ब्लॅक ब्युटी

समृद्धी धायगुडे
गुरुवार, 5 जुलै 2018

ट्रेंड्‌स
 

भारतात बऱ्याच ठिकाणी काळा रंग निषिद्ध मानला जातो. बऱ्याच जणींना तो याच कारणासाठी आवडत नाही. पण सध्या तरुणी असा विचार करताना दिसत नाहीत. ब्लॅक ब्युटीची भुरळ प्रत्येकीलाच पडते. त्यामुळे काळ्या रंगातील साड्या, ड्रेस, कॅज्युअल आऊटफिट्‌स हे नेहमीच आपल्याला खुणावत असतात. या ब्लॅक ट्रेंड विषयी... 

  • सध्या सगळीकडे पावसाळी हवा आहे. अशा कुंद वातावरणात कुठे काळे कपडे घालायचे असा प्रश्न काही जणींना पडू शकतो. बऱ्याच जणींना काळा रंग म्हणजे उदासबिदास वाटतो असा एक समज आहे.
  • पावसाळ्यात शक्‍यतो ब्राइट कलर वापरावेत असे म्हणतात. आता काळा रंग हा ऑलटाइम फेवरिट कलर मानला जातो. कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशनच्या जमान्यात तर काळ्या रंगाचे महत्त्व अधिकच वाढत आहे.
  • स्ट्रीट फॅशन ते सेलिब्रिटी फॅशन अशा सर्व प्लॅटफॉर्मवर सध्या काळ्या रंगाची मागणी वाढत आहे. एवढंच कशाला अलीकडे रंगीत छत्र्यांपेक्षाही काळ्या छत्र्या पुन्हा ट्रेंडमध्ये येत आहेत, अर्थात त्याला पर्सनल टच असतो.
  • मुख्य म्हणजे ज्यांना आपण फॅशनच्या बाबतीत मागे आहोत असे वाटते त्यांनीदेखील काळ्या रंगांच्या ॲक्‍सेसरीज किंवा ड्रेससोबत कॉम्बिनेशन करता येते. त्यामुळे या सिजनमध्ये ब्लॅक कॉम्बिनेशनचे कपडे आणि ॲक्‍सेसरीज बिनधास्त वापरा.
  • याशिवाय काळ्या रंगाचा विशेषतः पावसाळ्यासारख्या सिजनमध्ये मेन्टेनन्सही कमी असतो. काळा रंग हेअर ॲक्‍सेसरीजपासून ते स्टायलीश पादत्राणांपर्यंत कशातही उठून दिसतो. अर्थात तुम्ही ते कोणत्या रंगासोबत मॅच करता हे महत्त्वाचे असते.
  • काळ्या रंगाची आणखी एक खासियत म्हणजे त्यावर सिल्व्हर, गोल्ड यासारख्या दुसऱ्या ब्राईट कलरच्या ॲक्‍सेसरीज सहज 
  • उठून दिसतात आणि तुम्ही स्टायलिश दिसू शकता. त्यामुळे आता काळा रंग निषिद्ध न मानता फॅशन म्हणून वापरायला नक्कीच हरकत नसावी.

फोटो फीचर

संबंधित बातम्या