पोर्टेबल एअर प्युरिफायर

ज्योती बागल
सोमवार, 13 डिसेंबर 2021

व्हॉट्‌स न्यू

हल्ली दिवसेंदिवस हवेतील प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे शुद्ध हवा मिळावी यासाठी एअर प्युरिफायरसारख्या उपकरणांचा वापर वाढला आहे. यामध्ये बरेच पोर्टेबल प्युरिफायर बाजारात उपलब्ध आहेत. हवा शुद्ध करणाऱ्या अशाच काही पोर्टेबल गॅजेट्सची थोडक्यात माहिती घेऊ...

एअरटेमर (AirTamer) A310 : एअरटेमर हा पोर्टेबल एअर प्युरिफायर २०२०पासून चर्चेत आहे. कारण हा एक चालताफिरता एअर प्युरिफायर आहे. हा गळ्यात घालून कुठेही फिरता येते. हा प्युरिफायर आसपासची तीन फुटांपर्यंतची हवा स्वच्छ करतो, हवेतील विषाणू नष्ट करतो. फक्त याला वेळोवेळी चार्ज करावे लागते. एकदा चार्जिंग केल्यावर हा जवळजवळ १५० तासांचा बॅकअप देत असल्याची माहिती आहे. याचे वजन केवळ ५० ग्रॅम असून याची किंमत ₹   ९,९९९ आहे.

सान्यिपेस (Sanyipace) एअर प्युरिफायर : हा एअर प्युरिफायर नेकलेससारखा असून यामध्ये यूएसबी चार्जिंग दिलेले आहे. हा प्युरिफायर हवेतील धुळीचे कण, प्राण्यांचे केस आणि दुर्गंधी 

नष्ट करून स्वच्छ हवा पुरवतो. याची किंमत ₹    २, ८९९ आहे. 

नुव्होमेड (NuvoMed) एअर प्युरिफायर : या एअर प्युरिफायरमध्ये हेपा फिल्टर वापरला आहे. त्यामुळे हवेतील जवळजवळ ९९ टक्के धूळ, विषाणू नष्ट होऊन शुद्ध हवा मिळते, असे उत्पादकांचे म्हणणे आहे. शिवाय यामध्ये इनबिल्ट आयोनायझर आहे. या प्युरिफायरची किंमत ₹   १,९९९ असून यावर एका वर्षाची वॉरंटीदेखील मिळते.  

एअरशार्क (Airshark) स्मार्ट मास्क : हा स्मार्ट इलेक्ट्रिक मास्क वॉशेबल असून यामध्येदेखील हेपा फिल्टर दिलेला आहे. यामध्ये दिलेल्या फॅनला तीन स्पीड मोड दिलेले आहेत. याला यूएसबी चार्जरने चार्ज करता येत असून याची बॅटरी लाईफ पाच तासांची आहे. या एअरशार्क स्मार्ट मास्कची किंमत ₹    २,९९९ असून यावर एक वर्षाची वॉरंटी मिळते.    

ऑरा एअर (Aura Air) स्मार्ट मास्क : हा एक प्लॅस्टिक इलेक्ट्रिक स्मार्ट मास्क असून यामध्ये चार फिल्टर दिलेले आहेत. हा मास्कही गरजेनुसार चार्जिंग करून वापरता येऊ शकतो. या मास्कची किंमत ₹    २,९९९ आहे. तसेच यावरदेखील एक वर्षाची वॉरंटी दिलेली आहे.

याशिवाय घरासाठी एअर प्युरिफायर बघत असाल, तर हॅवेल्स फ्रेशिया, डायसन प्युअर कूल लिंक टॉवर एअर प्युरिफायर, शाओमी एमआय एअर प्युरिफायर, हनीवेल HAC25M1201W एअर प्युरिफायर आणि फिलिप्स हाय एफिशिएन्सी एअर प्युरिफायर इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत. हे सर्व एअर प्युरिफायर इतर गॅजेट्सप्रमाणे ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

संबंधित बातम्या