ट्रेंडी होम अप्लायन्सेस

ज्योती बागल 
सोमवार, 12 एप्रिल 2021

व्हॉट्‌स न्यू

सणासुदीचे दिवस आले की घरोघरी आवश्यक, मोठ्या आणि खास वस्तू खरेदी करण्याचे प्लॅन सुरू होतात. गुढीपाडव्याला एखादा दागिना किंवा नवीन वस्तू खरेदी करण्याकडे कल असतो. यामध्ये गाडी आणि घर खरेदीसह टीव्ही, होम थिएटर, फ्रिज, एसी, कुलर, वॉशिंग मशीनपासून ते अगदी इंडक्शन चुल्हा, गॅस शेगडी, मायक्रोवेव्ह, आटा चक्की अशा लहान-मोठ्या होम अप्लायन्सेसलाही प्राधान्य दिले जाते. रोजच्या वापरात लागणाऱ्या अशाच काही होम अप्लायन्सेसविषयी थोडक्यात...

हल्ली शहर असो की ग्रामीण भाग, वाढत्या लोकसंख्येमुळे जागेची कमतरता सर्वत्र सारखीच भासत आहे. त्यामुळे कमी जागेत घरातील वस्तू व्यवस्थित ठेवता याव्यात अशी सर्वांचीच अपेक्षा असते. वस्तूंची रेलचेल असणारा घरातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे किचन! किचनमध्ये लागणाऱ्या छोट्यामोठ्या वस्तू सहज ठेवता याव्यात आणि जास्त पसाराही होऊ नये; शिवाय किचनला मॉडर्न लुक यावा, यासाठी मॉड्युलर किचनची मागणी वाढताना दिसत आहे. गॅस शेगडी, इंडक्शन चुल्हा, टोस्टर, मिक्सर आणि अशा बऱ्याच महत्त्वाच्या व उपयुक्त वस्तू किचनमध्ये असाव्यात अशी प्रत्येक गृहिणीची इच्छा असते. गॅस शेगडीमध्ये प्रेस्टिज, श्री सूर्या शक्ती बालाजी स्टेनलेस स्टील, बटर फ्लाय स्मार्ट ग्लास गॅस स्टोव्ह, मिल्टन गॅस स्टोव्ह, बजाज पॉप्युलर इको स्टेनलेस स्टील गॅस शेगडी, पिजन गॅस शेगडी, सनफ्लेम शक्ती इत्यादी दोन, तीन आणि चार बर्नर असलेल्या शेगड्या उपलब्ध आहेत. काही स्टीलच्या आहेत तर काही शेगड्यांचा वरचा भाग काचेचा आहे. शिवाय त्यात नक्षीकाम केलेले असल्याने त्या जास्त छान दिसतात. यांच्या साधारण किमती दोन ते वीस हजार हजार रुपयांपर्यंत आहेत.

इंडक्शन चुल्हा हा आयत्यावेळी उपयोगी पडणारा असल्याने, तसेच सहजपणे कुठेही घेऊन जाता येत असल्याने त्याचे महत्त्व आपोआपच वाढते. या इंडक्शनमध्ये हॅवेल्स, पिजन, बजाज, सूर्या, प्रेस्टिज, फिलिप्स इत्यादी कंपन्यांसह काही लोकल कंपन्यांचे इंडक्शनही बाजारात उपलब्ध आहेत. यांच्या किमती दीड हजारांपासून १० हजारांच्या दरम्यान आहेत. यातील काही इंडक्शनमध्ये पॉवर सेव्हर टेक्नॉलॉजी, ड्युअल फिट सेन्सर, ऑटोमॅटिक शट ऑफ, ऑटोमॅटिक व्होल्टेज रेग्युलेटर, अँटी मॅग्नेटिक वॉल, इन्सेक्ट प्रूफ डिझाईन, एरोडायनॅमिक कुलिंग सिस्टीम, टायमर विथ युजर प्रिसेट, एलईडी डिस्प्ले असे फीचर्स पाहायला मिळतात. या सर्वच इंडक्शनवर किमान एक वर्षाची वॉरंटी दिली जाते.

