लिनोवो स्मार्ट क्लॉक

ज्योती बागल
सोमवार, 8 मार्च 2021

व्हॉट्‌स न्यू

आज प्रत्येकजण घड्याळाचा काटा आणि कॅलेंडरच्या तारखांबरोबर धावत असतो. कारण सर्वांच्या आयुष्यात वेळेएवढे महत्त्व क्वचितच इतर गोष्टीला असू शकते. अशावेळी एखादे स्मार्ट क्लॉक मदतीला आले तर वेळेचे, दिवसांचे योग्य नियोजन करता येईल. असेच एक स्मार्ट क्लॉक लिनोवोने नुकतेच लाँच केले आहे, त्याविषयी थोडक्यात...  

लिनोवोने स्मार्ट क्लॉक इसेन्शिअल (Lenovo Smart Clock Essential) नुकतेच भारतात लाँच केले आहे. हे एक कनेक्टेड डिजिटल क्लॉक असून याला ‘गूगल असिस्टंट’चा सपोर्ट आहे. हे घड्याळ मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात युरोपमध्ये लाँच झाले होते. २०१९मध्ये भारतीय बाजारात लाँच केलेल्या ‘लिनोवो स्मार्ट क्लॉक’चे हे वॉटरडाऊन व्हर्जन आहे. या क्लॉकमध्ये ‘इझी टू रीड’ एलईडी डिस्प्ले दिला आहे. त्यामध्ये रिअल टाइम इन्फर्मेशन, म्हणजेच वेळ, वातावरण आणि तापमानाविषयीची माहिती मिळते. तसेच क्लॉकमध्ये एक अँम्बिअन्ट लाइट सेंसर (Ambient light sensor) दिले असून ते डिस्प्लेचा ब्राइटनेस ऑटोमॅटिकली कमी-जास्त करते. 

लिनोवो स्मार्ट डिजिटल क्लॉकच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले, तर यामध्ये चार इंचाचा एलईडी डिस्प्ले आहे. तसेच यामध्ये Amlogic A113X प्रोसेसर, 4 GB रॅम आणि  512 MB, eMMC स्टोरेज दिले आहे. या क्लॉकमध्ये 1.5 इंचाचा स्पीकर दिला असून त्याची पॉवर तीन वॅट एवढी आहे. त्याबरोबरच यामध्ये दोन मायक्रोफोन्स आणि एक इनबिल्ट नाइट लाइट आहे. हा नाइट लाइट 31 lumens चा ब्राईटनेस देतो, त्याची अंधारात मदत होते. याशिवाय यामध्ये एक इंटिग्रेट यूएसबी पोर्ट दिला आहे. याचा उपयोग फोन किंवा अन्य डिव्हाइसेस चार्जिंगला लावण्यासाठी होऊ शकतो. या क्लॉकमध्ये मायक्रोफोन म्यूट टॉगल दिले आहे, जे मायक्रोफोन्स वापरात नसताना त्यांना डिसेबल करण्यास मदत करते. 

या स्मार्ट क्लॉकमध्ये अलार्म तर सेट करता येतोच. पण एक खास बाब म्हणजे यामध्ये सनराइज अलार्मही दिला आहे, जो ऑन केल्यावर डिस्प्लेचा कलर आणि ब्राईटनेस वेळेनुसार बदलतो. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये  Wi-Fi 802.11ac आणि ब्लूटूथ 5.0 दिले आहे. 

हे स्मार्ट क्लॉक सॉफ्ट टच ग्रे कलरमध्ये उपलब्ध असून याचे वजन २४० ग्रॅम एवढे आहे. लिनोवोच्या या स्मार्ट क्लॉक इसेन्शिअलची किंमत भारतात ४,४९९ रुपये आहे. याची विक्री ई-कॉमर्स वेबसाइट आणि लिनोवोच्या Lenovo.com या ऑफिशिअल वेबसाइटवर सुरू असून लवकरच याची ऑफलाइन विक्रीदेखील सुरू होणार आहे.

संबंधित बातम्या