वाहनांची नवी मॉडेल्‍स

ज्योती बागल
सोमवार, 28 मार्च 2022

विशेष

आपला रोजचा प्रवास सुखकर करण्यासाठी सर्वजण, चारचाकी असो की दुचाकी असो, पण स्वतःचे वाहन खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनाच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन आणि पर्यावरणपूरक म्हणून इलेक्ट्रॉनिक वाहनांची मागणीही हल्ली वाढली असल्याने सर्वच वाहन निर्मात्या कंपन्यांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहन निर्मितीकडे वळवल्याचे दिसते आहे.

चारचाकी वाहने

मारुती सुझुकी वॅगन आर  (Maruti Suzuki Wagon R) 

किंमत

 • सुरुवाती किंमत ₹    ५ लाख ३९ हजार
 • टॉप व्हेरियंटची किंमत  ₹    ७.१० लाख .

वैशिष्ट्ये

 • ३४ किमी प्रति लिटरपर्यंत मायलेज.
 • कारमध्ये AMT बॉक्सबरोबर 25.19kmpl चे मायलेज, आधीच्या तुलनेत हे १५ टक्के जास्त.  
 • सीएनजी ट्रिम्सचे मायलेज 34.05km/kg पर्यंत.
 • आधीच्या मॉडेलच्या तुलनेत नवीन वॅगन आरमध्ये अनेक बदल.
 • फ्रेश एक्सटीरियरमुळे जास्त स्पोर्टी लूक दिसतो.
 • जास्त पॉवरफुल अशा नवीन इंजिनचा वापर.
 • LXi, VXi, ZXi आणि ZXi+ अशा चार व्हेरियंटमध्ये भारतीय बाजारात उपलब्ध.

एमजी झेडएस ईव्ही (MG ZS EV)

किंमत

 • सुरुवातीची किंमत  ₹  20 लाख.

वैशिष्ट्ये

 • एमजी झेडएस ईव्ही इलेक्ट्रिक SUV कार.
 • एकदा चार्ज केली तर सुमारे ४६१ किमीपर्यंत जाते.
 • या कारमध्ये हाय टेक सिस्‍टीम वापरलेली आहे.
 • ०.१ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, जी अँपल कार-प्ले (Apple CarPlay) आणि अँड्रॉइड ऑटो (Android Auto) सह येते.
 • ६ स्पीकर, इन-कार कनेक्टेड टेक, पॅनोरमिक सनरूफ आणि पॉवर-अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट.  
 • ऑटो-फोल्डिंग ORVM, क्रूझ कंट्रोल, पुश-बटण यांचाही समावेश.
 • 72 kWh ची मोठी बॅटरी.
 • नवीन शार्प एलईडी हेडलॅम्प आणि टेललाइट.
 • कारच्या इतर हायलाइट्समध्ये ६ एअरबॅग्ज, ३६० -डिग्री कॅमेरा सिस्‍टीम, लेदर टिल्ट स्टीयरिंग व्हील, सात-इंच एलसीडी क्लस्टर, TPMS, लॉन्च कंट्रोल, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, रिअर डिस्क ब्रेक आणि ड्राईव्ह मोड(इको)चा समावेश.
 • एक्ससाइट आणि एक्सक्लुजिव्ह या दोन ट्रिम्स ऑप्शनमध्ये उपलब्ध.  
 • 150 PS पॉवर आणि 353 Nm टॉर्क जनरेट करणारी 44.5 kWh ची लिक्विड कूल्ड लिथियम आयन बॅटरी.  
 • ZS EV मधील बॅटरी 15A होम सॉकेट आणि DC फास्ट चार्जरनेसुद्धा चार्ज करता येते.
 • 50 kW DC फास्ट चार्जरद्वारे ही बॅटरी फक्त 50 मिनिटांत 80 टक्के चार्ज होते.
 • HDC, HSA, ABS आणि EBD सारखे स्टँडर्ड फिचर्स.

बीएमडब्लू एक्सफोर एसयुव्ही (BMW X4 SUV) 

किंमत

 • सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत  ₹    ७०.५० लाख.
 • टॉप मॉडेलसाठी  ₹    ७२.५० लाख.

वैशिष्ट्ये

 • स्टाइलिंग आणि अनेक कॉस्मेटिक बदलांसह सादर.
 • अॅडाप्टिव्ह एलईडी हेडलॅम्प.
 • एक्सक्लुझिव्ह ब्लॅक शॅडो एडिशनमध्ये लॉंच.
 • ब्लॅक सॅफायर आणि एम ब्रुकलिन ग्रे मेटॅलिक रंगांमध्ये उपलब्ध.
 • ५.८ सेकंदात ०-१०० किमी प्रतितास वेग पकडू शकते
 • xDrive30i पेट्रोल आणि xDrive30d डिझेल या दोन प्रकारांत उपलब्ध.
 • दोन्ही इंजिन पर्यायांना ८-स्पीड स्टेपट्रॉनिक ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, जे स्टीयरिंग-माउंटेड पॅडल शिफ्टर्स आणि ऑल व्हील ड्राइव्ह सिस्टमसह येते.

