ब्लूटूथ स्पीकर्स   

ज्योती बागल 
सोमवार, 21 डिसेंबर 2020

ख्रिसमस, वर्षअखेर आणि नवीन वर्षाची चाहूल लागल्याने लहानमोठ्या पार्ट्यांना सुरुवात होईल. मात्र कोरोनाचा धोका लक्षात घेता अजूनही जास्त लोकांना एकत्र येण्याची परवानगी नाही. त्यामुळे गर्दीची ठिकाणे टाळून निसर्गरम्य ठिकाणी मोजक्या मित्रमैत्रिणींमध्ये सेलिब्रेशन करणे केव्हाही उत्तम! आणि अशाच सेलिब्रेशनसाठी गरजेचे असणारे ब्लूटूथ स्पीकर्स नुकतेच बाजारात लाँच झाले आहेत त्याविषयी...      

भारतीय कंपनी ‘यू अँड आय’ (U&I)ने एक नवीन वायरलेस ब्लूटूथ स्पीकर लाँच केला आहे. या स्पीकरला ‘सफारी’ असे नाव दिले असून याची खासियत म्हणजे, तुम्ही हा स्पीकर सहजपणे कुठेही घेऊन जाऊ शकता. या स्पीकरमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0 दिले असून याची कनेक्टिव्हिटी रेंज १० मीटर आहे. या सफारी स्पीकरमध्ये १५०० एमएएच क्षमतेची बॅटरी असून चार तासांचा बॅटरी बॅकअप आणि प्ले-टाईमही आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार स्पीकरची साउंड क्वालिटी उत्तम असून लाँगलाईफ बॅटरी आहे.

‘यू अँड आय’चे हे स्पीकर्स काळ्या, लाला आणि निळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहेत. या स्पीकर्समध्ये इनबिल्ट मायक्रोफोन, मेमरी कार्ड स्लॉट आणि USB चार्जिंग पोर्टही दिले आहे. या ‘सफारी’ स्पीकरची किंमत १,६९९ रुपये एवढी आहे. या कंपनीने गेल्या महिन्यातच ‘टॉपर’ आणि ‘फ्लायर’ नावाने दोन वायरलेस नेकबँड लाँच केले होते. यातील ‘टॉपर’ या नेकबँडमध्ये ५०० एमएएचची बॅटरी आहे. हा नेकबँडला तीन-चार तासांत फुल चार्ज होतो. ‘फ्लायर’ वायरलेस नेकबँडमध्ये २५० एमएएचची बॅटरी असल्याने २० तासांचा प्ले-टाईम मिळतो. हे दोन्ही नेकबँड मल्टी-फंक्शनल आहेत.

‘लुमीफोर्ड’ कंपनीनेही नुकताच एक ‘ब्लॅकस्टोन बीटी ११’ (BlackStone BT11) हा ब्लूटूथ स्पीकर भारतात लाँच केला आहे. हा स्पीकर पूर्णपणे वॉटरप्रूफ असून याची बॅटरी १८०० एमएएच असल्याने उत्तम असल्याचे बोलले जात आहे. या स्पीकरमध्येदेखील कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0 दिले असून याची कनेक्टिव्हिटी रेंज १० मीटर आहे. या डिव्हाईसचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स 80Hz~20KHz एवढा आहे. या ब्लूटूथ स्पीकरचा कॉम्पॅक्ट साईज, खास फीचर्स आणि उत्तम डिझाईन असल्याने, तो ग्राहकांना नक्कीच आकर्षित करू शकतो. अतिशय कॉम्पॅक्ट साईज असल्याने हा स्पीकर युझर्स कुठेही जाताना सहज कॅरी करू शकतात. तसेच वॉटरप्रूफ असल्याने पाण्याने भिजण्याचेही टेंशन नाही. ‘ब्लॅकस्टोन बीटी ११’ या स्पीकरची किंमत १,९९९ रुपये असून तो फक्त ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. हा ब्लूटूथ स्पीकर IPX7 सर्टिफाईड म्हणजेच वॉटरप्रूफ आहे.    

ग्राहक ‘सफारी’ आणि ‘ब्लॅकस्टोन बीटी ११’ हे दोन्हीही स्पीकर्स, सर्वप्रकारच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवरून आणि कंपनीच्या वेबसाइटवरून खरेदी करू शकतात.

संबंधित बातम्या