डिटेल मोबाईल ॲक्सेसरीज   

ज्योती बागल 
सोमवार, 25 जानेवारी 2021

व्हॉट्‌स न्यू

आपल्याला आवश्यक असणाऱ्या मोबाईल ॲक्सेसरीज सहज बाजारात मिळतात, त्याही अगदी कमी किमतीमध्ये! मात्र अशा कमी किमतीत मिळणाऱ्या ॲक्सेसरीजची क्वालिटी उत्तम असतेच असे नाही. अशावेळी युजर्स थोडे पैसे जास्त खर्च करतात आणि ठराविक ब्रँडच्याच वस्तू खरेदी करतात. ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला असाच एक ब्रँड म्हणजे ‘डिटेल’. डिटेलने नुकत्याच पाच मोबाईल ॲक्सेसरीज एकाचवेळी लाँच केल्या आहेत, त्याविषयी थोडक्यात...   

‘सर्वांना परवडणारा ब्रँड’ अशी ‘डिटेल’ (Detel) कंपनीची ओळख निर्माण झाली आहे. हीच ओळख कायम ठेवत कंपनीने  #Connect40croreindians या मोहिमेअंतर्गत मोबाईल ॲक्सेसरीजची नवीन सीरीज लाँच केली आहे. या सीरीजला ‘सुपर इकॉनॉमिक सीरीज’ असे नाव दिले असून यामध्ये Di-10KS पॉवर बँक, Torque नेकबँड, D6 इअरफोन, D09 चार्जर आणि DC20 USB केबल इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. पॉवर बँकची किंमत ४९९ रुपये आहे, तर नेकबँडची किंमत ६९९ रुपये आहे. चार्जर, यूएसबी केबल आणि इअरफोन हे एकाच कॉम्बो पॅकमध्ये मिळतात. या कॉम्बो पॅकची किंमत फक्त २९७ रुपये आहे. वरील सर्व मोबाईल ॲक्सेसरीज कंपनीच्या www.detel-india.com या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.       

वैशिष्ट्ये 

  • पॉवर बँक ः  पॉवर बँक मायक्रो USB चार्जिंग इनपुटसह येते आणि ती पॉलिमर सेल बॅटरीपासून तयार केली जाते. या पॉवर बँकची क्षमता 10,000mAh एवढी आहे. 
  • ब्लूटूथ नेकबँड ः या नेकबँडची खासियत म्हणजे हा ॲपल सिरी आणि गुगल व्हॉइस असिस्टन्टसह मिळतो. यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0 दिले आहे. शिवाय हा वायरलेस नेकबँड वॉटर रेझिस्टंट असून यामध्ये १२ तासांचा प्लेटाइम देणारी 200mAh क्षमतेची बॅटरी आहे.
  • D09 चार्जर ः या चार्जरने एकावेळी दोन डिव्हाइसेस कनेक्ट करता येतात. हा चार्जर 5w/2.4A अल्ट्रा-फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. हा चार्जर इलेक्ट्रिक शॉक आणि ओव्हरहीटिंगसारख्या समस्यांपासून पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 
  • DC20 USB केबल ः ही केबल 1.5A फास्ट चार्जिंगची सेवा पुरवते. ती काळ्या आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध आहे. तसेच ही केबल रबरयुक्त पीव्हीसी फिनिशिंगमध्ये येते.
  • D6 इअरफोन ः यामध्ये मॅग्नेट बड्स आहेत. कॉलिंगसाठी यामध्ये स्वतंत्र बटण दिलेले आहे. शिवाय ऑटो पॉवर ऑन/ऑफही आहे. त्याचबरोबर यामध्ये 3.5 मिमी हेडफोन जॅकचा सपोर्ट असल्याने इतर गॅजेट्ससाठीही उपयुक्त असल्याचे म्हटले जाते. 
  • डिटेल कंपनीने मोबाईल ॲक्सेसरीजच्या क्षेत्रात मागील चार वर्षांत चांगला जम बसवला असून येत्या दोन वर्षांत भारतीय बाजारात २५ टक्के वाटा निर्माण करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

संबंधित बातम्या