किया करेन्स (Kia Carens)

किंमत

 • भारतीय बाजारपेठेत  ₹ ८.९९ लाखापासून 
 • ते  ₹    १६.१९ लाखापर्यंत.

वैशिष्ट्ये

 • किया करेन्स हे एमपीव्ही (MPV - Multi-Purpose Vehicle) वाहन आहे.
 • करेन्स ही किया मोटर्सने लॉंच केलेली चौथी एमपीव्ही कार आहे.किया कंपनीने यापूर्वी 'किया सेल्टोस', 'सॉनेट', 'कॉर्निव्हल' अशी मॉडेल लॉंच केली आहेत.
 • भारतात किया करेन्स ही कार आठ रंगांत उपलब्ध असून यामध्ये इम्पीरियल ब्लू, मॉस ब्राउन, स्पार्कलिंग सिल्व्हर, इंटेन्स रेड, अरोरा ब्लॅक पर्ल, ग्रॅव्हिटी ग्रे, ग्लेशियर व्हाइट पर्ल आणि क्लियर व्हाइट इत्यादी रंगांचा समावेश आहे.
 • या कारमध्ये व्हेंटिलेटेड फ्रन्ट सीट, कप होल्डर असलेले सीट बॅक टेबलसुद्धा दिले  आहेत.
 • या कारमध्ये सिंगल-पॅन सनरूफदेखील देण्यात आलेले आहे.
 • मागच्या सिटसाठी इलेक्ट्रिकली पाॅवर्ड वन-टच टंबल डाउन फीचर दिले आहे.
 • 'किया करेन्स'ला कार-प्ले अँड्रॉईड ऑटो आणि कियाच्या UVO कनेक्टीव्हीटीबरोबर १०.२५ इंची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्‍टीम मिळते. या पूर्ण सिस्‍टीमध्ये ६४-कलर एम्बिएन्ट लाईट असलेले आठ स्पिकर्सचे साऊंड सिस्टिम मिळते.
 • या कारमध्ये सहा एअर बॅग्स असून ABS आणि ESC, हिल-स्टार्ट असिस्ट फीचर इत्यादींचा समावेश आहे.
 • कारच्या चारही चाकांना डिस्क ब्रेकची सुविधा देण्यात आलेली आहे.
 • रिअर पार्किंग सेन्सरदेखील आहेत.
 • किया केरेन्स भारतीय बाजारपेठेत तीन इंजिनसह पाहायला मिळेल. यामध्ये ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेल असा दोन्हीचा पर्याय मिळतो.
 • त्याचबरोबर 6MT, 6AT आणि 7DCT अशा तीन महत्त्वाच्या पर्यायांमध्ये देखीलउपलब्ध असेल.

किया करेन्स कारच्या भारतातील सर्व मॅाडेल्सच्या किमती पुढीलप्रमाणे आहेत

१) प्रीमियम  

i) पेट्रोल स्मार्टस्ट्रीम 1.5 मध्ये  ₹    ८.९९ लाख

ii) टर्बो पेट्रोल स्मार्टस्ट्रीम 1.4T मध्ये  ₹   १०.९९ लाख

iii) डिझेल 1.5 लीटर CRDi VGT मध्ये  ₹   १०.९९ लाख

२) प्रेस्टिज प्लस

i) टर्बो पेट्रोल स्मार्टस्ट्रीम 1.4T मध्ये  ₹   १३.४९ लाख रुपये

ii) डिझेल 1.5 लीटर CRDi VGT मध्ये  ₹   १३.४९ लाख

३) लक्जरी

i) टर्बो पेट्रोल स्मार्टस्ट्रीम 1.4T मध्ये  ₹    १४.९९ लाख

ii) डिझेल 1.5 लीटर CRDi VGT मध्ये  ₹   १४.९९ लाख

४) लक्जरी प्लस (6/7 सीटर)

i) टर्बो पेट्रोल स्मार्टस्ट्रीम 1.4T मध्ये  ₹   १६.१९ लाख

ii) डिझेल 1.5 लीटर CRDi VGT मध्ये  ₹   १६.१९ लाख

५) प्रेस्टिज

i) पेट्रोल स्मार्टस्ट्रीम 1.5 मध्ये  ₹    ९.९९ लाख

ii) टर्बो पेट्रोल स्मार्टस्ट्रीम 1.4T मध्ये  ₹   ११.९९ लाख

iii) डिझेल 1.5 लीटर CRDi VGT मध्ये  ₹   ११.९९ लाख

लेक्सस एनएक्स  350h  (Lexus NX 350h SUV) 

किंमत

 • एक्सक्विझिट (Exquisite) ची किंमत  ₹    ६४.९० लाख.  
 • लक्जरी (Luxury) व्हेरियंटची किंमत  ₹    ६९.५० लाख.  
 • एफ-स्पोर्ट (F-Sport) व्हेरियंटची किंमत  ₹    ७१.६० लाख.  