हल्ली घरात मिक्सर ग्राइंडर आणि फूड प्रोसेसर दिसला नाही तर नवलच. यामध्ये बजाज, फिलिप्स, पिजन, प्रेस्टिज, उषा, केनस्टार, बटरफ्लाय इत्यादी कंपन्यांचे प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. ब्लॅक अँड व्हाईट या क्लासी कलर्समधील प्रॉडक्ट्सना जास्त मागणी आहे. बऱ्याचदा मिक्सर ग्राइंडर आणि फूड प्रोसेसर ‘टू इन वन’ स्वरूपात येतात. यांच्या साधारण किमती पाच ते १५ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. मिक्सरमध्ये फक्त दोन-तीन भांडी येतात, मात्र फूड प्रोसेसरमध्ये बोल, बोल कव्हर, ज्युसर कव्हर, ब्लेंडर जार, ड्राय ग्राइंडिंग जार, चटणी जार, ज्युसर, एग व्हिस्कर, आटा केनेडर, चॉपर ब्लेड, कटर इत्यादी भांडी येतात. या सर्व मिक्सर ग्राइंडर आणि फूड प्रोसेसरच्या मोटरवर साधारण पाच वर्षांची तर, प्रॉडक्टवर दोन वर्षांची वॉरंटी उपलब्ध आहे.  मायक्रोवेव्ह आणि टोस्टरमध्ये मॉर्फी रिचर्ड, बजाज, हॅवेल्स, एलजी, सॅमसंग, पिजन, फिलिप्स, पॅनासॉनिक, गोदरेज, केंट, उषा इत्यादी कंपन्यांसह आणखी काही लोकल ब्रँडचे प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. टोस्टरच्या साधारण किमती ६५० रुपयांपासून पुढे दोन हजारांपर्यंत आहेत. तर मायक्रोवेव्हचा किमती ५,५०० पासून २५ हजारांच्या दरम्यान आहेत. दोन, चार आणि सहा ब्रेड स्लाइसची कपॅसिटी असलेले टोस्टर बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये ब्लॅक, ब्राउन, सिल्वर इत्यादी रंग पाहायला मिळतात. बऱ्याच कंपन्यांचे टू इन वन स्वरूपातील मायक्रोवेव्ह-टोस्टर उपलब्ध आहेत. ते कॉम्पॅक्ट असल्याने आणि टू इन वन असल्याने परवडणारे आहेत. यावर सर्वसाधारण एक वर्षांची वॉरंटी मिळते.        

घरगुती आटा चक्कीमध्ये बजाज, नटराज व्हिवा डिझाइनर चक्की, नटराज टॉल आटा चक्की, हायस्टार डोमेस्टिक आटा चक्की, मिलसेंट आटा चक्की, मिल्टन इत्यादी प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. आटा चक्कीमध्ये जास्त करून लोकल ब्रँडचेच पर्याय दिसतात. यांच्या सर्वसाधारण किमती ११ ते २५ हजार रुपयांपर्यंत आहेत.  

आता थंडी संपून उन्हाळा सुरू झाला आहे. अशावेळी एखादा नवीन फॅन, एसी किंवा कुलर घरात येतोच येतो. सिलिंग आणि टेबल फॅनमध्ये हॅवेल्स स्विंग, बजाज अल्टिमा, बजाज इस्टिम, अँकर, उषा मॅक्स, उषा डायनॅमो स्पेशिअल डिझाइनर फॅन, ओरियंट डेस्क, ओरियंट इलेक्ट्रिक विंड प्रो डेस्क-६० असे बरेच प्रॉडक्ट्स खास उन्हाळ्यासाठी बाजारात आले आहेत. सिलिंग फॅनच्या साधारण किमती ३,५०० पासून पुढे आहेत. तर टेबल फॅनच्या किमती १,२०० रुपयांपासून पुढे आहेत. 

कुलरमध्ये सिम्फनी डायट 12T पर्सनल टॉवर एअर कुलर, सिम्फनी पर्सनल एअर कुलर, केनस्टार लिटिल ३५ एअर कुलर, व्होल्टास एअर कुलर, बजाज पर्सनल एअर कुलर, हिंदवेअर पर्सनल एअर कुलर, क्रोमटोन एअर कुलर इत्यादी प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. यांच्या किमती साधारण ३,५०० पासून पुढे आहेत. यांच्या किमतीदेखील त्यांच्या कपॅसिटीनुसार ठरतात. एसीमध्ये सॅमसंग, व्हर्लपूल, गोदरेज, ब्लू स्टार, हायर, पॅनासॉनिक, व्होल्टास, हिताची इत्यादी कंपन्यांचे प्रॉडक्टस पाहायला मिळतात. या एसींची कपॅसिटी ‘टन’मध्ये असते आणि त्यानुसार त्यांच्या किमती ठरतात. त्यांना मिळालेल्या स्टारवरून त्याची क्वालिटी ठरवली जाते. व्हर्लपूलचा १.५ टन कपॅसिटी व फाईव्ह स्टार असलेला एसी ३५ हजारापर्यंत येतो. सॅमसंगचा १.५ टन व थ्री स्टार एसी ३० हजारांपर्यंत मिळतो. ब्लू स्टारचा ०.८ टन व थ्री स्टार असलेला एसी २६ हजारांपर्यंत मिळतो. ब्लू स्टारचा एक टन पोर्टेबल एसी २८ हजारांपर्यंत मिळतो. हिताचीचा १.५ टन व फाईव्ह स्टार असलेला एसी ४२ हजारांपर्यंत येतो. तसे पाहायला गेले तर ब्रँडनुसार एसीच्या किमती कमीजास्त होत असतात.

