ब्लूई मॉन्स्टर होम थिएटर स्पीकर

ज्योती बागल
सोमवार, 4 ऑक्टोबर 2021


व्हॉट्‌स न्यू

घरात एखादा छोटेखानी कार्यक्रम असला किंवा एखादी छोटीशी पार्टी असेल तर होम थिएटर त्या इव्हेंटला चार चाँद लावतात. त्यामुळे दरवेळी भाड्याने स्पीकर्स आणण्यापेक्षा एखादे होम थिएटर विकतच घेतलेले केव्हाही चांगले. नुकत्याच बाजारात दाखल झालेल्या होम थिएटर स्पीकरबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.  

हेडफोन, पॉवरबँक, चार्जरसारख्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्ससाठी प्रसिद्ध असणारी भारतीय कंपनी ‘ब्लूई’ने (Bluei) नुकताच एक होम थिएटर स्पीकर बाजारात आणला आहा. हे ‘ब्लूई मॉन्स्टर’ (Bluei Monster) होम थिएटर 40Wचे असून या स्पीकरला रिमोट कंट्रोल, LED डिस्प्ले आणि 3D स्टिरोओचा सपोर्ट दिला आहे. तर कनेक्टिव्हीटीसाठी ब्लूईच्या या स्पीकरला ब्लूटूथ 5.0चा सपोर्ट दिला असून याची कनेक्टिव्हिटी रेंज १५ मीटरपर्यंत आहे.

ब्लूईच्या या होम थिएटर स्पीकरची खासियत म्हणजे, यामध्ये अँटिनासह एफएम रेडिओदेखील उपलब्ध आहे. तसेच यामध्ये सबवुफरही दिले असून त्यासाठी एक वेगळे बटण दिले आहे; शिवाय युझर्सच्या सोयीसाठी व्हॉल्युम कंट्रोलचे बटणही दिले आहे. त्याचबरोबर या स्पीकरमध्ये Aux/Mic इनपुट, यूएसबी इनपुट उपलब्ध आहे. या स्पीकरला युझर्स मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर तसेच प्लेस्टेशन कनेक्ट करता येते. ब्लूई मॉन्स्टर थिएटर स्पीकरची किंमत ३,४९९ रुपये आहे. हा स्पीकर ब्लॅक कलरमध्ये विक्रीसाठी सर्व रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. यापूर्वीदेखील कंपनीने बरेच ब्लूटूथ स्पीकर लॉँच केले आहेत. 

पोर्ट्रोनिक्स डॅश स्पीकर
पोर्ट्रोनिक्स कंपनीने ‘डॅश स्पीकर’ नावाने एक ब्लूटूथ स्पीकर लॉँच केला आहे. या डॅश स्पीकरची खासियत म्हणजे, कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ 5.0सह यूएसबी आणि 3.5mm ऑक्सचा पर्याय दिला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, यामध्ये वायरलेस कराओके माइकचा सपोर्टदेखील आहे. तसेच या स्पीकरमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग फीचरही आहे. हा स्पीकर पार्टीसारखे इव्हेंट्स लक्षात घेऊन डिझाईन केला आहे असे म्हणता येईल. या डॅश स्पीकरमध्ये असलेली 4400mAhची लिथियम बॅटरी पाच-सहा तासांचा प्लेबॅक देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या स्पीकरचे आउटपुट 40W आहे. तसेच यामध्ये युझर फ्रेंडली डिजिटल डिस्प्ले दिला आहे. पोर्ट्रोनिक्सचा हा स्पीकर ब्लॅक, ग्रे आणि ब्लू या तीन रंगांत उपलब्ध असून याची किंमत ७,४९९ रुपये आहे. शिवाय यावर १२ महिन्यांची वॉरंटीही आहे.

संबंधित बातम्या