वैशिष्ट्ये

 • Exquisite, Luxury, F-Sport या तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध.
 • 2022 Lexus NX 350h च्या लूकमध्ये अनेक बदल.
 • सिंगल-पीस एलईडी हेडलॅम्पमध्ये एकत्रित केलेला DRL चा नवीन संच, लाईट बारला जोडलेल्या नवीन एलईडी टेल लाइट्स आणि स्पिंडल ग्रिलसाठी यू-प्रकारच्या पॅटर्नचा समावेश.
 • एसयूव्हीचे इंटीरियरदेखील अपग्रेड केलेले आहे.
 • मोठी १४.० इंचाची इन्फोटेन्मेंट सिस्टीम, इलेक्ट्रिक फोल्डिंग रिअर सीट, पॅनोरॅमिक सनरूफ आणि कस्टमाइज करण्यायोग्य सभोवतालची लाइटिंग यांसारखे फीचर्स.
 • ३६० डिग्री पार्किंग कॅमेरा, हेड-अप डिस्प्ले, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कार-प्ले, वायरलेस चार्जिंग, ६४ कलर अ‍ॅम्बियंट लाइटिंग.
 • अधिक जागेसाठी एसयूव्हीच्या मागील सीट फोल्डिंग फीचरसह येते.
 • २.५ लिटर ४-सिलेंडर नैसर्गिकरीत्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, हे 192 hp पॉवर जनरेट करू शकते.
 • ऑल-व्हील-ड्राइव्हमध्ये पेट्रोल आणि हायब्रिड युनिटचे एकत्रित आउटपुट 
 • 244 hp आहे.
 • इंजिन ६-स्टेप ई-सीव्हीटी ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.

टोयोटा ग्लान्झा  (Toyota Glanza)

किंमत

 • प्रीमियम हॅचबॅक कारची भारतीय बाजारात एक्स-शोरूम किंमत  ₹    ६.३९ लाख ते ९.६.९ लाख आहे.

वैशिष्ट्ये

 • मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह के-सीरिज इंजिनमध्ये उपलब्ध.
 • ऑटोमॅटिक व्हेरिएंट 22.9 kmpl चे मायलेज, तर मॅन्युअल व्हेरियंट 22.3 kmpl चे मायलेज.
 • 66 KW (89 PS) 
 • पॉवर जनरेट करणारे इंजिन.
 • कारशी संबंधित इंधन, वेग आणि टर्न नेव्हिगेशनची माहिती देणारा डॅश बोर्डवर हेड-अप डिस्प्ले.
 • कारच्‍या सभोवतालच्‍या सहा कोनातून इमेज कॅप्चर करणारा ३६० डिग्री व्ह्यू कॅमेरा.
 • हवामान, जवळच्या लँड मार्क आणि ट्रिपची माहिती मिळवण्यासाठी टोयोटा व्हॉईस असिस्टन्स.
 • मोबाईल ॲपच्या मदतीने चालणारे फिड माय कार फीचर. 

फोक्सवॅगन व्हर्ट्स सेडान (Volkswagen Virtus sedan)

किंमत

 • अंदाजे किंमत  ₹ ९ ते १२ लाख रुपये दरम्यान.

वैशिष्ट्ये

 • ही मध्यम आकाराची कार असून मे २०२२ मध्ये लाँच होईल. प्री-बुकिंग मार्च २०२२ पासून सुरू.
 • गाडीचे उत्पादन भारतात होणार असून २५ हून अधिक देशात निर्यात होणार.
 • ही गाडी फोक्सवॅगन वेन्टोची जागा घेईल.  
 • फोक्सवॅगन व्हर्ट्‌सच्या एक्सटीरियरमध्ये एल आकाराचे एईजी जीआरएलसह एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, क्रोम सराउंडसह सिंगल स्लेट ग्रिल, दोन्ही बाजूंना फॉग लाइट्स असलेला रुंद एअर डॅम, कॉन्ट्रास्ट ब्लॅक ORVM, नवीन १६-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील, जीटी यांचा समावेश.  
 • समोरच्या फेंडर्सवर लाइन बॅजिंग, दरवाजाच्या हँडलसाठी क्रोम इन्सर्ट, शार्क-फिन अँटेना, रॅप-अराउंड एलईडी टेललाइट्स, बूट-माउंटेड नंबर प्लेट रिसेस आणि बूट-लिडवर व्हर्ट्‌स लेटरिंगसारखे फिचर्स दिले आहेत.
 • वाइल्ड चेरी रेड, कार्बन स्टील ग्रे, राइजिंग ब्लू, कँडी व्हाइट, रिफ्लेक्स सिल्व्हर, कर्कुमा यलो या सहा रंगांमध्ये कार उपलब्ध असेल.
 • व्हर्ट्‌समध्ये ४० सुरक्षा फीचर्स आहेत. सहा एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, मल्टी कोलिजन ब्रेक, हिल होल्ड कंट्रोल, टायर प्रेशर वॉर्निंग यांसारखे फिचर्स.
 • अंतर्गत वैशिष्ट्यांमध्ये अँपल कार-प्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह १०-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्‍टीम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जिंग, हवेशीर फ्रंट सीट, इलेक्ट्रिक सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि क्रूझ कंट्रोल यांचा समावेश.