घरात वर्षाचे बाराही महिने उपयुक्त आणि गरजेची असणारी वस्तू म्हणजे रेफ्रिजरेटर! रेफ्रिजरेटरमध्ये एलजी, गोदरेज, व्हर्लपूल, सॅमसंग, सोनी, हायर, पॅनासॉनिक इत्यादी कंपन्यांचे सिंगल आणि डबल डोअर रेफ्रिजरेटर्स बाजारात उपलब्ध आहेत. व्हर्लपूलचा ३५५ लिटरचा थ्री स्टार-फोर्स्ट फ्री डबल डोअर फ्रिज ३८ हजारांत उपलब्ध आहे. सॅमसंगचा २५५ लिटर्सचा थ्री स्टार इन्व्हर्टर डायरेक्ट कूल सिंगल डोअर फ्रिज २० हजारांपर्यंत मिळतो. गोदरेजचा १९० लिटरचा फाईव्ह स्टार-इन्व्हर्टर डायरेक्ट कूल-सिंगल डोअर १६,५०० पर्यंत येतो. एलजीचा २६० लिटरचा थ्री स्टार-फोर्स्ट फ्री-डबल डोअर २५ हजारांपर्यंत मिळतो. अलीकडे डबल डोअर फ्रिजची मागणी वाढली असून सॅमसंगच्या रेफ्रिजरेटरला ग्राहकांची अधिक पसंती मिळत आहे.

वॉशिंग मशीन्समध्ये गोदरेज, हायर, व्हर्लपूल, सॅमसंग, एलजी, आयएफबी इत्यादी कंपन्यांची मॉडेल्स उपलब्ध आहेत. यामध्ये फ्रंट लोडिंग आणि अप लोडिंग असे दोन प्रकार पाहायला मिळतात. तसेच फुल्ली ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक असे दोन प्रकार आहेत. वॉशिंग मशीन्सची क्षमता किलोमध्ये मोजली जाते आणि त्यानुसार त्यांच्या किमती ठरतात. एलजीचे नऊ किलो-फाईव्ह स्टार-इन्व्हर्टर वायफाय-फुल्ली ऑटोमॅटिक-फ्रंट लोडिंग वॉशिंग मशीन ३९ हजारांत उपलब्ध आहे. गोदरेज ६.२ किलो - फुल्ली ऑटोमॅटिक - टॉप लोडिंग वॉशिंग मशीन १२,५०० पर्यंत मिळते. व्हर्लपूल सात किलो - फाईव्ह स्टार - रॉयल फुल्ली ऑटोमॅटिक - टॉप लोडिंग वॉशिंग मशीन १५ हजारांपर्यंत उपलब्ध आहे. सॅमसंग सहा किलो - फाईव्ह स्टार-सेमी ऑटोमॅटिक - टॉप लोडिंग वॉशिंग मशीन ८,५०० पर्यंत उपलब्ध आहे. फ्रंट लोडिंग वॉशिंग मशीन्सना जास्त मागणी आहे.  टीव्ही आणि होम थिएटर सिस्टीममध्ये सोनी, फिलिप्स, सॅमसंग, एलजी, पॅनासॉनिक, थॉमसन, मी टीव्ही, ओनिडा, इत्यादी कंपन्यांचे मॉडेल्स उपलब्ध आहेत. टीव्ही अगदी २२ इंचांपासून उपलब्ध आहेत. एलजीचा १६४ सीएम - ४के अल्ट्रा एचडी स्मार्ट आयपीएस एलईडी टीव्ही ८० हजारांत उपलब्ध आहे. सोनीचा १६४ सीएम - ४के अल्ट्रा एचडी स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही ९९ हजारांत उपलब्ध आहे. सोनीचे होम थिएटर सिस्टीम २५ हजारांपासून पुढे उपलब्ध आहेत. तर फिलिप्सची साउंड सिस्टीम अगदी सात हजारांपासून पुढे उपलब्ध आहे. 

बाजारात विविध गृहोपयोगी वस्तूंचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण सध्या सर्वत्र कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आखून दिलेल्या नियमांमुळे ग्राहकांना ऑनलाइन खरेदीला प्राधान्य द्यावे लागत असेल, तरीही नियम शिथील झाल्यानंतर या पर्यायांचा नक्कीच विचार करायला हरकत नाही.

     (लेखात दिलेल्या वस्तूंच्या आकारात आणि किमतीत बदल होऊ शकतो.)

संबंधित बातम्या