‘व्हिटॅमिन सी फिल्टर’ असलेला एसी!

ज्योती बागल
सोमवार, 5 जुलै 2021

व्हॉट्‌स न्यू

कामाच्या ठिकाणी अल्हाददायक वातावरण असेल तर काम शांतपणे करता येते आणि यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतो तो एअर कंडिशनर. त्यामुळे कामाचे ठिकाण घर असो किंवा ऑफिस, तिथे एक चांगला एसी असायलाच हवा. असाच एक वैशिष्ट्यपूर्ण एसी प्रसिद्ध कंपनी ‘टीसीएल’ने नुकताच भारतात लॉँच केला आहे. या एसीची खासियत म्हणजे हा ‘व्हिटॅमिन सी फिल्टर’ असलेला एसी आहे. त्याविषयी थोडक्यात...   

टीसीएल कंपनीने भारतात एक इनोव्हेटिव्ह एअर कंडिशनर (TCL AI Ultra Inverter AC) लाँच केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे संचलित होणारा हा फिल्टर एसी घराला बॅक्टेरिया फ्री ठेवतो. हा एसी अल्ट्रा-इन्व्हर्टर एसी असून यामध्ये थ्री इन वन फिल्टरेशन टेक्निकचा वापर केला आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन सी फिल्टर, सिल्व्हर आयन आणि डस्ट फिल्टर इत्यादी फिल्टर्सचा समावेश आहे. या फिल्टर्सच्या मदतीने एसी हवेतील धूळ, जिवाणू नष्ट करून मॉइस्चरायझिंग इफेक्ट देतो. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये R32 इको-फ्रेंडली रेफ्रिजरंट, फोर-वे एअरफ्लो, गूगल असिस्टंट, टीसीएल होम, डिजिटल डिस्प्ले आणि हाय-प्रिसिजन तापमान शोधण्यासाठी ‘आय फील टेक्नॉलॉजी’चा समावेश केला गेला आहे.

हा अल्ट्रा-इन्व्हर्टर एसी टीसीएलच्या मालकीचे टायटन गोल्ड इव्हॅपोरेटर आणि कंडेन्सरने सुसज्ज असून यामध्ये १०० टक्के कॉपर ट्युबिंग आहे. त्यामुळे एसीच्या पृष्ठभागावर धूळ जमा होत नाही आणि प्रॉडक्ट दीर्घकाळ चांगले राहते. हा एसी ३० सेकंदात रूम टेंपरेचर १८ डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी करून जलद गतीने कुलिंग करतो. टीसीएल एसी कमी फ्रिक्वेंसी ऑपरेशनसाठी एक चांगले डिव्हाईस असून हा ५० टक्क्यांपर्यंत वीज बचत करत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या टीसीएल एआय अल्ट्रा इन्व्हर्टर एसीची कपॅसिटी १.५ टन आहे. या मॉडेलची किंमत २७,९९० रुपये आहे.

‘या कोरोना महासाथीच्या काळात सध्या बऱ्याच कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू केले आहे. हा बदल स्वीकारणे मालकांसह कर्मचाऱ्यांसाठीदेखील सोपे नव्हते, अशावेळी आमच्या व्हिटॅमिन सी फिल्टर एसीमुळे लोक आरामदायक आणि शांत ‘वर्क फ्रॉम होम सेटिंग’सह बॅक्टेरिया फ्री वातावरणात काम करू शकतील याची खात्री वाटते,’ असे टीसीएल इंडियाचे एसी बिझनेस हेड विजय कुमार मिकिलिनेनी म्हणतात.

 

संबंधित बातम्या