दोन इंजिन पर्याय

 • १.० लिटर, तीन - सिलेंडर, टीएसआय पेट्रोल इंजिन
 • १.५ लिटर, चार - सिलेंडर, टीएसआय पेट्रोल इंजिन.
 • ट्रान्समिशन पर्यायांमध्ये मानक सहा-स्पीड मॅन्युअल युनिट समाविष्ट आहे, तर सहा-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर स्वयंचलित युनिट आणि सात-स्पीड डीसीटी युनिट पर्याय म्हणून उपलब्ध.

टाटा ब्लॅकबर्ड एसयूव्ही (Tata Blackbird SUV)

किंमत

 • अंदाजे किंमत ₹  ९.५ लाख.

वैशिष्ट्ये

 • ही कार मिड साइज एसयूव्ही सेगमेंट अंतर्गत येईल.
 • टाटा नेक्सॉनपेक्षा जास्त दमदार फीचर.
 • टाटा ब्लॅकबर्ड कूपे डिझाइन लँग्वेजसोबत भारतात एन्ट्री करणार.
 • खास यूथसाठी डिझाइन केलेली कार.
 • १.५ लिटरचे ४ सिलिंडर इंजिन.
 • ऑल ब्लॅक थीम मिळेल.
 • टाटा थ्री रो सीटिंगसह बाजारात 
 • येऊ शकते.
 • ८.८ इंचाची टच स्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्‍टीम मिळेल, ज्याला वायरलेस अँपल कार-प्ले आणि अँड्रॉयड ऑटोसोबत कनेक्ट करता येते.
 • शिवाय वायरलेस चार्जर, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, पॅनोरमिक सनरूफ आणि लेदर सीटसारखे फीचर्सही मिळतील.

सुझुकी विटारा (Suzuki Vitara) 

किंमत

 • अंदाजे किंमत  ₹ ८ लाख.

वैशिष्ट्ये

 • मिड साइज एसयूव्ही सेगमेंट अंतर्गत भारतात दाखल होणार.  
 • 1.5L K15C नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन.
 • 140V लीथियम आयन बॅटरीसह एक इलेक्ट्रिक मोटरचा ऑप्शन उपलब्ध.
 • कारचे पेट्रोल व्हेरियंट 115bhp पॉवर आणि138Nm टॉर्क जनरेट करते.
 • सुझुकी विटारा हायब्रिड ६ स्पीड AMT गियरबॉक्स.
 • ईको मोडमध्ये फक्त इलेक्ट्रिक मोटरवर लो स्पीडमध्ये रन करते.
 • हे मॉडल फ्रंट व्हील ड्राइव (FWD) सोबत येते.
 • 22.5kmpl चे मायलेज ऑफर.
 • १२.७ सेकंदात ०-६२ किमी प्रति तास इतका वेग पकडण्यात सक्षम.
 • 111mph चा टॉप स्पीड मेंटेन करू शकते.
 • मारुती सुझुकी ब्रेझा (Maruti Suzuki Brezza) नावाने भारतात होऊ शकते लाँच.

मारुती ऑल्टो  (Maruti Alto)

किंमत

 • ₹ २.९५ लाख ते ४.३६ लाख दरम्यान असेल.

