वाचक लिहितात...    

वाचक
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

वाचक लिहितात...
निवेदन ः ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता ः सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. ई-मेल ः saptahiksakal@esakal.com

अपरिचित कोकणाचे दर्शन
‘सकाळ साप्ताहिका’च्या कोल्हापूर-कोकण विशेषांकांतील (७ एप्रिल २०१८) ‘समुद्रापलीकडचा कोकण’ हा लेख वाचला. शिरीष दामले यांच्या लेखाचे शीर्षक खूप समर्पक आहे. समुद्रकिनारे आणि देवळे यापलीकडे कोकणात काय वैभव दडले आहे याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! आम्ही दरवर्षी कोकणात जातो. एकावेळी एकाच तालुक्‍यात फिरतो. निसर्गाचा मनमुराद अनुभव घेतो. जत्रा, नाटके, भजन पालखी, घरचे जेवण, सायकलिंग, बोटीतील प्रवास, जंगलातील शांतता, डोंगरावरून दिसणारा समुद्र, खाडी, हिरवी झाडी, खाडीशेजारची कोळीवस्ती, मासेबाजार आणि कोकणातील साधी पण बेरकी माणसे हे आम्हाला नेहमीच आकर्षित करतात. हा लेख वाचताना या साऱ्या आठवणी जाग्या झाल्या. नवीन ठिकाणांची माहिती मिळाली.
मंदार पारखी (ई-मेलवरून)

‘साप्ताहिक’चा अंक खास 
सकाळ साप्ताहिक हे नियतकालिक वाचायला सुरवात केली, तेव्हापासून मला नवनवीन माहिती मिळते आहे. त्यामुळे ज्ञानामध्ये खूप वाढ झाली असे वाटते. यात येणारे सर्वच लेख अतिशय वाचनीय असतात. या लेखांमधून मला हव्या असलेल्या प्रश्नाचे उत्तर अनेकदा मिळून जाते. 
प्रत्येक ‘संपादकीय’ अतिशय समर्पक व उल्लेखनीय असते. आरोग्याशी निगडीत असलेल्या समस्यांचे निवारण ‘आरोग्याचा मूलमंत्र’ या सदराद्वारे उत्तमरीत्या होते. ‘अर्थविशेष’ या सदरातून तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे नवीन गुंतवणूकदारांना फायदा होतो. नेमके कसे वागावे, आपल्याला वेगवेगळ्या समस्या कशा भेडसावतात याबद्दल हितगूजमधून माहिती मिळते. तसेच वाचनाच्या जगात रमणाऱ्या प्रत्येक वाचनप्रेमींना नवनवीन पुस्तकाची माहिती ‘पुस्तक परिचय’ या सदरातून मिळते. समस्त गृहिणी वर्गाला दर वेळेस काय नवीन पदार्थ बनवावा हा प्रश्न पडत असतो. अशा वेळेस ‘फूड पॉइंट’ हे सदर खूप उपयोगी पडते. अशा वैविध्यपूर्ण नियतकालिकाला धन्यवाद म्हटलेच पाहिजे नाही का? 
प्रिया प्रकाश निकुम, नाशिक

उत्कृष्ट शिक्षणाचे माहेरघर
सकाळ साप्ताहिकाच्या अंकातील (२४ मार्च २०१८) अमेरिका खट्टी-मिठी हे सदर आवडले. डॉ. मृण्मयी भजक यांचा या सदरातील ‘...आणि अमेरिका मोठ्ठीही!’ हा लेख वाचनीय होता. अमेरिकेतील वास्तव चित्र पहावयास मिळते. परदेशी नागरिकांचे राहणीमान याविषयी उत्कृष्ट माहिती या सदराद्वारे मिळाली. खरोखरच लेखातून बोध घेण्यासारखा आहे.
समीर सतीश कुलकर्णी, कोल्हापूर

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सदर
सकाळ साप्ताहिकाच्या अंकातील ‘स्पर्धा परीक्षांचा गेट वे’ या सदराचा मी नियमित वाचक असून हे सदर अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. या सदरात आठवडाभरातील महत्त्वाच्या घडामोडी अत्यंत मोजक्‍या शब्दांत मांडल्या जातात. या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला उपयुक्त ठरतात. करंट अफेयर्समधील ‘समस्या आणि ऊहापोह’ हा भागदेखील अत्यंत वाचनीय असतो.
विजय कुलकर्णी, करमाळा, सोलापूर

संबंधित बातम्या