कॉर्डलेस स्टिक व्हॅक्युम क्लीनर

ज्योती बागल 
सोमवार, 29 मार्च 2021

व्हॉट्‌स न्यू

सध्या सर्वांचे ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ‘वर्क फॉर होम’ असे दोन्ही पद्धतीने काम सुरू आहे. त्यामुळे हातातील कामे उरकण्यासाठी जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरली जात आहेत. ‘वर्क फॉर होम’साठी जास्त उपयोगी पडेल असा ‘कॉर्डलेस स्टिक व्हॅक्युम क्लीनर’ नुकताच बाजारात दाखल झाला आहे, त्याविषयी थोडक्यात...

अमेरिकन इनोव्हेशन कंपनी ‘अँकर’चाच भाग असलेल्या ‘युफी’ने (Eufy) अलीकडेच भारतात एक कॉर्डलेस स्टिक व्हॅक्युम क्लीनर लाँच केला आहे. या व्हॅक्युम क्लीनरला ‘होमवॅक एस ११ गो’  (HomeVac S11 Go) असे नाव दिले आहे.     

‘युफी होमवॅक एस ११ गो’ या व्हॅक्युम क्लीनरमध्ये १२० एडब्ल्यू (एअर वॅट्स) सक्शन पॉवरचा वापर केला असल्याने फ्लोअरसह घरातील सोफा, टेबल अशा वस्तूंवरील कचराही सहज आणि चांगल्या प्रकारे साफ करता येतो. यासाठीच युफीने ‘होमवॅक एस ११ गो’ व्हॅक्युम क्लीनरला नेक्स्ट जनरेशनच्या क्लिनिंग टेकनिकसह लाँच केला आहे. या व्हॅक्युम क्लीनरची बॅटरी लाइफ साधारण ४० मिनिटांची आहे. तसेच यामध्ये एकूण पाच प्रकारची फिल्ट्रेशन सिस्टीम दिली आहे. एचईपीए (HEPA) हा त्यातीलच एक फिल्टर आहे. याच्या साहाय्याने घरातील कोपरा अन कोपरा सहज स्वच्छ करता येतो. शिवाय हे फिल्टर्स वॉशेबल असल्याने वेळोवेळी स्वच्छदेखील करता येतात.  

या कॉर्डलेस स्टिक व्हॅक्युम क्लीनरमध्ये ‘मॅक्झिमम’, ‘मिडल’ आणि ‘लो’ हे तीन मोड दिले असून युजर्स त्यांच्या सोयीनुसार त्याचा वापर करू शकतात. तसेच या व्हॅक्युम क्लीनरमधील ‘डस्ट टाइट एअर कंटेनमेंट’ वायू प्रदूषणही कमी करतो. या व्हॅक्युम क्लीनरबरोबर हँगर, फ्लोअर ब्रश, एसी चार्जर, मेटल होस, लाँग सर्व्हिस टूल, सॉफ्ट टचसाठी ‘टू इन वन सर्व्हिस टूल’, मिनी मोटराइज्ड ब्रश आणि एक्स्टेंशनही मिळते. त्याचबरोबर यामध्ये एक लाईटही दिला आहे. अंधारात साफसफाई करताना त्‍याची मदत होते. 

हा व्हॅक्युम क्लीनर दारावर सहज टांगता येतो. ‘युफी वॅकहोम एस ११ गो’ची किंमत १७,९९९ रुपये असून यावर १२ महिन्यांची वॉरंटीदेखील उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या