वैशिष्ट्ये

 • परवडणारे हॅचबॅक नेक्स्ट जेनरेशन मॉडेल.
 • हार्टेक्ट प्लॅटफॉर्म दिसणार आहे, जे गुणवत्ता आणि टिकाऊपणाच्या बाबतीत खूप चांगले आहे.
 • K10C DualJet 1.0L 3 - सिलेंडर पेट्रोल इंजिन.
 • इंजिन 67 bhp पर्यंत पॉवर आणि 89Nm टॉर्क जनरेट करेल.
 • मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असे दोन पर्याय असतील.
 • रचना पूर्वीपेक्षा स्टायलिश असेल.
 • सध्याच्या मॉडेलपेक्षा लांबीही जास्त असेल.
 • नवीन ऑल्टोला लांब लोखंडी जाळी, नवीन बंपर, मोठा टेलगेट तसेच नवीन हेडलाइट आणि टेललाइट्स मिळतील.
 • एक नवीन इंटिरियर, उत्तम जागा, नवीन डॅशबोर्ड, सेंट्रल कन्सोल, अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कार-प्ले सपोर्टसह अपडेटेड टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, कीलेस एंट्री, इंजिन स्टार्ट-स्टॉप बटणसारखे फीचर्स मिळतील.
 • एअरबॅग्ज आणि रियर पार्किंग सेन्सर्ससह अनेक स्टॅंडर्ड सेफ्टी फीचरही पाहायला मिळतील.

मारुती डिझायर सीएनजी (Maruti Dzire CNG) 

एक्स-शोरुम किंमत

 • व्हीएक्सआय व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत  ₹ ८.१४ लाख.  
 • झेडएक्सआय व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत  ₹ ८.८२ लाख.  

वैशिष्ट्ये

मारुती डिझायर सीएनजी दोन व्हेरिएंटमध्ये असेल.

 • १) व्हेरिएंट डिझायर व्हीएक्सआय.  
 • २) मारुती डिझायर झेडएक्सआय.
 • १.२ लिटर इंजिन असून ते के सीरीजचे ड्युअल जेट व्हीव्हीटी पेट्रोल इंजिन आहे.
 • मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले हे इंजिन ७७ पीएस पॉवर आणि ९८.५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते.
 • पेट्रोलवर 23.26 kmpl मायलेज, तर सीएनजी मोडवर ३१.१२ किमी प्रतिलिटर मायलेज.
 • यात क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक एलईडी लाइट्स, ऑटो फोल्डिंग ORVMS, पुश बटन इंजिन स्टार्ट-स्टॉप, ऑटो एसी, रिअर एसी व्हेंट्स, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल 
 • कार-प्ले कनेक्टिव्हिटीसह सात इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्‍टीम यांसारखी फीचर उपलब्ध.

मारुती सुझुकी बलेनो (Maruti Suzuki Baleno) 

एक्स-शोरूम किंमत

 • सुरुवातीची किंमत  ₹    ६.३५ लाख.
 • टॉप मॉडेलची किंमत  ₹    ९.४९ लाख.

वैशिष्ट्ये

 • हॅचबॅक बलेनोचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच.
 • मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिक मॉडलचे मायलेज २२.३४ किमी प्रति लिटर आणि २२.९४ किमी प्रति लिटर आहे.
 • कंपनीच्या म्‍हणण्याप्रमाणे प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये सर्वात जास्त मायलेज देणारी कार.
 • एक नवीन १.२ लिटरची सीरीज ड्युअल जेट, ड्युअल व्हीव्हीटी पेट्रोल इंजिनसोबत आली आहे, जी मायलेज वाढवण्यासाठी स्टार्ट-स्टॉप टेक्नोलॉजीसह येते.
 • हे इंजिन ८८.५ एचपीचे पॉवर आणि ११३ एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते.
 • इंजिन ५ स्पीड मॅन्यूअल गियरबॉक्स आणि एएमटी (एजीएस)सह येते.
 • २२.९४ किमी प्रति लिटरपर्यंत मायलेज देते.
 • अँड्रॉईड ऑटो, ॲपल कार-प्ले आणि ४० प्लस कनेक्टेड कार फीचरसह  एक नवीन ९.० इंचाचा स्मार्ट-प्ले प्रो प्लस टचस्क्रीन, इंफोटेन्मंेट सिस्‍टीमला सपोर्ट करते.
 • अन्य नवीन हाय टेक फीचरमध्ये एक हेडअप डिस्प्ले, एक ३६० डिग्री पार्किंग कॅमेरा, अॅलेक्सा कनेक्ट, एक ऑल एलईडी लायटिंग सिस्‍टीम, फ्लॅट बॉटम, स्टीयरिंग व्हील, रियर एसी व्हेंट आणि सहा एअरबॅग, ईएसपी, हिल होल्ड असिस्टसारखा सेफ्टी इक्‍विपमेंट्चा समावेश आहे.

रेनॉल्ट क्विड माय22 (Renault Kwid MY 22)  

किंमत

 • सुरुवातीची किंमत  ₹ ४.४९ लाख.

