ओव्हरसाइज इयरिंग्ज

समृद्धी धायगुडे
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

ट्रेंड्‌स
तरुणींसाठी ज्वेलरी म्हणजे एकदम वीकपॉइंट असतो. विशेषतः कानातले. कारण एकवेळ गळ्यात फार काही घातले नाही तरी काही वाटत नाही, पण कानात मात्र आवडीनुसार आणि पेहरावाला सूट होतील असे कानातले आवर्जून घातले जातात. याच ट्रेंडमध्ये सध्या ओव्हरसाइज इयरिंग्जची भर पडली आहे. याविषयी जाणून घेऊ...

  • बॉलिवूडमध्ये सध्या हा ट्रेंड अभिनेत्री क्रिती सेननमुळे फॉर्मात आहे. आता सणासुदीचे दिवस सुरू होत असल्याने तुम्हालादेखील हे इयरिंग्ज ट्राय करता येऊ शकतात. 
  • एका चित्रपटाच्या निमित्ताने क्रितीचा निऑन कलरच्या शराऱ्यावर झुमर टाइप झुमके घातलेला लूक बऱ्यापैकी चर्चेत आला होता. यामुळे तुम्हाला एक परिपूर्ण पारंपरिक लूक मिळतो.  
  • ओव्हरसाइज इयरिंग्ज हा प्रकार केवळ पारंपरिक पेहरावावरच उठून दिसतो असे नाही, तर मॉडर्न टच असलेले ट्विस्टेड डिझाइनचे ओव्हरसाइज इयरिंग्ज महाविद्यालयीन तरुणी किंवा नोकरदार महिलांना सहज वापरता येतील. 
  • हँगिंग स्टाइल इयरिंग्ज हा प्रकारदेखील ओव्हरसाइज मधील उठावदार प्रकार आहे. हा प्रकार इंडो वेस्टर्न पेहरावावर छान दिसतो. आकर्षक हेअरस्टाइल केल्यास असे इयरिंग्ज आणखीनच आकर्षक दिसतात. 
  • ओव्हरसाइज इअररिंग्जमध्ये हँगिंग स्टाइल, ओवरसाइज्ड चांदबाली स्टाइल, पर्ल विथ स्टोन्स घुंगरू, चांदबाली, टैस्सल हँगिंग स्टाइल, जेम स्टोन विथ पर्ल चांदबाली, बेबी पिंक युनिक डिजाइन्स, पर्ल स्टोन विथ मिनाकारी वर्क, सिल्वर मिरर चंकी स्टाइल इयरिंग्ज, सिल्वर चंकी स्टाइल इयरिंग्ज, मॉडर्न स्टाइल जेम स्टोन इयरिंग्ज, डबल स्टड्स विथ चांदबाली इयरिंग्ज, बेबी पिंक स्टोन्स विथ स्टड्स इयरिंग्ज, कुंदन स्टोन्स चांदबाली असे भरपूर प्रकार यामध्ये उपलब्ध आहेत. 
  • हे इयरिंग्ज घेताना पेहराव आणि हेअरस्टाइल सुसंगत ठेवावी, तरच हे सर्व प्रकार उठावदार दिसतात. पारंपरिक आणि वेस्टर्न, इंडो वेस्टर्न पेहरावावर छान दिसतात.  

संबंधित बातम्या