दमदार  साउंडबार!

ज्योती बागल
सोमवार, 11 एप्रिल 2022

व्हॉट्‌स न्यू
 

कौटुंबिक सणसमारंभ किंवा सोहळा असला, तरी थोडेफार नाच-गाणे होतेच. अशावेळी उपयोगी पडतो तो साउंडबार. झेब्रॉनिक्सने Zeb Juke Bar 9500WS Pro Dolby 5.1 525W हा साउंडबार भारतात नुकताच लाँच केला आहे. या नवीन झेब्रॉनिक्स साउंडबारमध्ये ड्युअल वायरलेस सॅटेलाइट स्पीकर आणि डॉल्बी सराउंड ऑडिओ दिले आहेत. हा साउंडबार 525W साउंड आउटपुट देतो. ज्यामध्ये 150W सबवूफर, दोन 75W वायरलेस सॅटेलाइट स्पीकर आणि 225W आउटपुटसह एक साउंडबार समाविष्ट आहे. तसेच 6.52 cm ड्रायव्हर थिएटरप्रमाणे जबरदस्त आवाज देण्यास मदत करतो. 
या साउंडबारमध्ये ग्राहकांना आकर्षित करतील असे अनेक भन्नाट फीचर आहेत. हा साउंडबार HDMI (ARC), ऑप्टिकल इनपुट, ब्लूटूथ 5.0, USB आणि AUX सह एकापेक्षा जास्त कनेक्टिव्हिटी पर्यायांसह येतो. यात व्हॉल्युम आणि मीडिया कंट्रोलसह एलईडी डिस्प्ले दिला आहे. त्याचबरोबर यामध्ये एक डेडिकेटेड बटण इनपुट/मोड निवडीसाठी उपलब्ध आहे. ज्यामुळे साउंडबार एकापेक्षा जास्त इनपुट डिव्हाईसबरोबर कनेक्ट करणे शक्य होते. 

झेब्रॉनिक्सचा हा साउंडबार एका रूममध्ये सहज फिट बसतो; शिवाय भिंतीवरही लावला जाऊ शकतो किंवा हॉलमधील प्लॅटफॉर्मवरही ठेवता येतो. त्यामुळे युझर जशी जागा उपलब्ध असेल तसा हा साउंडबार लावू शकतात. हा साउंडबार ₹    १६,९९९मध्ये ॲमेझॉन इंडियाद्वारे उपलब्ध करून दिला जात आहे. 

झेब्रॉनिक्सने Zebronics Zeb Vita Pro हा साउंडबारदेखील भारतात लॉँच केला आहे. यामध्ये इन-बिल्ट एफएम रेडिओ आणि ड्युअल 52 mm ड्रायव्हर्स मिळतात, जे 24W (12W +12W) आउटपुट तयार करतात. हे डिव्हाइस 100 Hz-18 KHzची फ्रिक्वेसी रेंज देते. त्याचबरोबर हा साउंडबार TWS (True Wireless Stereo) फंक्शनसह येतो. तसेच ब्लूटूथद्वारे कॉल फंक्शनलाही सपोर्ट करतो.

या साउंडबारच्या पुढील बाजूस एलईडी डिस्प्ले, व्हॉल्युम बटणे, पॉवर आणि स्कॅन बटणे दिली आहेत. याची बॅटरी ५० टक्के व्हॉल्युम ठेवल्यास १० तासांचा प्लेबॅक देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. याला पूर्ण चार्ज होण्यासाठी साडेतीन तास लागतात. हा साउंडबार WMA, MP3 आणि WAV फाइलना सपोर्ट करतो. तसेच स्मार्टटीव्ही, स्मार्टफोन, लॅपटॉपशीदेखील कनेक्ट करता येतो. कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ व्हर्जन 5, 32 GBपर्यंत मायक्रोएसडी कार्ड 

सपोर्ट आणि USB पोर्ट दिले आहे. याची इन्ट्रोडक्टरी किंमत ₹    १,८९९ असून इन्ट्रोडक्टरी पीरियड संपल्यानंतर याची किंमत ₹     ३,४९९ रुपये असेल.

संबंधित बातम्या