वैशिष्ट्ये

 • मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन अशा दोन्ही पर्यायांसह लॉंच.
 • ०.८ - लिटर आणि १ - लिटर SCe पॉवरट्रेन पर्यायांसह सादर.
 • ॲडव्हान्स फीचरसह अपडेटेड इंटीरियर.
 • बाहेरील भाग क्लायंबर रेंजमध्ये व्हाईट ॲक्सेंटसह येतो.
 • नवीन Kwid MY22 रेंज ०.८-लिटर आणि १-लिटर MT पॉवरट्रेन या दोन्हींवर RXL (O) व्हेरिएंटसह उपलब्ध.
 • मॉडेल लाइन स्पोर्ट् स सिल्व्हर स्ट्रीक LED DRLs कारला प्रीमियम अपील देतात.
 • इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल ORVM सह क्लास रिव्हर्स पार्किंग कॅमेरासह येते.
 • कलर ऑप्शनमध्ये मेटल मस्टर्ड आणि आइस कूल व्हाइट, ड्यूअल टोनमध्ये ब्लॅक रूफसह नवीन ड्यूअल टोन फ्लेक्स व्हील्सचा समावेश.  
 • सिंगल टोनमध्ये, कलर पर्यायांमध्ये मूनलाईट सिल्व्हर आणि जास्कर ब्लू यांचा समावेश.
 • नवीन मॉडेलला अँड्रॉइड ऑटो, ॲपल कार-प्ले, व्हिडीओ प्लेबॅक आणि व्हॉइस रेकग्निशन फीचरसह फर्स्ट इन क्लास आठ-इंच टचस्क्रीन MediaNAV इव्होल्यूशन आहे.
 • सेफ्टी फीचरमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, ABS आणि EBD, सीट बेल्ट रिमाइंडर, ओव्हरस्पीड अलर्ट, रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि ड्रायव्हर साइड पायरो आणि प्री सारखे अनेक ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह सेफ्टी फीचर देण्यात आले आहेत.
 • लोड लिमिटरसह टेंशनर असेल जे सर्व व्हेरिएंटमध्ये स्टँडर्ड आहे.
 • ARAI टेस्टिंग सर्टिफिकेशननुसार इंधन कार्यक्षमता ०.८-लीटर 22.25 kmpl इतकी आहे.
 • मॉडेल लाइन देखभाल खर्च ३५ पैसे/किमी इतका कमी असल्याचा कंपनीचा दावा.
 • दोन वर्षांची/५० हजार किमी उत्पादक वॉरंटी.
 •   वॉरंटी स्कीम 24X7 रोड साइड  असिस्‍टन्स (RSA) कोणत्याही अॅडिशनल कॉस्टशिवाय 
 • मिळते.

सुझुकी ॲक्सेस 125 (Suzuki Access 125)

किंमत

 • सुरुवाती किंमत ₹ ७५,६००.
 • टॉप व्हेरिएंटची  ₹  ८४,८०० पर्यंत.

वैशिष्ट्ये 

 • कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर.
 • सहा प्रकारांत बाजारात लॉंच.
 • ८.७ पीएस पॉवर आणि १० एनएम पीक टॉर्क जनरेट करणारे 124cc सिंगल सिलेंडर इंजिन.  
 • पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक.
 • ५७.२२ किमीचे मायलेज. (हे मायलेज ARAI प्रमाणित आहे.)

ग्रेटा ग्लाईड (Greta Glide)

किंमत

 • स्कूटरच्या बेस व्हेरिएंटची किंमत  ₹  ८० हजार.

वैशिष्ट्ये 

 • इलेक्ट्रिक स्कूटर
 • लिथियम आयन बॅटरी पॅकसह एकूण चार प्रकारांमध्ये लाँच.
 • १) V2 48v-24Ah बॅटरी- ६० किमी रेंज.
 • २) V2+60v-24Ah बॅटरी - ६० किमी रेंज.
 • ३) V3 48v-30Ah बॅटरी - १०० किमी रेंज.
 • ४) V3+60v-30Ah बॅटरी - १०० किमी रेंज.
 • एका चार्जमध्ये १०० किमी रेंज.
 • यलो, ग्रे, ऑरेंज, स्कार्लेट रेड, रोझ गोल्ड, कँडी व्हाइट आणि जेट ब्लॅक या सात रंगांमध्ये उपलब्ध.
 • DRL, EBS, ATA सिस्टीमसारखी वैशिष्ट्ये
 • डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कीलेस स्टार्ट आणि अँटी थेफ्टसारखे सेफ्टी फीचर.
 • फ्रंट ग्लोव्ह बॉक्स, लाइट डिझायनर कन्सोल आणि एक्स्ट्रा-लार्ज लेक फॉर्म.
 • ओला इलेक्ट्रिकप्रमाणे रिव्हर्स ड्राइव्ह मोड, तीन स्पीड ड्रायव्हिंग मोडदेखील उपलब्ध.
 • My Vehicle अलार्म, ब्लॅक लेदरेट सीट कव्हर आणि यूएसबी चार्जिंग पोर्टदेखील उपलब्ध.
 • तीन वर्षांची वॉरंटी.

