‘झियुन’चे नवे गिंबल्स

ज्योती बागल 
सोमवार, 20 सप्टेंबर 2021

व्हॉट्‌स न्यू

ल्ली फोटोग्राफी, व्हिडिओग्राफीमध्ये क्रिएटिव्हिटी वाढली आहे. त्यामुळे फोटोग्राफर असोत की व्हिडिओमेकर; उत्तम काम आणि क्वालिटीसाठी फोटोग्राफीच्या किटमध्ये एक गिंबल तर हवाच. जेणेकरून कॅमेरा स्थिर राहतो आणि व्हिडिओ अधिक प्रभावीपणे शूट करता येतात. कॅमेरा आणि स्मार्टफोनच्या गिंबलसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘झियुन’ कंपनीने भारतात नुकतेच ‘स्मूथ Q3’ आणि ‘विबील 2’ हे दोन गिंबल लाँच केले आहेत. 

‘झियुन’ (ZHIYUN) कंपनीने भारतात कॉम्पॅक्ट फीचरसह दोन नवीन गिंबल लॉँच केले आहेत. यामध्ये ‘स्मूथ Q3’ (Smooth-Q3) आणि ‘विबील 2’ (Weebill 2)सह काही कॉम्बोही उपलब्ध आहेत. हे गिंबल एक थ्री-ॲक्सेस डिव्हाइस असून ते रोटेटेबल फिल लाइट आणि १७ स्मार्ट टेम्पलेटसह सुसज्ज आहे. त्याचबरोबर यामध्ये 4300K वॉर्म-टोन्ड इंटिग्रेटेड फिल लाइटचे फीचर असून यात तीन स्तरांची ब्राईटनेस ॲडजस्टमेंट उपलब्ध आहे. तसेच १८० डिग्री फ्रंट आणि रिअर लायटिंगसाठी टच बटन कंट्रोल सपोर्टसह सुसज्ज आहे. हे गिंबल ZY Cami ॲपबरोबरदेखील वापरता येऊ शकतात. 

याशिवाय ‘स्मूथ Q3’च्या आणखी काही नवीन फीचर आहेत. यामध्ये जेश्चर कंट्रोल, स्मार्ट फॉलो 3.0 ऑब्जेक्ट ट्रॅकिंग, इन्स्टन्ट डॉली झूम आणि मॅजिक क्लोन पॅनोरामा यांचा समावेश आहे. हे गिंबल, या आधीचे मॉडेल म्हणजेच ‘स्मूथ Q2’पेक्षा वजनाने हलके आणि फोल्ड करायलाही सोपे आहे. याचे डायमेंशन ४५ X १५४ X १८० मिमी आहे, तर वजन फक्त ३४० ग्रॅम असून २८० ग्रॅमचा स्मार्टफोन सहजपणे हँडल करू शकते. शिवाय ‘स्मूथ Q3’ हे सगळ्या अँड्रॉइड आणि आयफोनला सपोर्ट करते. 
‘वीबील 2’ हे ‘वीबील’चे रिइन्व्हेंशन असून यामुळे आता प्रत्येक फोटो किंवा व्हिडिओ अधिक प्रोफेशनल आणि क्रिएटिव्ह करता येणे सोपे होईल. ‘स्मूथ Q3’प्रमाणेच ‘वीबील 2’मध्येदेखील अनेक नवीन फीचर असून हे गिंबल फुल कॅमेरा कंट्रोल सपोर्टसह २.८८-इंच, फुल-कलर, फ्लिप-आउट एचडी टच स्क्रीनला सपोर्ट करणारे पहिलेच गिंबल असल्याचे म्हटले जाते.

‘वीबील 2’ला मेनस्ट्रीममधील मिररलेस आणि डीएसएलआर कॅमेरा आणि लेन्ससाठी डिझाईन केले आहेत. ‘स्मूथ Q3’ची किंमत नऊ हजार रुपये आहे, तर ‘Q3 कॉम्बो’ची किंमत १०,५०० रुपये आहे. ‘वीबील 2’ची किंमत ४९ हजार रुपये आहे, तर ‘वाबील 2 कॉम्बो’ची किंमत ५९ हजार रुपये आहे. ‘वीबील 2 प्रो’ची किंमत ७५ हजार रुपये आहे. हे दोन्ही प्रॉडक्ट ॲमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या सर्व प्रमुख ई-कॉमर्स वेबसाइट्ससह कॅमेऱ्यांच्या दुकानातही उपलब्ध आहेत. या दोन्हींवर एक वर्षाची पार्ट्‌स रिप्लेसमेंट वॉरंटी मिळते.

संबंधित बातम्या