हँडमेड स्मार्टवॉच

ज्योती बागल 
सोमवार, 21 जून 2021

व्हॉट्‌स न्यू

बुगाटी ही गाड्यांसाठी प्रसिद्ध असलेली कंपनी आहे. मात्र इतर कंपन्यांप्रमाणे या कंपनीनेदेखील गाड्यांबरोबरच इतर उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली आहे. बुगाटीने नुकतेच एक हँडमेड स्मार्टवॉच बाजारात आणले असून अवघ्या वीस दिवसांत ते तयार करण्यात आले आहे. या स्मार्टवॉचविषयी थोडक्यात...

बुगाटी (Bugatti) या प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनीने नुकतेच आपले पहिले हँडमेड स्मार्टवॉच लाँच केले. बुगाटीने स्मार्टवॉचची एकूण तीन नवी मॉडेल्स लाँच केली आहेत, ती म्हणजे ‘Bugatti Ceramique Edition One Pur Sport’, ‘Bugatti Ceramique Edition One Le Noire’ आणि ‘Bugatti Ceramique Edition One Divo’. या स्मार्टवॉचमध्ये जीपीएस सेन्सर, हार्ट रेट मॉनिटरिंग, स्ट्रेस लेव्हल आणि ब्लड ऑक्सिजनसारखे सध्याच्या काळात गरजचे असलेले अनेक फीचर्स दिले आहेत.        

हे तिन्ही स्मार्टवॉच हँडमेड आहेत. ही स्मार्टवॉच आयटी एक्स्पर्ट आणि वॉच एक्स्पर्ट्सच्या टीमने मिळून तयार केल्याचे समजते. या स्मार्टवॉचमध्ये जवळजवळ एक हजार वेगवेगळ्या पार्ट्सचा वापर केला गेला आहे. बुगाटीने म्हटले आहे, की त्यांच्या हायपर स्पोर्ट्स कारमध्ये ज्या इंजिनिअरिंगचा वापर केला आहे, त्याचाच वापर या स्मार्टवॉचमध्येही केला आहे. हे स्मार्टवॉच घेणाऱ्या ग्राहकांना या स्मार्टवॉचला कस्टमाईज करण्याचाही पर्याय उपलब्ध असेल. त्याचबरोबर या वॉचबरोबर रबर स्ट्रॅप आणि टायटॅनियम स्ट्रॅपचा पर्याय असेल.

बुगाटीच्या या स्मार्टवॉचमध्ये ९०पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड दिले आहेत. वॉटर रेझिस्टंटसाठी या स्मार्टवॉचला १० एटीएमचे रेटिंग मिळाले आहे. तसेच यामध्ये राउंड एमोलेड डिस्प्ले दिला आहे, त्याचे रिझोल्युशन ३९० x ३९० पिक्सेल एवढे आहे. शिवाय यात 445mAh ची बॅटरी दिली असून १४ दिवसांचा बॅकअप असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या तिन्ही स्मार्टवॉचची किंमत कंपनीने अंदाजे ८० हजार (€ ८९९) ठेवली असून या स्मार्टवॉचवर पाच वर्षांची वॉरंटी दिली आहे. 

फायरबोल्टचे स्वस्त स्मार्टवॉच!

फायरबोल्टने (Fire-Boltt) भारतीय बाजारात कॉलिंग फीचरसह नुकतेच एक  स्मार्टवॉच लाँच केले आहे. 

याला ‘Fire-Boltt Talk’ 

असे नाव दिले आहे. या स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंगसह फिटनेस ट्रॅकरसारखे फीचरही आहेत. यामध्ये मल्टिपल स्पोर्ट्स मोड उपलब्ध आहेत. तसेच वॉटर रेझिस्टंटकरता आयपीएक्स ७ रेटिंगदेखील आहे. यात २४० x २८० पिक्सेल रिझोल्युशनसह 44mm बेव्हल कर्व्हड् ग्लास 3D HD डिस्प्ले आहे. या स्मार्टवॉचची किंमत ४,९९९ रुपये असून सध्या याची विक्री फ्लिपकार्टवरून करता येऊ शकते. उपलब्ध माहितीनुसार असे कळते की ब्लूटूथ कॉलिंगसह भारतीय बाजारात विकले जाणारे हे सर्वात स्वस्त स्मार्टवॉच आहे.

संबंधित बातम्या