रॉयल एनफील्ड स्क्रॅम ४११ (Royal Enfield Scram 411) 

किंमत

 • ₹    २.०३ लाख ते २.०८ लाख (एक्सशोरूम किंमत)

वैशिष्ट्ये 

 • रॉयल एनफील्डची स्वस्त बाइक.
 • हिमालयन बाइकचे स्वस्त व्हर्जन.
 • 411cc चे दमदार इंजिन.
 • डिझाइनमध्ये एक राउंडिशन ओल्ड स्कूल हेडलँम्प, पूर्णपणे डिजिटल सर्क्युलर इंस्ट्रूमेंट क्लस्टर, आरामदायक सीटबरोबर अर्गोनिक डिझाइन, एलईडी टेललाईट.  
 • नवीन इंस्ट्रूमेंट कन्सोल, छोटे फ्रंट व्हील आणि बेसिक बॉडी पॅनेलचा वापर.  
 • व्हाइट, सिल्वर, ब्लॅक, ब्लू, ग्रेफाइट रेड आणि येलोसह अनेक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध.
 • मल्टी पर्पज १९ इंचाचे फ्रंट व्हील आणि १७ इंचाचे रियर व्हील.  
 • छोट्या फ्रंट व्हीलच्या जागी स्क्रॅममध्ये हिमालयनच्या तुलनेत १४५५ मिमीचे व्हीलबेस.
 • यात हिमालयनचे इंजिन 411cc सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड इंजिन पाहायला मिळाते.
 • पॉवर आणि टॉर्क आउटपूटसुद्धा 24.3bhp आणि 32Nm आहे.
 • इंजिनला ५ स्पीड गियरबॉक्स सोबत जोडले आहे.
 • ग्राउंड क्लियरन्सला २०० मिमीपर्यंत कमी.
 • सीट हाइट 795mm केली आहे.
 • ट्रिपल नेव्हिगेशन सिस्टीमसुद्धा मिळते. ज्याला मिटियॉर ३५० च्या लाँचिंगसोबत आणले गेले होते. हिमालयनमध्ये उपलब्ध करण्यात आले होते.
 • ऑप्शनल कीटमध्ये बाइकच्या सेंटर स्टँडचा समावेश.

ओबेन रोर ई-बाईक (Oben Rorr Electric Bike)

किंमत

 • ₹ ९९ हजार ९९९ (एक्स शोरूम)

वैशिष्ट्ये 

 • डिलीव्हरी जुलै २०२२ मध्ये सुरू होणार.  
 • ओबेन इलेक्ट्रिकची स्वस्त इलेक्ट्रिक बाइक. 
 • २०० किमी रेंज.
 • सध्याचे मॉडेल फक्त बेंगळुरूमध्ये उपलब्ध.
 • स्टायलिंग गोल हेडलाइट, इलईडी टर्न इंडिकेटर्स, मोठे इंस्ट्रूमेंट क्लस्टर, स्प्लिट-स्टाइल सीट्स, टू-पीस पिलियन ग्रॅबरेल आणि पांच-स्पोक अलॉय व्हीलचा समावेश.
 • १०० किमी प्रति तास टॉप स्पीड.
 • फुल चार्जिंगमध्ये २०० किमी प्रति चार्जप्रमाणे आयडीसी प्रमाणित रेंज.
 • टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि सस्पेंशन टास्कला सांभाळण्यासाठी रियर मोनो शॉक.
 • ब्रेकिंग सेटअपमध्ये दोन्ही व्हीलवर सिंगल डिस्कचा समावेश.
 • सेफ्टी नेटमध्ये कंबाइंड ब्रेकिंग सिस्टम.

हिरो एडी (Hero Eddy)

किंमत

 • ₹ ७२ हजार.

वैशिष्ट्ये

 • लो-स्पीड स्कूटर.
 • खास जवळच्या प्रवासासाठी डिझाइन.  
 • रजिस्ट्रेशन किंवा लायसन्सशिवाय चालवता येणार.
 • स्मार्ट फीचर आणि स्टायलिश लूक  
 • फाइंड माय बाइक, ई-लॉक, लार्ज बूट स्पे, फॉलो मी हेडलॅम्प्स आणि रिव्हर्स मोडसारखे शानदार फीचर उपलब्ध.
 • पिवळ्या आणि निळ्या या दोन रंगात उपलब्ध. 

होंडा ॲक्टिव्हा 125 (Honda Activa 125)

किंमत

 • एक्सशोरुम किमती  ₹  ७४ हजार १५७ ते 
 • ₹ ८२ हजार ८२० दरम्यान.

