एसर ॲस्पायर व्हेरो लॅपटॉप 

ज्योती बागल
मंगळवार, 28 डिसेंबर 2021

व्हॉट्‌स न्यू

अलीकडे प्लॅस्टिक रिसायकलिंग करून त्याचा पुन्हा वापर करून अनेक वस्तू तयार केल्या जातात. नुकत्याच लॉँच झालेल्या ‘एसर ॲस्पायर व्हेरो’ लॅपटॉपची बॉडीदेखील अशाच रिसायकल केलेल्या प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आली आहे. या नव्या लॅपटॉपविषयी थोडक्यात...

एसर ॲस्पायर व्हेरो (Acer Aspire Vero) हा लॅपटॉप भारतात नुकताच लॉँच झाला आहे. विशेष बाब म्हणजे या लॅपटॉपची बॉडी रिसायकल्ड प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आली आहे. हा लॅपटॉप एकाच प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. त्याचबरोबर यामध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस २०२१ उपलब्ध असेल.

‘एसर ॲस्पायर व्हेरो’ या नव्या लॅपटॉपच्या बॉडीमध्ये ३० टक्के पोस्ट कंझ्युमर रिसायकल (PCR) प्लॅस्टिक वापरण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचबरोबर स्क्रीनच्या बेझलमध्येही हेच प्लॅस्टिक वापरण्यात आले आहे, तसेच कीबोर्डही त्यापासून तयार करण्यात आला आहे. लॅपटॉपमध्ये जनरेशन ११चा इंटेल प्रोसेसर असून यात 8 GB रॅमसह 512 GB SSD स्टोरेज उपलब्ध आहे.

‘एसर ॲस्पायर व्हेरो’च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले, तर यामध्ये १५.६ इंचाचा फुल एचडी  डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यशुन १९२० x १०८० पिक्सेल आहे. पॅनेल IPS LED बॅकलाईट TFT LCD आहे. तसेच या लॅपटॉपमध्ये क्वॉड-कोर इंटेल i5-1155G7 प्रोसेसर 4.50GHz, 8GB DDR4 RAM आणि 512GB NVMe SSD स्टोरेज आहे. रॅमसाठी 12 GBपर्यंत सपोर्ट देण्यात आला असून यात इंटेल Iris Xe ग्राफिक्स आहे.

‘एसर ॲस्पायर व्हेरो’मध्ये HD (७२० पिक्सेल) वेबकॅम आहे. यासोबत विंडोज हॅलो फिंगरप्रिंट सपोर्टसह येतो. कीबोर्ड LED ब्लॅकलाइटसह येतो. याची बॅटरी दहा तासांचा बॅकअप देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचबरोबर 65W चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. एसरच्या या लॅपटॉपमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 6 आणि ब्लूटूथ v5.1 दिले आहे. तसेच यात गिगाबाइट इथरनेट, HDMI, USB 3.1, USB 3.2, USB Type-C आणि USB 2.0 पोर्ट दिले आहेत.

‘एसर ॲस्पायर व्हेरो’ची भारतातील किंमत ₹    ७९,९९९ रुपये आहे. एसर या लॅपटॉपसह एक वर्षाचे ॲक्सिडेंटल डॅमेज प्रोटेक्शनदेखील देत आहे. याला एक वर्षाची वॉरंटी दिली आहे; शिवाय ८९९ रुपयांमध्ये दोन वर्षांसाठी वॉरंटी वाढवूनदेखील घेता येते. हा लॅपटॉप वॉलकेनो ग्रे कलरमध्ये उपलब्ध असून ऑनलाइन आणि रिटेल स्टोअर्समधून खरेदी करता येऊ शकतो. 

संबंधित बातम्या