सनसेट आय मेकअप 

समृद्धी धायगुडे
सोमवार, 22 एप्रिल 2019

ट्रेंड्‌स
समर सीझन म्हटल्यावर प्रत्येक गोष्टीत त्या सीझनचा फिवर आलेला दिसतो. सध्या एक सुंदर ब्यूटी ट्रेंड आला आहे. सूर्यास्ताच्या वेळी आकाशात होणारी रंगांची उधळण नेत्रसुख देणारी असते, तेच रंगीत सौंदर्य आपल्या डोळ्यांच्या बाजूलादेखील रेखाटले जाऊ शकते. तुम्ही निसर्गप्रेमी असाल आणि सनसेट शेड तुम्हाला आवडत असेल, तर या सीझनमध्ये सनसेट आय मेकअप ट्रेंड जरूर ट्राय करा.  

  • सध्या सौंदर्यविश्वात एक अनोखा ट्रेंड व्हायरल होत आहे. त्याचे नाव आहे ‘सनसेट आय लुक.’ यामध्ये आयशॅडोसाठी सूर्यास्तावेळी आकाशात दिसणाऱ्या रंगांचा वापर होतो. ऑरेंज, यलो आणि थोडासा बरगंडी कलर वापरण्यात येतो. जर तुम्हालाही हा ट्रेंड फॉलो करायचा असेल, तर पुढील काही खास टिप्स फॉलो करा. तुम्ही हा आय मेकअप नीट केला, तर खरेच हा लुक अतिशय सुंदर दिसतो. 
  • सनसेट आइज लुक करण्यासाठी तुमच्या मेकअप किटमध्ये ऑरेंज, यलो, बरगंडी आणि न्यूड शेड्‌स असलेले आयशॅडो पॅलेट, ऑयशॅडो ब्रश, प्रायमर, रुज पावडर, लिक्विड लायनर, मस्कारा या गोष्टी आवश्‍यक आहेत. 
  • हा मेकअप करताना सर्वात आधी आपल्या पापण्यांवर व्यवस्थित प्रायमर अप्लाय करावा. त्यामुळे तुमच्या डोळ्यांवर मेकअप दीर्घकाळ टिकण्यास मदत होते. 
  • मनातल्या मनात डोळ्यांचे तीन भागात वर्गीकरण करावे. त्यानंतर मेकअपचा बेस करण्यासाठी संपूर्ण पापणीवर ब्राइट शेडचा बेस लावावा. त्यामुळे याचे रंग उठून दिसतात. 
  • डोळ्यांच्या पहिल्या भागामध्ये पिवळ्या रंगाची आयशॅडो आणि दुसऱ्या भागात ऑरेंज कलरची शेड लावावी. मुलायम ब्रशने दोन्ही रंग व्यवस्थित एकत्र करावेत. तिसरा भाग म्हणजे डोळ्यांच्या बाहेरील भागात बरगंडी रंग लावावा. त्यानंतर ऑरेंज आणि बरगंडी कलर ब्रशच्या साहाय्याने व्यवस्थित एकत्र करावेत. 
  • पापण्यांच्या किनाऱ्यांवर मॅजंटा कलरची डार्क शेडही वापरू शकता. तुम्ही दिवसा मेकअप करत असाल, तर मॅजंटा कलर नाही लावला तरी चालेल. 
  • या आय मेकअपला फायनल टच देताना ब्लॅक आयलायनरचा वापर करावा आणि मस्करा लावावा. 
  • हा लुक जास्त ग्लिटरी नसला तरी थोडासा हटके आहे. तुम्ही एखाद्या खास समारंभासाठी किंवा पार्टीसाठी हा लुक जरूर करू शकता. मेकअप करतानाही या शेड्‌सचा वापर केल्यास तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य आणखी खुलते. 
  • या संदर्भातील व्हिडिओ तुम्ही ऑनलाइन बघू शकता.     

संबंधित बातम्या