वैशिष्ट्ये

 • होंडाची सर्वात पॉप्युलर स्कूटर
 • अंडरबोन फ्रेमचा वापर, फ्लॅट टाइम सीट, अंडर सीट स्टोरेज कंपार्टमेंट आणि सिल्वर ग्रॅब रेलसारखे फीचर.
 • ५.३ लिटर फ्युएल स्टोअर कपॅसिटी.
 • १११ किलोग्रॅम वजन.
 • 24cc चे BS६ कम्प्लायंट, सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड इंजिन, जे ८.१८ एचपीचे पॉवर जनरेट करते.
 • मोटर सीव्हीटी बॉक्ससोबत पेअर्ड.
 • सेफ्टीसाठी स्कूटर ड्रम - डिस्क ब्रेक ऑप्शन.
 • रस्त्यावर जबरदस्त हँडलिंगसाठी सीबीएससुद्धा उपलब्ध.

रिव्हॉल्ट आरव्ही 400  (Revolt RV 400 Electric Bike)

किंमत

 •   ₹    १.२४ लाख (एक्स शोरुम)

वैशिष्ट्ये

 • १५६ किमीपर्यंत रेंज.  
 • ३.२४ किलोवॅटचा बॅटरी पॅक.
 • एक किलोवॅटची बॅटरी चार्ज करण्यासाठी एक यूनिट वीजेचा खर्च.
 •   (जर १ यूनिटची किंमत ७ रुपये असेल तर बाईक एकदा फुल चार्ज केल्यावर जवळपास २३ रुपये खर्च येईल. याचाच अर्थ बाइकचा प्रति किमी खर्च फक्त १५ पैसे होईल.)
 • ८५ किमी प्रति तासाचा टॉप स्पीड.
 • १०८ किलोग्रॅम वजन.
 • इको, नॉर्मल आणि स्पोर्ट् स असे तीन रायडिंग मोड.  
 • डिस्क फ्रंट ब्रेक आणि डिस्क रियर ब्रेक उपलब्ध.
 • सध्या भारतीय बाजारात रिव्हॉल्टचा सर्वात पॉप्यूलर इलेक्ट्रिक बाइक्समध्ये समावेश.
 • काळ्या आणि लाल रंगात उपलब्ध.

भारतातील वेगवेगळ्या शहरांतील RV400 

एक्स-शोरूम किमती

 • मुंबई -  ₹    १.२५ लाख 
 • हैदराबाद -  ₹    १.२४ लाख
 • चेन्नई -  ₹    १.२४ लाख
 • बंगळुरू -  ₹    १.२४ लाख
 • कोलकाता -  ₹    १.२४ लाख
 • दिल्ली -  ₹    १.२४ लाख
 • पुणे -  ₹    १.२५ लाख

टीव्हीएस ज्युपिटर 125 (TVS Jupiter 125)

किंमत

 • सुरुवातीची किंमत  ₹    ७५,६२५
 • टॉप व्हेरियंटवर  ₹   ८२,५७५ पर्यंत.

वैशिष्ट्ये

 • नव्या रूपात सादर
 • जास्तीत जास्त ८.१५ पीएस पॉवर आणि १०.५ एनएम पीक टॉर्क जनरेट करणाऱ्या १२४.८cc सिंगल सिलेंडर इंजिनचा वापर.
 • ब्रेकिंग सिस्टीमसाठी पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक.
 • ५० किमी मायलेज.

पेट्रोल आणि डिझेल गाड्यांच्या किमतीत मिळणारी इलेक्ट्रिक वाहने ही प्रदूषण आणि इंधन दरवाढीच्या समस्येवर पर्याय आहे. यामध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान या गाड्यांना वेगळेपणाचा देते. इलेक्ट्रिक गाड्या वजनाने हलक्या आणि तांत्रिकदृष्ट्या उत्तम गुणवत्ता असणाऱ्या असतात. हाय स्पीड व लो स्पीड प्रकारांमध्ये मिळणाऱ्या या गाड्या पेट्रोल आणि डिझेल वाहनाच्या तोडीसतोड आहेत. शिवाय सतत होणारी इंधन दरवाढ येत्या काळात सर्वसामान्य लोकांची होरपळ करणारी आहे. त्यापासून वाचण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने उत्तम पर्याय आहेत. या गाड्यांचे अनेक आकर्षक पर्याय उपलब्ध असून यांच्या किमतीही सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आहेत. वाढत्या वापरामुळे, इलेक्ट्रिक वाहनांच्या जागृतीमुळे, तसेच वाहन खरेदीकरिता कर्जाच्या उपलब्ध सुविधांमुळे ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढू लागला आहे.

-  श्रियाळ  माधवराव ठाकरे, डायरेक्टर, इको तेजस.

या लेखात उल्लेख केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या किंमतीत शहरानुसार बदल होऊ शकतो.

संबंधित बातम्या