, पिस्ते अशा सर्व मसाल्याच्या पदार्थांचे आणि सुकामेव्याचे कानातले आणि पेंडंट सेट दिसतात. तसेच त्यांची ‘बास्केट’ हे प्रकार सिल्व्हर आणि गोल्डन प्लेटिंगमध्ये खूप सुंदर दिसतात. 

     आता कोबी काढून त्याच प्रोसेसरमध्ये २-३ काकड्या, २-२ किंवा ३-३ तुकया ज्वेलरी सेटचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही फॉर्मल ड्रेस किंवा कुर्तीज बरोबर ते मॅच होतात. सिल्व्हर किंवा गोल्डन चेनमध्ये हे गोवल्यास छान कॉम्बिनेशन होते. या ज्वेलरीमध्ये अपकमिंग ब्रेसलेट कलेक्‍शनचा देखील समावेश करू शकता. यामुळे तुमचा लूक एकदम परिपूर्ण होईल. 

     आता कोबी काढून त्याच प्रोसेसरमध्ये २-३ काकड्या, २-२ किंवा ३-३ तुकतडका कलेक्‍शनची खासियत म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल असा एखादा मसाल्याचा पदार्थ म्हणजे तिखट बोलणाऱ्या तरुणींसाठी एकदम कोल्हापूरची अस्सल मिरचीदेखील यामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे ही ज्वेलरी तरुणींमध्ये ‘स्टाइल आयकॉन’ म्हणूनही लोकप्रिय होत आहे. 
छायाचित्र सौजन्य ः स्वाभी

फोटो फीचर

संबंधित बातम्या