रिबॉकचे फिटनेस स्मार्टवॉच

ज्योती बागल
सोमवार, 7 फेब्रुवारी 2022

व्हॉट्‌स न्यू

आदिदासच्या मालकीची रिबॉक (Reebok) ही स्पोर्टवेअर क्षेत्रातील एक प्रसिद्ध कंपनी आहे. रिबॉकने आता भारतीय बाजारात आपले पहिले स्मार्टवॉच ‘रिबॉक ॲक्टिव्ह फिट 1.0’ (Reebok ActiveFit 1.0) हे ई-कॉमर्सच्या माध्यमातून लाँच केले आहे. 

‘रिबॉक ॲक्टिव्ह फिट 1.0’ला स्मार्ट हेल्थ ट्रॅकरही म्हणता येईल. कारण यामध्ये ब्लड ऑक्सिजन मॉनिटर, २४/७ हार्ट रेट मॉनिटरिंग, हार्ट रेट सेन्सर, ब्लड प्रेशर मॉनिटरिंग, स्लीप मॉनिटरिंग आणि सेडेंटरी रिमाइंडरसारखे फीचर्स दिले असून हे स्मार्टवॉच १५ फिटनेस ट्रॅकिंग मोडसह येते. त्यामुळे सध्याच्या काळात शरीरातील ऑक्सिजनची पातळी, हार्ट रेट, रक्तदाब इ. गोष्टी वेळच्या वेळी जाणून घेण्यासाठी हे स्मार्टवॉच उपयुक्त ठरू शकते.

अन्य फिटनेस फीचरमध्ये कॅलरी आणि स्टेप ट्रॅकर्सचा समावेश असून हे वॉच वेदर अ‍ॅप्लिकेशनसह येते. ‘रिबॉक ॲक्टिव्ह फिट 1.0’मध्ये १.३ इंचाचा फुल एचडी टच स्क्रीन आणि कर्व्ड ग्लास डिस्प्ले आहे, जो खूप छान दिसतो. शिवाय स्त्री-पुरुष दोघांनाही आवडतील अशा चार रंगांचे पर्याय दिले आहेत. ब्लॅक, ब्लू, नेव्ही ब्लू आणि रेड कलरमध्ये हे उपलब्ध आहे. त्याचबरोबर या स्मार्टवॉचला पाणी आणि धुळीपासून सुरक्षेसाठी IP67 रेटिंग मिळाले आहे. त्याशिवाय कॉल आणि मेसेज नोटिफिकेशन, सोशल मीडिया नोटिफिकेशन आणि म्यूझिक कंट्रोलसह काही बिल्ट-इन गेम्ससारखे फीचर्सही आहेत.

‘रिबॉक ॲक्टिव्ह फिट 1.0’ची बॅटरी सिंगल चार्जमध्ये १५ दिवस टिकते, तर स्टँडबाय टाइमवर ३० दिवस टिकते, असे या स्मार्ट वाॅचच्या निर्मात्यांचे म्हणणे आहे. या फिटनेस वॉचची खरी किंमत ₹    ७,४९९ रुपये आहे आहे, मात्र सध्या ते ऑफरमध्ये ₹    ४,४९९

मध्ये उपलब्ध आहे. म्हणजे सध्या या वॉचवर थेट तीन हजारांची सूट उपलब्ध आहे. मात्र पुढील महिन्यात किंमत वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या